AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

खवड्या डोंगरावरील घटनास्थळाला पोलिसांची रात्रीची भेट, चांदगुडे कुटुंबाच्या मृ्त्यूनंतर..हालचाली

खवड्या डोंगराची पोलिसांनी पाहण्यासाठी घटनेच्या रात्री या घटनास्थळावर पोलिसांनी जाऊन पाहणी केली आहे. या डोंगरावर प्रतिबंधक उपाय केल्यास भविष्यात असे प्रकार घडणार नाहीत अशी आशा व्यक्त केली जात आहे.

खवड्या डोंगरावरील घटनास्थळाला पोलिसांची रात्रीची भेट, चांदगुडे कुटुंबाच्या मृ्त्यूनंतर..हालचाली
khavdya dongar police visit
| Updated on: Aug 23, 2026 | 11:54 PM
Share

ज्ञानेश्वर लोंढे, प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर :  छत्रपती संभाजीनगरातील खवड्या डोंगरावरुन चांदगुडे कुटुंबाचा दुर्दैवी अंताने आता या डोंगराचा एक काळा इतिहास असल्याचे उघडकीस आहे. येथे यापूर्वी अनेकांना स्वत:ला झोकून दिले आहे किंवा त्यांना वेळीच पोलिसांनी वाचवले आहे. मात्र,यावेळी कुणाल चांदगुडे आणि त्याचे वडिलांना वाचवता आले नाही. वडील पुढे गेले आणि कुणालला पकडले मात्र, दोघांचाही तोल जाऊन ते थेट खाली दगडांवर कोसळले. त्यानंतर कुणाल याच्या आईने देखील डोंगरावरुन स्वत:ला झोकून जीवन संपवल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. शनिवारी रात्री खवड्या डोंगराला पोलीस उपायुक्तांचे पथक आणि आमदारांनी भेट दिली.

चांदगुडे कुटुंबातील तिघांच्या मृत्यूनंतर संभाजीनगरातील खवड्या डोंगरस्थळाची पोलिसांनी गंभीरपणे दखल घेतली आहे. शनिवारी या ठिकाणी पोलीस उपायुक्त रत्नाकर नवले यांच्यासह अधिकाऱ्यांची टीम रात्री घटनास्थळी पाहणी करण्यासाठी आली होती. या खवड्या डोंगरावर यापूर्वीही अनेक आत्महत्येच्या अनेक घटना घडल्या आहेत. काही घटनांमध्ये पोलिसांनी वेळीच पोहोचून काही तरुण-तरुणींचे प्राण वाचवल्याचा इतिहास आहे. भविष्यात आत्महत्या सारख्या घटना रोखण्यासाठी सुरक्षेच्या उपाययोजनांची पाहणी करण्यासाठी पोलिस आता विचार करत आहेत.

खवड्या डोंगरावर जाऊन पाहणी

छत्रपती संभाजीनगरमधील खवड्या डोंगरावर चांदगुडे कुटुंबातील तिघांच्या दुर्दैवी मृत्यूनंतर आता पोलिसांनी या प्रकाराची गंभीर दखल घेतली आहे. पोलीस उपायुक्त रत्नाकर नवले यांच्यासह पोलिस अधिकाऱ्यांनी रात्री खवड्या डोंगरावर जाऊन पाहणी केली. विशेष म्हणजे, या डोंगरावर यापूर्वीही अनेक तरुण-तरुणींनी उडी घेत जीवन संपवल्याच्या घटना घडल्या आहेत. तर काही घटनांमध्ये वाळूज एमआयडीसी पोलिसांनी वेळीच घटनास्थळी पोहोचून तरुण-तरुणींचे प्राण वाचवले आहेत. त्यामुळे भविष्यात अशा घटना रोखण्यासाठी खवड्या डोंगरावर कोणत्या सुरक्षात्मक उपाययोजना करता येतील, याची पोलिसांकडून पाहणी करण्यात आली यावेळी शिवसेनेचे आमदार प्रदीप जैस्वालही उपस्थित होते.

Follow Us
मुलांसाठी मैदानं ठेवताय कुठे? आदित्य ठाकरेंचा फडणवीसांना थेट सवाल
Aaditya Thackeray on Devendra Fadnavis : मुलांसाठी मैदानं ठेवताय कुठे? आदित्य ठाकरेंचा फडणवीसांना थेट सवाल
लक्ष्मण हाकेंची मागणी: २ सप्टेंबरचा शासन निर्णय तातडीने रद्द करा
ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंचा इशारा: मागण्या पूर्ण न झाल्यास राजकीय नेत्यांना भेटणार नाही
साखरेची साठेबाजी रोखण्यासाठी सरकारचं मोठं पाऊल
New Sugar Stock Norms : साखरेची साठेबाजी रोखण्यासाठी सरकारचं मोठं पाऊल
पवारांची राष्ट्रवादी-मोदी भेटीवरून वडेट्टीवारांचं विधान
Vijay Wadettiwar: काय शिजतंय ते आम्ही बघतोय, पवारांची राष्ट्रवादी-मोदी भेटीवरून वडेट्टीवारांचं विधान
मदतीसाठी तरुणांनी थेट खासदार ओमराजे निंबाळकरांना लावला फोन
पुणे रेल्वे स्थानकावर 2 तरुणांना टीसीने पकडलं, मदतीसाठी तरुणांनी थेट खासदार ओमराजे निंबाळकरांना लावला फोन
चांदगुडे कुटुंबामागे उरलं फक्त भयाण घर आणि कुटुंबाची वाट पाहणारा शेरू
Sambhajinagar : चांदगुडे कुटुंबामागे उरलं फक्त भयाण घर आणि कुटुंबाची वाट पाहणारा शेरू , 3 दिवसानंतर शेरुची सुटका
चाकण MIDCच्या विकासासाठी शिंदेंची बैठक,ठाकरेंच्या आमदाराची उपस्थिती
चाकण एमआयडीसीच्या विकासासाठी शिंदे-सामंत यांची बैठक, ठाकरेंच्या आमदाराची उपस्थिती
संभाजीनगर: खोट्या अफवा थांबवा,कुणालच्या मावशीची समाजमाध्यमांना विनंती
मृत कुणालच्या मावशीचा कळकळीचा संदेश: सोशल मीडियावर कुटुंबीयांविषयी चुकीची माहिती पसरवू नका
राहुल गांधींचा पुण्यातील कार्यक्रम ‘स्क्रिप्टेड पेड’;दरेकरांची टीक
राहुल गांधींचा पुणे दौरा स्क्रिप्टेड, पेड; प्रवीण दरेकरांची काँग्रेसवर टीका
प्रक्षोभक भाषण करणाऱ्या आमदारांना अटक करा:सुळेंचं लांडगेंना थेट आव्हान
प्रक्षोभक भाषण करणाऱ्या आमदारांना अटक करा: सुप्रिया सुळे यांचं महेश लांडगे यांना थेट आव्हान