AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

7 भटक्या कुत्र्यांनी चिमुरडीचे 46 सेकंद लचके तोडले, शरीरावर असंख्य जखमा, 90 टाके; पिंपरीतील थरकाप उडवणारी घटना

Pimpri Chinchwad Dog Attack : पुण्याच्या पिंपरी चिंचवडमधून थरकाप उडवणारी बातमी समोर आली आहे. पिंपरी चिंचवड शहरातील भटक्या कुत्र्यांनी एका 5 वर्षीय चिमुकलीवर हल्ला करत अक्षरश तिचे लचके तोडले.

7 भटक्या कुत्र्यांनी चिमुरडीचे 46 सेकंद लचके तोडले, शरीरावर असंख्य जखमा, 90 टाके; पिंपरीतील थरकाप उडवणारी घटना
Pimpri Chinchwad Dog AttackImage Credit source: TV 9 Marathi
बापू गायकवाड
बापू गायकवाड | Updated on: Aug 10, 2026 | 5:07 PM
Share

राज्यात सध्या भटक्या कुत्र्यांची संख्या वाढल्याचे समोर आले आहे. याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. अशातच आता पुण्याच्या पिंपरी चिंचवडमधून थरकाप उडवणारी बातमी समोर आली आहे. पिंपरी चिंचवड शहरातील भटक्या कुत्र्यांनी एका 5 वर्षीय चिमुकलीवर हल्ला करत अक्षरश तिचे लचके तोडले. ज्यामुळे या चिमुकलीच्या शरीरावर असंख्य जखमा झाल्या असून त्या जखमावर तब्बल 85 ते 90 टाके घालवे लागले आहेत. सुदैवाने या घटनेत जखमी झालेली अशिंका मिश्रा ही चिमुकली बचावली आहे मात्र या घटनेनं पिंपरी चिंचवड महापालिका प्रशासनाने तब्बल 7 कोटी खर्च करून खरच शहरातील भटक्या कुत्र्यांची नसबंदी करण्यात आली होती का? असा प्रश्न विचारला जात आहे.

चिमुकलीवर 46 सेकंद हल्ला

समोर आलेल्या माहितीनुसार, पिंपरी चिंचवडच्या म्हेत्रे वस्ती भागात भटक्या कुत्र्यांनी चिमुरडीवर हल्ला केला. 7 भटक्या कुत्र्यांनी चिमुरडीला सर्व बाजूंनी घेरलं. या हल्ल्यामुळे 5 अंशिका जमिनीवर कोसळली. यानंतर कुत्र्यांनी अंशिकाच्या शरीराचे 46 सेकंद लचके तोडले. यानंतर आसपासचे लोक धावून आले. तोपर्यंत अंशिकाच्या शरीरावर असंख्य जखमा झाल्या होत्या. स्थानिकांनी तातडीने अंशिकाला रुग्णालयात दाखल केले. या हल्ल्यामुळे अंशिकाच्या शरीरावर तब्बल 90 टाके पडले आहेत.

शरीरावर 90 टाके

या घटनेवर बोलताना अंशिकाचे वडील गिरीधर मिश्रा यांनी सांगितले की, सुरुवातीला एक कुत्रा आला आणि त्याने हल्ला केला. त्यानंतर इतरही कुत्री आली आणि त्यांनीही हल्ला केला. यात अंशिकाच्या डोक्याला, पायाला गंभीर जखमा झाल्या आहेत. डोक्याला, हाताला आणि पायाला 90 टाके पडले आहेत. या भागात नेहमीच भटकी कुत्री असतात, यामुळे नागरिकांनाही त्रासाचा सामना करावा लागत आहे.

कल्याणमध्येही कुत्र्यांची दहशत

कल्याणमध्ये पिसाळलेल्या कुत्र्याची दहशत पहायला मिळत आहे. काल दिवसभरात शंभर पेक्षा अधिक जणांना कुत्रे चावल्याची माहिती समोर आली आहे. तर आज सकाळपासून 50 ते 60 नागरिकांना कुत्र्यांनी चावा घेतला आहे. यामुळे उपचारासाठी रुग्णालयात लांबच लांब रांग लागली आहे. केस पेपर काढण्यासाठी केवळ एकच खिडकी सुरू असल्याने नागरिकांना दोन ते तीन तास प्रतीक्षा करावा लागत आहे. रक्तस्राव झालेले रुग्ण, वयोवृद्ध, महिला आणि लहान मुले यांना रांगेत उभे राहून त्रासाचा सामना करावा लागत आहे. काही रुग्णांना प्रतीक्षा करताना चक्कर येत असल्याचेही समोर आले आहे.

Follow Us
लालबागचा राजा ते साकीनाक्याचा... मुंबईच्या गणपतींची अनोखी कलाकुसर
Ganpati Idol : लालबागचा राजा ते साकीनाक्याचा महाराजा; कुठे 45 अंशात झुकलेली मूर्ती, तर कुठे... मुंबईच्या गणपतींची अनोखी कलाकुसर
गणपतीची आरती मुस्लिम बांधवांनी केली, हिंदू बांधवांनी...
Jalgaon : गणपतीची आरती मुस्लिम बांधवांनी केली, हिंदू बांधवांनी... जळगावात 1970 पासूनची राष्ट्रीय एकात्मतेची अनोखी परंपरा कायम
लालबागचा राजा ते दगडूशेठ हलवाई! मुंबई-पुण्यात विसर्जन मिरवणुकीला
Ganpati Visarjan : लालबागचा राजा ते दगडूशेठ हलवाई! मुंबई-पुण्यात बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीला लाखो भाविकांची गर्दी
ऊन-पावसाची पर्वा नाही, रस्त्यांवर भक्तांचा महासागर! बाप्पाला निरोप
Ganpati Visarjan : ऊन-पावसाची पर्वा नाही, रस्त्यांवर भक्तांचा महासागर! मुंबई, पुणे, नाशिकमध्ये गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषात लाडक्या बाप्पाला निरोप
ही शान कोणाची? लालबागच्या राजाची...श्रॉफ बिल्डिंगजवळ लालबागच्या राजावर
ही शान कोणाची? लालबागच्या राजाची...श्रॉफ बिल्डिंगजवळ लालबागच्या राजावर पुष्पवृष्टी
93 वर्षांची परंपरा, लाखो भक्तांची श्रद्धा... लालबागच्या राजाची मिरवणूक
Lalbaugcha Raja : 93 वर्षांची परंपरा, लाखो भक्तांची श्रद्धा अन्... लालबागच्या राजाची भव्य मिरवणूक बघाच
घोषणा नको, शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे द्या; छावा संघटनेचं आमरण उपोषण
Latur Drought : घोषणा नको, शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे द्या; छावा संघटनेचं आमरण उपोषण
शान कुणाची? लालबागच्या राजाची! जयघोषाने मुंबई दुमदुमली...
Lalbaugcha Raja : शान कुणाची? लालबागच्या राजाची! जयघोषाने मुंबई दुमदुमली...
चिंतामणीच्या मिरवणुकीतील छोट्या गणेशभक्ताचा VIDEO व्हायरल
Chinchpokli Chintamani : ढोल-ताशांच्या गजरात चिमुकला थिरकला! चिंतामणीच्या मिरवणुकीतील छोट्या गणेशभक्ताचा VIDEO व्हायरल
मी जेव्हा जेव्हा सांगतो मी पुन्हा येईल, तेव्हा... फडणवीसांचा तो डायलॉग
Devendra Fadnavis : मी जेव्हा जेव्हा सांगतो मी पुन्हा येईल, तेव्हा मी येतोच! फडणवीसांचा तो जुना डायलॉग पुन्हा चर्चेत