फलटण महिला डॉक्टर प्रकरण, हॉटेच्या रूममधलं CCTV फुटेज पोलिसांच्या हाती, मृत्यूपूर्वी नेमकं काय घडलं? सर्वात मोठी बातमी

फलटणच्या एका रुग्णालयात कार्यरत असलेल्या महिला डॉक्टरने आपलं आयुष्य संपवलं आहे, या घटनेनं संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे, दरम्यान ही घटना जिथे घडली त्या हॉटेलच्या रूममधील सीसीटीव्ही फुटेज आता पोलिसांच्या हाती लागलं आहे.

फलटण महिला डॉक्टर प्रकरण, हॉटेच्या रूममधलं CCTV फुटेज पोलिसांच्या हाती, मृत्यूपूर्वी नेमकं काय घडलं? सर्वात मोठी बातमी
crime
Image Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Dec 19, 2025 | 11:51 AM

फलटणमध्ये एका महिला डॉक्टरने आपलं आयुष्य संपवलं आहे, या घटनेनं राज्यभरात खळबळ उडाली आहे. ही तरुणी फलटणच्या एका रुग्णालयात डॉक्टर होती. तीने एका हॉटेलच्या रूममध्ये जाऊन गळफास घेतला, मृत्यूपूर्वी तीने आपल्या तळहातावर सुसाईड नोट देखील लिहिली होती, या सुसाईड नोटमध्ये निलंबीत पीएसआय गोपाळ बदने आणि प्रशांत बनकर यांच्यावर  गंभीर आरोप केले आहे, गोपाळ बदने याने आपल्यावर अत्याचार केला तर प्रशांत बनकर याच्याकडून आपला शारीरिक आणि मानसिक छळ सुरू होता असा आरोप या महिला डॉक्टरने मृत्यूपूर्वी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये केला आहे. दरम्यान या प्रकरणावरून आता राज्यात वातावरण चांगलंच तापलं आहे.

पोलिसांनी या प्रकरणात प्रशांत बनकर याला आधीच अटक केलं होतं, तर त्यानंतर गोपाळ बदने हा देखील पोलिसांना शरण आला, त्याला अटक करून न्यायालयात हजर केलं असता न्यायालयानं आरोपी बदने याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान या प्रकरणात आता पोलिसांना महत्त्वाचा पुरावा मिळाला आहे. ही घटना ज्या हॉटेलमध्ये घडली होती, तेथील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी जप्त केलं आहे. याबाबत पोलीस अधिकारी तुषार दोषी यांनी माहिती दिली आहे.

नेमकं काय म्हणाले तुषार दोषी? 

जिथे आत्महत्या झाली तेथील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेण्यात आलं आहे,  आज आम्हाला पोस्टमर्टम रिपोर्ट भेटणार आहे.  प्राथमिक आवाहाल हा आत्महत्या केली  असल्याचा आहे.  आरोपीच्या घराची झाडाझाडती घेण्यात आली आहे,  डिजिटल गोष्टी देखील ताब्यात घेण्यात आल्या आहेत.  आरोपी आणि डॉक्टर एकमेकांच्या संपर्कात होते.  4 वेळा अत्याचार झाल्याचं महिलेने सुसाईड नोटमध्ये लिहिले आहे, त्याचा तपास सुरु आहे. बनकर सोबत आत्महत्या करण्यापूर्वी डॉक्टरचं बोलणं झालं होतं. आत्महत्येची आणखी काही कारणं आहेत का? याचा शोध सुरू आहे, अशी माहिती या प्रकरणात तुषार दोषी यांनी दिली आहे.  दरम्यान आता या सीटीटीव्ही फुटेजमधून अनेक महत्त्वाच्या गोष्टींचा उलगडा होण्याची शक्यता आहे.