AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

फुले चित्रपट टॅक्स फ्री करावा, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांची मागणी

महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावरील 'फुले' सिनेमा सेंसॉरच्या कचाट्यातून सुटल्यानंतर रिलीज झाला आहे, केंद्रिय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्यासाठी या सिनेमाचा स्पेशल खेळ आयोजित करण्यात आला होता...

फुले चित्रपट टॅक्स फ्री करावा, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांची मागणी
Ramdas Athawale, Director Ananth Mahadevan
| Updated on: May 03, 2025 | 9:31 PM
Share

महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावरील ‘फुले’ सिनेमा सेंसॉरच्या कचाट्यातून सुटल्यानंतर रिलीज झाला आहे. हा एक ऐतिहासिक आणि क्रांतिकारक सिनेमा आहे. देशभरात नव्या पिढीला महात्मा फुले यांच्या जीवनकार्याची माहिती मिळणे आवश्यक आहे.जे इतिहास विसरतात ते इतिहास घडवू शकत नाहीत त्यामुळे महात्मा ज्योतिबा फुले यांच्या क्रांतीचा इतिहास नव्या पिढीला समजला पाहिजे. त्यासाठी फुले चित्रपट हा देशभरात टॅक्स फ्री झाला पाहिजे अशी आपली मागणी असून त्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले

अंधेरी येथे रामदास आठवले यांच्या साठी फुले सिनेमाचे स्पेशल स्क्रिनिंग करण्यात आले. फुले चित्रपट पाहिल्यानंतर रामदास आठवले यांनी हा चित्रपट देशभरात पोहोचला पाहिजे. त्यासाठी हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित व्हावा आणि फुले या चित्रपटाला करमुक्त करावे अशी आपली मागणी असून त्या बाबतचे पत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देणार असल्याची माहिती रामदास आठवले यांनी दिली.यावेळी फुले चित्रपटाचे दिग्दर्शक अनंत महादेवन आणि निर्माते रितेश कुडेचा रिपाइंचे शैलेशभाई शुक्ला, सिद्धार्थ कासारे, जतीन भुट्टा, प्रकाश जाधव आदी उपस्थित होते.

 राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यासाठी शो दाखवा

महात्मा फुले यांच्या जीवनावरील फुले हा सिनेमा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना राष्ट्रपती भवनात दाखवण्यात यावा अशी विनंती दिग्दर्शक अनंत महादेवन यांनी रामदास आठवले यांना केली. त्यासाठी आपण प्रयत्न करू असे आश्वासन रामदास आठवले यांनी दिले. फुले सिनेमा सर्व सिनेमागृहात दाखवण्यात यावा. सर्वांनी फुले सिनेमा जरूर पाहावा असे आवाहनही रामदास आठवले यांनी यावेळी केले. फुले चित्रपटात प्रतीक गांधी आणि पत्रलेखा यांनी मुख्य भूमिका केलेली आहे. फुले सिनेमामध्ये महात्मा फुले यांचे जीवनकार्य त्यांचे क्रांतिकारी योगदान अत्यंत उत्कृष्टपणे दाखवण्यात आले आहे असे कौतुक रामदास आठवले यांनी केले.

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.