Pimpri-Chinchwad Election 2026 : उमेदवार अपक्ष, चिन्ह मात्र थेट घड्याळाचं, नेमकं काय घडलं ?

पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणुकीत मोठी चर्चा सुरू आहे. अर्ज छाननीदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसच्या जयश्री भोंडवे यांचा एबी फॉर्म गहाळ झाल्याने त्यांना अपक्ष ठरवण्यात आले. मात्र, उच्च न्यायालयाच्या हस्तक्षेपानंतर आणि तांत्रिक पुराव्यांमुळे त्यांना अखेरीस राष्ट्रवादीचे 'घड्याळ' चिन्ह परत मिळाले. या अनपेक्षित घडामोडीमुळे शहरात मोठी खळबळ उडाली आहे.

Pimpri-Chinchwad Election 2026 : उमेदवार अपक्ष, चिन्ह मात्र थेट घड्याळाचं, नेमकं काय घडलं ?
अपक्ष उमेदवाराला थेट घड्याळाचं चिन्ह
Image Credit source: TV9 Marathi
| Updated on: Jan 05, 2026 | 10:00 AM

राज्यातील महानगर पालिकांची निवडणूक अवघ्या 10 दिवसांवर आलं असून चिन्ह वाटपानंतर उमेवारांचा जोरदार प्रचार सुरू झाला आहे. गल्ली-बोल, इमारती, बंगले, रस्ते, रोड सगळीकडे विविध पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते वगैरे आपल्या उमेदवाराच्या प्रचारासाठी रात्रंदिवस फिरताना दिसत आहेत. महापालिकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारांची अंतिम यादी जाहीर झाली. त्यानंतर प्रमुख पक्ष वगळता अन्य अपक्ष आणि छोट्या पक्षाच्या उमेदवारांना चिन्हांचे वाटप करण्यात आलं. मात्र पिंपरी चिंचवडमध्ये घडलेल्या एका प्रकाराने खळबळ माजली असून सध्या सगळीकडे त्याबद्दलच चर्चा सुरू आहे. पिंपरी चिंचवडमध्ये अर्ज छाननीनंतर अपक्ष ठरलेल्या उमेदवाराला चक्क घड्याळाचं, म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचं चिन्हे देण्यात आलं. हे कसं काय घडलं असा प्रश्न सर्वांच्याच मुखी असून सध्या सर्व्तर या अपक्ष उमेदवार आणि त्यांच्या चिन्हाबद्दलच चर्चा सुरू आहे.

मिळालेल्या माहिताीनुसार, पिंपरी चिंचवड येथून जयश्री भोंडवे या राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाच्या अधिकृत उमेदवार होत्या. मात्र त्यांच्यासोबत अघटित घडलं. भोंडवे यांनी भरलेला त्यांचा एबी फॉर्म हाच गहाळ झाला. त्यामुळे मोठी खळबळ माजली. आता कसं करायचं , काय होईल असाच प्रश्न सर्वांना पडला.

थेट न्यायालयात धाव

मात्र एबी फॉर्म गहाळ झाल्यानतंर छाननीमध्ये जयश्री भोंडवे यांना अपक्ष उमेदवार म्हणून ठरवण्यात आलं. पण त्या हिंमत हरल्या नाहीत. जयश्री भोंडवे यांनी थेट उच्च न्यायालयात धाव घेतली.तेथे जाऊन त्यांनी सीसीटीव्ही फुटेज, व्हिडिओग्राफी, तसेच इतर सर्व तांत्रिक पुरावे सादर केले. त्यांनी खरंच राष्ट्रवादीकडून अर्ज, एबी फॉर्म भरला होता, यातत तथ्य असल्याचं आढळलं. त्यानंत न्यायालयाने निवडणूक आयोगाला हे पुरावे तपासण्यासाठी स्वतंत्र सुनावणीचे आदेश दिले.

सुनावणीत काय आढळलं ?

न्यायालयाच्या आदेशानुसार, महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी चिन्ह वाटपाच्या दिवशीच याप्रकरणी तातडीने सुनावणी घेतली. तेव्हा जयश्री भोंडवे यांनी वेळेतच एबी फॉर्म सादर केला. हेच हर्डीकर यांच्याही निदर्शनास आलं. अखेर हर्डीकर यांनी जयश्री भोंडवे यांचा भरलेला एबी फॉर्म ग्राह्य धरला. त्यामुळेच अर्ज छाननीच्या अंतिम यादीत जयश्री भोंडवे या अपक्ष ठरल्या, मात्र चिन्हांचे वाटप करताना भोंडवे यांना चिन्ह म्हणून घड्याळ हेच ( राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची निशाणी) देण्यात आल्याचे जाहीर करण्यात आलं. पिंपरी चिंचडवडमधील या घटनेची सध्या सगळीकडेच चर्चा सुरू आहे.