‘कोरोना’ला रोखण्यासाठी राज्यात संचारबंदी, भाजी खरेदीसाठी हजारो नागरिक रस्त्यावर

मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पुणे, अहमदनगर, सोलापूरसह अनेक ठिकाणी अनेक नागरिक सकाळपासूनच भाजी खरेदी करण्यासाठी रस्त्यावर (People rush during Curfew) उतरले. 

'कोरोना'ला रोखण्यासाठी राज्यात संचारबंदी, भाजी खरेदीसाठी हजारो नागरिक रस्त्यावर
Follow us
| Updated on: Mar 24, 2020 | 11:06 AM

मुंबई : कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महाराष्ट्रात संचारबंदी लागू करण्यात (People rush during Curfew) आली आहे. त्यामुळे नागरिकांना घराबाहेर पडण्यासही मज्जाव आहे. मात्र तरीही मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पुणे, अहमदनगर, सोलापूरसह अनेक ठिकाणी अनेक नागरिक सकाळपासूनच भाजी खरेदी करण्यासाठी तसेच इतर विविध कामांसाठी रस्त्यावर उतरले. त्यामुळे एकीकडे शासनाकडून कोरोनाला रोखण्यासाठी उपाय केले जात असताना दुसरीकडे मात्र असंख्य नागरिक रस्त्यावर उतरल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

मुंबईत अनेक नागरिक सकाळपासूनच बाजारहाट करण्यासाठी (People rush during Curfew) रस्त्यावर उतरल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. केवळ दुकानातच नाही तर रस्त्यावरील विक्रेत्यांकडे माल विकत घेण्यासाठी गिरगाव परिसरात झुंबड उडाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. त्यामुळे या बेजबाबदार नागरिक आणि विक्रेत्यांवर पालिकेने कारवाई करावी अशी मागणी होत आहे.

संचारबंदी लागू झाल्यानंतरही अनेक लोक अत्यावश्यक सेवा असणाऱ्या ठाण्यात भाजी मंडईमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळत आहे. पोलिसांकडून वारंवार संध्याकाळपर्यंत भाजी मंडई सुरु राहणार असल्याचे आवाहन केले जात आहे. मात्र ग्राहक ही गर्दी कमी करत नसल्याचे चित्र दिसत आहे. ठाण्यातील जांभळीनाका परिसरातील भाजीमंडई नागरिकांनी गर्दी केली आहे.

नवी मुंबईतील एपीएमसी मार्केट 8 दिवस बंद

तर नवी मुंबईतील एपीएमसी मार्केट पुढील 8 दिवस बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. या ठिकाणी रोज राज्यातून अंदाजे 1000 ट्रक येत असतात. तसेच भाजी खरेदी करण्यासाठी मोठ्या संख्येने ग्राहक खरेदी करत असतात. मात्र गर्दी टाळण्यासाठी पुढील 8 दिवस भाजीपाला मार्केट बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे ग्राहकाने पुढील आठ दिवस पुरेल एवढा भाजीपाला खरेदी करण्याचे आवाहन केले जात आहे.

त्याशिवाय पुण्यातील छत्रपती शिवाजी महाराज मार्केटमध्ये एकूण 2 हजार 200 गाड्यांची आवक झाली. उद्यापासून मार्केट बंद ठेवणार असल्याचे असोसिएशन आणि हमाल संघटनेनं सांगितलेलं आहे. मात्र आज दुपारी बाजारघटकांची पुन्हा एकदा बैठक होणार आहे. या बैठकीत याबाबतचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.

परळीत हजारो नागरिक खरेदीसाठी रस्त्यावर

बीडमध्ये संचारबंदीच्या आदेशाचा नागरिकांकडून बोजवारा उडाल्याचे पाहायला मिळत आहे. नागरिकांनी जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश धुडकावत परळीतील नागरिक बिनधास्त रस्त्यावर उतरले. बीडमधील हजारो नागरिक खरेदीसाठी बाहेर पडले. संचारबंदीच्या काळात अनेक ठिकाणी पोलीसही तैनात नसल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे संचारबंदी लागू असूनही नागरिक अद्याप गंभीर नाहीत असे बोललं जात आहे.

अहमदनगरमध्ये नागरिकांनी भाजीपाला मार्केटमध्ये मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर सरकार कडक पावलं उचलत आहे. तर दुसरीकडे मात्र नागरिक बेजबाबदारपणे गर्दी करत हे सर्व पायदळी तुडवत आहे.

भाजीपाला खरेदीसाठी नागरिकांची धावपळ

त्याशिवाय वर्ध्यातील भाजीमार्केटमध्येही नागरिकांची गर्दी पाहायला मिळत आहे. भाजीपाला खरेदी करण्यासाठी नागरिक मोठी धावपळ करत आहे. सकाळी 7 पासूनच अनेक नागरिक भाजी बाजारात खरेदी करत आहे.

तर सोलापुरात संचारबंदीच्या आदेशाला केराची टोपली दाखवली जात आहे. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भाजीपाला घ्यायला ग्राहकांनी गर्दी केली आहे. दरम्यान गर्दी टाळण्यासाठी एका ठिकाणी बसून भाजीपाला विकण्याऐवजी फिरुन भाजीपाला विकावा असे आदेश प्रशासनातर्फे दिले जात आहे. मात्र प्रशासनाचे हे आदेश धाब्यावर बसवून भाजीपाला विकणाऱ्यांची आणि ग्राहकांची गर्दी पाहायला मिळत (People rush during Curfew) आहे.

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.