पंढरपूर विठ्ठल मंदिरात VIP च्या नावाखाली दर्शनाचा काळाबाजार, पोलीस अन् माजी व्यवस्थापकाची बाचाबाची
श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे माजी व्यवस्थाक बालाजी पुदलवाड श्री विठ्ठल दर्शनासाठी काही भाविकांना व्हीआयपी गेट येथून घेऊन जात होते. यावेळी पोलिसांनी त्यांना रोखले. त्याचा व्हिडिओ नागरिकांनी व्हायरल करत पोलिसांचा सत्कार केल.ा

आषाढी एकदशी निमित्ताने राज्यभरातून विविध देवस्थानांच्या पालख्या पंढरपुरात विठ्ठलाच्या दर्शनासाठी निघाल्या आहेत. आषाढी पूर्वीच पंढरपुरात भाविकांची मोठी गर्दी होऊ लागली आहे. त्याचवेळी पंढरपूर येथील श्री विठ्ठल मंदिरात दर्शनाचा काळाबाजारचा प्रकार समोर आला आहे. हा प्रकार रोखण्यासाठी पोलीस प्रशासन सरसावले आहे. त्यावेळी माजी व्यवस्थापकासोबत पोलिसांची बाचाबाची झाली. व्हीआयपी गेटवर माजी व्यवस्थापक काही भाविकांना घेऊन जात असताना पोलिसांनी अडवले. नागरिकांनी त्याचा व्हिडिओ व्हायरल केला. तसेच व्हिआयपी दर्शन रोखणाऱ्या पोलिसांचा सत्कार केला. दरम्यान, आता मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी परिपत्रक काढून दर्शनाचा काळाबाजार रोखण्याचा प्रयत्न केला.
पंढरपुरात रंगली चर्चा
श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे माजी व्यवस्थाक बालाजी पुदलवाड श्री विठ्ठल दर्शनासाठी काही भाविकांना व्हीआयपी गेट येथून घेऊन जात होते. यावेळी पोलिसांनी त्यांना रोखले. व्हीआयपी गेटवरील संबंधित पोलीस कर्मचारी आणि श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरातील पूर्व व्यवस्थापक यांच्यात बाचाबाची झाली. विठ्ठलाच्या दरबारात बालाजी पुदलवाड यांना पोलिसांनी अडवल्याने शहरात चर्चा रंगली आहे.
नागरिकांकडून सत्कार
बालाजी पुदलवाड यांनी श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर समितीचे ७ वर्षे व्यवस्थापक म्हणून काम पाहिले आहे. त्यानंतर व्हीआयपी गेटवर बालाजी पुदलवाड यांना अडवून पोलिसांनी दर्शनसाठी घुसखोरी होऊ दिली नाही. नागरिकांनी त्या प्रकाराचा व्हिडिओ व्हायरल केला. त्यानंतर व्हिआयपी दर्शन रोखणाऱ्या पोलिसांचा सत्कारही केला.
श्री विठ्ठल मंदिरात दर्शनबारीमध्ये घुसखोरी व व्हिआयपीच्या नावाखाली दर्शनाचा काळाबाजार सुरु होता. त्यानंतर आता श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी परिपत्रक काढून दर्शनाचा काळाबाजार रोखण्याचा प्रयत्न केल्याचे म्हटले आहे.
आषाढी निमित्ताने राज्यभरातून विविध देवस्थानांच्या पालखी या पंढरपुरात विठ्ठलाच्या दर्शनासाठी निघाल्या आहेत. त्रंबकेश्वराच्या निवृत्तीनाथ महाराज पालखी, शेगाववरुन संत एकनाथ महाराज यांची पालखी, मुक्ताईनगर येथील संत मुक्ताईची पालखी निघाली आहे. आषाढी एकादशीला या सर्व पालख्या पंढरपुरात एकत्र येणार आहेत.
आषाढी यात्रेसाठी पंढरपुरात रेल्वेच्या विशेष फेऱ्या
आषाढी यात्रेसाठी पंढरपुरात रेल्वेच्या विशेष फेऱ्या होणार आहे. कलबुर्गी , नागपूर ,अमरावती, भुसावळ, लातूर, मिरज , पुणे येथून पंढरपूरकडे धावणार विशेष रेल्वे गाड्या धावणार आहे. दोन जुलैपासून 10 जुलैपर्यंत पंढरपूरसाठी विशेष रेल्वे गाड्यांची घोषणा मध्य रेल्वेने केली आहे. मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागाकडून आषाढीसाठी विशेष रेल्वे गाड्यांची व्यवस्था केली आहे. रेल्वेच्या तब्बल 80 फेऱ्या असल्याने लाखो भाविकांचा पंढरपूर वारीचा प्रवास सुखकर होणार आहे.
