प्रदीप पूर्णेकर प्रकरणात अत्यंत मोठी अपडेट, थेट पोलिसांचे मोठे पाऊल, टल्लीचे..
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात एका मागून एक धक्कादायक खुलासे होत आहेत. त्यातच आता पोलिसांना या प्रकरणात मोठे यश मिळाले. प्रदीप पूर्णेकर प्रकरणात हे यश म्हणावे लागेल. या प्रकरणातील दोन आरोपी अजून फरार आहेत.

शिवसेना ठाकरे गटाचे विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर प्रकरणात एका मागून एक मोठे खुलासे होताना दिसत आहेत. तपास वेगाने होण्यासाठी पाऊले उचलली जात आहेत. शिवसेना उद्धव ठाकरे गट आक्रमक भूमिका घेताना दिसत आहेत. स्वत: उद्धव ठाकरे पूर्णेकरांच्या घरी गेले. यासोबतच शिवसेनेचे बडे नेतेही प्रदीप पूर्णेकर यांच्या घरी पोहोचले होते. पूर्णेकर प्रकरणात गंभीर आरोप केली जात आहेत. शिवसेना शिंदे गटाच्या माजी महापाैर यांच्यावर थेट आरोप केली जात आहेत. शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या मिनाक्षी शिंदे यांच्यावर गंभीर आरोप केली जात आहेत. जबावात मिनाक्षी शिंदे आणि त्यांच्या पतीचे नाव घेण्यात आले. मिनाक्षी शिंदे यांनी अगोदरच स्पष्ट केले की, आपला या प्रकरणात काहीच संबंध नाही. माझ्यावर चुकीचे आरोप केले जात आहेत. काहीच पुरावे नसताना हे आरोप होत आहेत. दिशा सालियान प्रकरणात अगोदर आदित्य ठाकरेंना अटक करा आणि मग माझ्यावर आरोप करा, असे त्यांनी म्हटले.
त्यातच आता प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी अपडेट पुढे येत आहे. ठाणे गुन्हे शाखेकडून वेगाने तपास सुरू आहे. आता नवीन माहिती प्रकरणात पूर्णेकर यांच्यावर ज्यावेळी हल्ला झाला त्यावेळी पाच जण तिथे उपस्थित असल्याची माहिती पुढे येतंय. त्यापैकी तिघांना पोलिसांनी अटक केली. संतोष कनोजिया ऊर्फ टल्ली आणि आणखी एक आरोपी फरार आहे. त्यापैकी आता पोलिसांना मोठे यश मिळाले असून टल्लीचे लोकेशन पोलिसांच्या हाती लागले आहे.
या प्रकरणाला सात दिवस होत आहेत. पण अजूनही पोलिसांच्या हाती दोन आरोपी लागले नाहीत. संतोष कनोजिया हा दुसऱ्या राज्यात फरार झाल्याची माहिती मिळतंय. त्याचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे. पोलिसांकडून टल्ली विरोधात लूकआऊट नोटीस जारी केली. संतोष कनोजिया ऊर्फ टल्ली हा सतत आपले लोकेशन बदलत असल्याची माहिती मिळतंय.
पोलिसांनी आतापर्यंत 3 आरोपींना अटक केली. सोमवारी पप्या शिंदे याला पोलिसांनी कोर्टात हजर केले. पण तो सतत पोलिसांना फिरवत असल्याचे पोलिसांनी म्हटले. पप्या शिंदे याने सर्व आरोपींना गोव्याला पळून जाण्यासाठी कारची व्यवस्था देखील केली होती. हा कट गेल्या काही दिवसांपासून रचला जात होता. टल्ली याने एका बाईकची व्यवस्था केली. पप्या शिंदे याने आरोपींना तब्बल 150 वेळा फोन केल्याची माहिती पुढे आली.
