मोठी बातमी! निवडणूक आयोगावर आरोप करणं भोवलं, CSDS प्रमुख संजय कुमारांवर गुन्हा दाखल

सीएसडीएसचे प्रमुख संजय कुमार यांच्याविरोधात नाशिक तसेच नागपुरात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महाराष्ट्रातील मतदारयाद्यांत मोठा घोळ असल्याचा आरोप त्यांनी केला होता. या आरोपांविरोधात निवडणूक आयोगाने पोलिसांत तक्रार दाखल केली होती. त्यानंतर आता हे गुन्हे दाखल करण्यात आले असून संजय कुमार यांची अडचण वाढली असल्याचे म्हटले जात आहे.

मोठी बातमी! निवडणूक आयोगावर आरोप करणं भोवलं, CSDS प्रमुख संजय कुमारांवर गुन्हा दाखल
sanjay kumar
| Updated on: Aug 20, 2025 | 9:11 PM

Election Commission : सीएसडीएसचे प्रमुख संजय कुमार यांच्याविरोधात नाशिक तसेच नागपुरात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महाराष्ट्रातील मतदारयाद्यांत मोठा घोळ असल्याचा आरोप त्यांनी केला होता. या आरोपांविरोधात निवडणूक आयोगाने पोलिसांत तक्रार दाखल केली होती. त्यानंतर आता हे गुन्हे दाखल करण्यात आले असून संजय कुमार यांची अडचण वाढली असल्याचे म्हटले जात आहे.

तहसीलदारांनी केली होती तक्रार दाखल

काही दिवसांपूर्वी सीएसडीएस यांनी सोशल मीडियावर महाराष्ट्रातील मतदारयाद्यांत घोळ असल्याचा दावा केला होता. त्यासाठी त्यांनी रामटेक मतदारसंघाचे उदाहरणही दिले होते. संजय कुमार यांचा हा दावा खोटा असून मतदारांची दिशाभूल करणारा असल्याची भूमिका घेत रामटेकच्या तहशीलदारांनी तक्रार दाखल केली होती. याच तक्रारीनुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे आता संजय कुमार यांच्या अडचणी वाढल्याचे म्हटले जात आहे.

संजय कुमार यांनी काय दावा केला होता?

संजय कुमार यांनी काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एक पोस्ट केली होती. यासंदर्भात नाशिकच्या जिल्हा प्रशासनाने माहिती दिली होती. या माहितीनुसार संजय कुमार यांनी 2024 झालेल्या लोकसभा आणि महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत देवळाली विधानसभा मतदारसंघाबाबत चुकीची माहिती दिली होती. यानंतर पोलिसात तक्रार दाखल करण्यात आल्याचे नाशिक जिल्हा प्रशासनाने सांगितले होते.

संजय कुमार यांनी मागितली होती माफी

संजय कुमार यांच्या पोस्टनंतर चांगलेच वादंग माजले होते. वाद पेटल्यानंतर संजय कुमार यांनी माफी मागितली होती. 2024 साली झालेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या डेटाची तुलना करताना चुक झाली. आमच्या टीमकडून या डेटाचा चुकीच्या पद्धतीने अभ्यास करण्यात आला. त्यामुळेच मी ट्वीट काढून टाकला. चुकीची माहिती पसवरण्याचा माझा कोणताही उद्देश नव्हता, असे स्पष्टीकरण कुमार यांनी दिले होते.

संजय कुमार यांनी नेमका काय दावा केला होता?

संजय कुमार यांनी 17 ऑगस्ट रोजी एक ट्विट केले होते. या ट्विटमध्ये त्यांनी नाशिक पश्चिम मतदारसंघात 2024 सालच्या लोकसभा निवडणुकीत एकूण 328,053 मतदार होते. 2024 सालच्या विधानसभा निवडणुकीत मतदारांचा हाच आकडा 483,459 पर्यंत वाढला. म्हणजेच मतदारांची संख्या एकूण 47.38 टक्क्यांनी वाढली. हिंगणा मतदारसंघातही मतदार 314,605 हून 450,414 एवढे झाले. ही वाढ 43.08 टक्के आहे, असे संजय कुमार यांनी म्हटले होते. वाद झाल्यानंतर त्यांनी हे ट्विट डिलिट केले होते.