AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रोज रोज दारू पिऊन घराचं वाटोळं करू नका, पत्नीने टोकले अन् पतीने थेट… हसतखेळता संसार उघड्यावर

पिंपरी-चिंचवडमधील चिंचवड भागात दारूच्या व्यसनावरून झालेल्या कौटुंबिक वादातून पतीने ढेकूण मारण्याचे विष पिऊन आत्महत्या केल्याची सविस्तर घटना. पत्नीने दारू पिण्यास विरोध केल्याने पतीने हे टोकाचे पाऊल उचलले.

रोज रोज दारू पिऊन घराचं वाटोळं करू नका, पत्नीने टोकले अन् पतीने थेट... हसतखेळता संसार उघड्यावर
liquor
| Updated on: Jun 03, 2026 | 11:23 AM
Share

पिंपरी-चिंचवड शहरात काही दिवसांपूर्वीच विषारी दारू प्यायल्याने १२ निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाल्याची घटनेमुळे संपूर्ण शहर सुन्न झाले आहे. ही घटना ताजी असताना आता दारुच्या व्यसनापोटी एका कौटुंबिक वादातून पतीने आपले जीवन संपवल्याची धक्कादायक घटना चिंचवड परिसरातून समोर आली आहे. रोज रोज दारू पिऊन घर उद्ध्वस्त करू नका, असे पत्नीने सांगताच पतीचा राग अनावर झाला. त्यामुळे त्याने घरातच असलेले विषारी औषध पिऊन जीवन संपवल्याची घटना घडली आहे. अरविंद लोहार असे मृत व्यक्तीचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

नेमकं काय घडलं?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत अरविंद लोहार यांना गेल्या अनेक वर्षांपासून दारूचे प्रचंड व्यसन जडले होते. ते रोज दारू पिऊन घरी येत असल्याने घरात आर्थिक चणचण आणि सतत मानसिक तणावाचे वातावरण असायचे. अरविंद यांच्या या व्यसनाला त्यांचे कुटुंब आणि विशेषतः त्यांची पत्नी पूर्णपणे कंटाळली होती. संसार वाचवण्यासाठी आणि पतीचे आरोग्य सुधारावे म्हणून पत्नी त्यांना वारंवार दारू सोडण्याचा सल्ला देत असे.

अरविंद हे पुन्हा एकदा दारू पिण्याच्या तयारीत होते. त्यांना दारू पिताना पाहताच पत्नीचा संयम सुटला आणि तिने त्यांना आज दारू पिऊ नका असे म्हणत सक्त विरोध केला. याच गोष्टीवरून दोघांमध्ये नेहमीप्रमाणे कडाक्याचे भांडण झाले. मात्र, यावेळी अरविंद यांचा राग अनावर झाला. पत्नीने आपल्याला दारू पिण्यापासून रोखल्याचा राग सहन न झाल्याने त्यांनी घरातच ठेवलेले ढेकूण मारण्याचे विषारी औषध घेतले.

औषध प्राशन केल्यानंतर काहीच मिनिटांत अरविंद यांना तीव्र वेदना होऊ लागल्या आणि ते जमिनीवर कोसळले. पतीने विष प्यायल्याचे लक्षात येताच पत्नीने आरडाओरडा केला. आवाजाने आजूबाजूचे शेजारी तातडीने मदतीला धावून आले. अरविंद यांना शेजाऱ्यांच्या मदतीने तातडीने पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या थेरगाव येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयातील डॉक्टरांनी तातडीने आयसीयू (ICU) मध्ये त्यांच्यावर उपचार सुरू केले. मात्र, विष शरीरात वेगाने पसरल्यामुळे त्यांची प्रकृती ढासळत गेली. दुर्दैवाने उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

चिंचवड पोलिसांकडून तपास सुरू

या घटनेची माहिती मिळताच चिंचवड पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि अंमलदार यांनी थेरगाव रुग्णालयात धाव घेतली. पोलिसांनी मृतदेहाचा पंचनामा करून तो शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. प्राथमिक माहितीच्या आधारे पोलिसांनी सध्या ‘आकस्मिक मृत्यू’ची (ADR) नोंद केली आहे. अरविंद लोहार यांनी हे पाऊल केवळ रागाच्या भरात उचलले की यामागे आणखी काही कौटुंबिक कारणे होती, याचा सखोल तपास चिंचवड पोलीस करत आहेत.

Follow Us
ठाकरेंच्या खासदारांना मोठं गिफ्ट? मंत्रिपदासाठी रस्सीखेच,बंड करण्याआधी
ठाकरेंच्या खासदारांना मोठं गिफ्ट? मंत्रिपदासाठी रस्सीखेच, बंड करण्याआधीच...ऑपरेशन लोटसबाबत मोठी माहिती समोर!
राजकीय हालचालींना वेग! ठकारेंचे चार खासदार उद्या दिल्लीत, कारण... मोठं
राजकीय हालचालींना वेग! ठकारे सेनेतील चार खासदार उद्या दिल्लीत, कारण... मोठं घडणार?
धक्कादायक! फ्लॅट घेण्यच्या बहाण्याने लव्ह जिहाद? नंतर नशेत तिला...
धक्कादायक! फ्लॅट घेण्यच्या बहाण्याने लव्ह जिहाद? नंतर नशेत तिला... नागपूरमध्ये डोकं चक्रावणारा प्रकार
काँग्रेसमधील अंतर्गत संघर्ष चव्हाट्यावर... गटनेतेपदाचा वाद पुन्हा एकद
Chandrapur | काँग्रेसमधील अंतर्गत संघर्ष चव्हाट्यावर...  गटनेतेपदाचा वाद पुन्हा एकदा चिघळणार
महिलांसाठी सरकारची मोठी घोषणा! बचत गटांना एक लाख रुपये आणि जमीन देणार
Chandrashekhar Bawankule | महिलांसाठी सरकारची मोठी घोषणा! बचत गटांना एक लाख रुपये आणि जमीन देणार
तिच्यासोबत काम करणारेच... संचिताच्या वडिलांना रडूच कोसळं; संशयाचा काटा
Sanchita Ugle Case | तिच्यासोबत काम करणारेच... संचिताच्या वडिलांना रडूच कोसळलं; संशयाचा काटा नेमका कुणावार
एकही मत फुटता कामा नये; महायुतीसाठी एकनाथ शिंदेंच्या पक्षाचा व्हीप
एकही मत फुटता कामा नये; विधान परिषद निवडणुकीत महायुतीसाठी एकनाथ शिंदेंच्या पक्षाचा व्हीप
उपचाराच्या बहाण्याने डॉक्टरची घृणास्पद कृती; अन् पुढे जे घडलं....
मोठी बातमी! पांढऱ्या कोटामागचा काळा चेहरा? उपचाराच्या बहाण्याने डॉक्टरची घृणास्पद कृती; अन् पुढे जे घडलं....
ऑपरेशन टायगर खरंच सुरू आहे? प्रश्न विचारताच एकनाथ शिंदेंनी हात वर केल
ऑपरेशन टायगर खरंच सुरू आहे? प्रश्न विचारताच एकनाथ शिंदेंनी हात वर केला अन्...त्या कृतीची सगळीकडे चर्चा!
मंदा म्हात्रे यांचे मंत्री गणेश नाईक यांच्यावर पुन्हा गंभीर आरोप..
Manda Mhatre | मंदा म्हात्रे यांचे मंत्री गणेश नाईक यांच्यावर पुन्हा गंभीर आरोप, भाजपाचे दोन्ही नेत्यांमध्ये मोठा वाद!