मनसे युतीबाबत सकारात्मक?, उध्दव ठाकरे यांनी जिल्हा आणि संपर्क प्रमुखांना काय दिले आदेश ?
राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका तोंडावर आलेल्या असताना मुंबई महानगर पालिकेच्या निवडणूकांचे बिगुल ऑक्टोबर महिन्यात वाजणार आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना आणि मनसेची युती व्हावी यांसदर्भात शिवसेना नेते उध्दव ठाकरे यांनी महत्वाचे संकेत दिले आहेत.

शिवसेना आणि मनसे यांनी एकत्र यावे असे जुन्या जाणत्या शिवसैनिकाचे मत आहे. याबाबत कालच शिवसेनेचा वर्धापन दिनाच्या सोहळ्यात उद्धव ठाकरे यांनी तुमच्या मनात जे असेल तेच होईल असे शिवसैनिकांकडे पाहून म्हटले होते. आता मनसे आणि शिवसेनेच्या युतीबाबत उद्धव ठाकरे यांनी आपण सकारात्मक असल्याचे म्हटले आहे. त्यातच १२ वाजता जिल्हाप्रमुख आणि संपर्क प्रमुखांची आज बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत स्थानिक पातळीवर कोणासोबत युती करावी याचा आढावा जिल्हाप्रमुख आणि संपर्क प्रमुख यांनी घ्यावा असेही आदेश उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत.
आघाडी की मनसे ?
आपण मनसे सोबत युतीकरण्याबाबत सकारात्मक आहोत. परंतू याबाबत स्थानिक पातळीत काय वातावरण आहे याचा आढावा घेऊन माहिती येत्या एक महिन्यांमध्ये घ्यावी असा आदेश उद्धव ठाकरे यांनी दिलेले आहेत. त्यासोबतच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर युतीही आघाडी सोबत करायची की मनसे सोबत करायची याची माहीती घेण्याचे आदेश या बैठकीत दिलेले आहेत. जिल्हा आणि संपर्क प्रमुखांनी ही माहीती स्थानिक पातळीवरील नेत्यांशी चर्चा करुन एक महिन्यात कळवण्याचेही आदेश उद्धव ठाकरे दिलेले आहेत.
दोन्ही शिवसेना आणि मनसे यांनी एकत्र यावे
दोन्ही शिवसेना आणि मनसे यांनी एकत्र यावे असे आवाहन शिवसेनेचे बुजुर्ग नेते गजानन कीर्तिकर यांनी दिले होते. त्यांनी यापूर्वी दोन्ही भाऊ जर एकत्र आले तर राज्यातील जुने जाणते शिवसैनिक या दोघांना साथ देतील असे वक्तव्य करुन सर्वांना आश्चर्यचकीत केले होते. गजानन कीर्तिकर शिवसेनेत फूट पडल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या सोबत गेलेले असून त्यांच्या अशा वक्तव्यामुळे ते चर्चेत आलेले आहेत. आता या दोन्ही चुलत भावांना त्यांचा पक्ष आणि अस्तित्व वाचवायचे असेल तर त्यांना एकत्र येण्यावाचून पर्याय नसल्याचे राज्यातील जुने शिवसैनिक बोलत आहेत.
शिवसेना भवनात बैठक
शिवसेना भवनात आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या उबाठा पक्षाच्या जिल्हा आणि संपर्क प्रमुखांची आज दुपारी १२ वाजता बैठक झाली. या बैठकीत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांसाठी आघाडी की मनसे सोबत युती केल्याने पक्षाचा फायदा होईल याची स्थानिक पातळीवरील नेत्यांशी चर्चा करुन येत्या एक महिन्यात शिवसेनाभवनात अहवाल सादर करण्याचा आदेश उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत.
