हायस्पीड रेल्वे मार्गासाठी चक्काजाम, आमदार सत्यजित तांबे पोलिसांच्या ताब्यात, आंदोलक अन् पोलिसांमध्ये झटापट..

नाशिक-पुणे रेल्वेसाठी जोरदार आंदोलन करण्यात आले. आंदोलक अधिक आक्रमक होताना दिसत आहेत. पोलिसांनी सत्यजित तांबे यांना ताब्यात घेतले. आंदोलकांनी सत्यजित तांबे यांची गाडी अडकवण्याचा प्रयत्न केला.

हायस्पीड रेल्वे मार्गासाठी चक्काजाम, आमदार सत्यजित तांबे पोलिसांच्या ताब्यात, आंदोलक अन् पोलिसांमध्ये झटापट..
MLA Satyajeet Tambe
| Updated on: Aug 09, 2026 | 11:50 AM

नाशिक-पुणे रेल्वेसाठी आज समृद्धी महामार्गावर रास्तारोको आंदोलन करण्यात आले.  नाशिक-पुणे सेमी हायस्पीड रेल्वे मार्ग पूर्वीच्याच मूळ आराखड्यानुसार करण्याची मागणी केली जात आहे. सिन्नर, संगमनेर, अकोले, नाशिक येथील नागरिक रस्त्यावर उतरून चक्कजाम आंदोलन करत आहेत. आमदार सत्यजित तांबे या आंदोलनात सहभागी झाले. सत्यजित तांबे आणि पोलिसांमध्ये झटापट झाली. आंदोलक आक्रमक होताना दिसत आहेत. समृद्धी महामार्ग देखील काही ठिकाणी रोखण्यात आला. नाशिक पुणे मार्गावर आज आंदोलनामुळे वाहतूक कोंडी होताना दिसतंय. आंदोलकांची संख्या वाढताना दिसतंय. यादरम्यान पोलिसांनी आमदार सत्यजित तांबे यांना ताब्यात घेतले. सत्यजित तांबे यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर आंदोलक अधिक आक्रमक झाले.

हेच नाही तर पोलिसांची गाडी अडवण्याचा प्रयत्नही पोलिसांकडून करण्यात आला. संगमनेर येथेही आंदोलन सुरू आहे. पुणे-नाशिक रेल्वेचा मार्ग खेड मंचर नारायणगाव या भागातून झाला पाहिजे, या मागणीसाठी आज चाकण, मंचर ,नारायणगाव आळेफाटा येथे चक्काजाम आंदोलन करण्यात येत आहे. क्रांती दिनाचे औचित्य साधत पुणे-नाशिक रेल्वे कृती समिती, च्या वतीने हे आंदोलन पुकारण्यात आलं आहे.

पुणे-नाशिक रेल्वेचा मार्ग खेड तालुक्यातूनच झाला पाहिजे, या मागणीसाठी आता आंदोलनाची धार तीव्र झाली आहे.
आज चाकण तळेगाव चौकातील पुणे-नाशिक महामार्गावर भव्य चक्काजाम आंदोलन करण्यात येतंय. यादरम्यान मंत्री गिरीश महाजन यांनी सत्यजित तांबे यांच्यासोबत संवाद साधला. मात्र, सत्यजित तांबे आपल्या आंदोलनाच्या भूमिकेवर ठाम राहिले.

यादरम्यान बोलताना सत्यजित तांबे यांनी म्हटले की, महिलांचे स्वतंत्र्य आंदोलन होईल. नाशिक पुणे शहर जवळ आणण्याच्या हेतूने सगळ्या गावांची प्रगती करण्यासाठी पाठपुरावा सुरू झाला. मागच्या 25 वर्षापासून आम्ही हेच ऐकत आहोत रेल्वे होणार. भू संपादन झालेले शेतकरी कडे पैसे मागण्यासाठी आले तर ते कुठून देईल. रेल्वे भू संपादन साठी चांगली होती रेल्वे स्टेशन टेंडर साठी चांगली मग काय झाले, असेही यादरम्यान त्यांनी म्हटले.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us