AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! शिवसेना शिंदे गटात एक मोठा पक्ष विलीन होणार? एकनाथ शिंदेंची ताकद वाढणार, राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ

विधान परिषद निवडणुकांपूर्वी राज्यात मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता आहे. राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. एक मोठा पक्ष शिवसेना शिंदे गटात विलीन होणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

मोठी बातमी! शिवसेना शिंदे गटात एक मोठा पक्ष विलीन होणार? एकनाथ शिंदेंची ताकद वाढणार, राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ
Eknath ShindeImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Apr 27, 2026 | 3:19 PM
Share

एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून उठाव केला होता. एकनाथ शिंदे यांच्या उठवानंतर शिवसेनेत उभी फूट पडल्याचं पहायला मिळालं. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून उठाव केल्यानंतर शिवसेनेच्या अनेक नेत्यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडली. अनेक आमदार आणि खासदारांनी त्यावेळी एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दिला. त्यावेळी राज्यात महाविकास आघाडीचं सरकार होतं. शिवसेनेत फूट पडल्यामुळे सरकार अल्पमतात आलं आणि उद्धव ठाकरे यांना आपल्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर भाजपच्या पाठिंब्यावर एकनाथ शिंदे हे राज्याचे मुख्यमंत्री बनले. त्यानंतर पक्षाचं चिन्ह आणि नाव देखील निवडणूक आयोगाकडून एकनाथ शिंदे यांना देण्यात आलं.

पक्षाचं चिन्ह आणि नाव एकनाथ शिंदे यांना मिळाल्यामुळे राज्यात शिवसेना दोन पक्षात विभागली गेली. मुळ शिवसेना आणि शिवसेना ठाकरे गट. दरम्यान आता एक मोठी बातमी समोर येत आहे, ती म्हणजे विधान परिषद निवडणुकीपूर्वी एक मोठा पक्ष शिवसेना शिंदे गटात विलीन होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात घडामोडींना वेग आला आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार प्रहारचे अध्यक्ष बच्चू कडू यांना शिवसेना शिंदे गटाकडून विधान परिषदेवर संधी मिळणार असल्याची चर्चा आहे. मात्र त्यासाठी बच्चू कडू यांनी आपला प्रहार पक्ष शिवसेनेत विलीन करण्याची अट ठेवण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. या पार्श्वभूमीवर घडामोडींना वेग आला असून,  बच्चू कडू यांनी मोबाईल एसएमएस द्वारे यावर आपल्या प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचं मत मागवल्याची माहिती देखील सूत्रांकडून मिळत आहे.  दोन-तीन दिवसांपूर्वीच यावर बच्चू कडू यांची प्रमुख पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा झाली असल्याची माहिती समोर येत आहे. बच्चू कडू जो निर्णय घेतील तो निर्णय आम्हाला मान्य आहे, असं अनेक कार्यकर्त्यांनी बच्चू कडू यांना कळवलं असल्याचंही समोर येत आहे. त्यामुळे आता बच्चू कडू शिवसेनेची ही अट मान्य करणार का? प्रहार शिवसेनेत विलीन होणार का? याकडे आता संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.

Follow Us
माधुरी हत्तीण नांदणी मठात परतली, हजारो नागरिकांनी उत्साहात केले...
माधुरी हत्तीण नांदणी मठात परतली, हजारो नागरिकांनी उत्साहात केले स्वागत
मोठी बातमी! काँग्रेसचे माजी प्रवक्ते रत्नाकर महाजन यांचे निधन
मोठी बातमी! काँग्रेसचे माजी प्रवक्ते रत्नाकर महाजन यांचे निधन; आणीबाणीच्या काळात...
पुण्यात गणेशोत्सवात 12 दिवस Dry Day का? हायकोर्टाने काय निकाल दिला?
Pune Dry Day : पुण्यात गणेशोत्सवात 12 दिवस Dry Day का? हायकोर्टाने काय निकाल दिला?
मला चांगली मराठी येते, भावना दुखावल्या असतील तर... संजय दत्तला उपरती
Sanjay Dutt | मला चांगली मराठी येते, कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर... संजय दत्तला उपरती
ही शान कोणाची? लालबागच्या राजाची, राजाच्या प्रथम दर्शनाचा व्हिडिओ बघाच
Lalbaugcha Raja First Look 2026 | ही शान कोणाची? लालबागच्या राजाची, राजाच्या प्रथम दर्शनाचा संपूर्ण व्हिडिओ बघाच
ब्रिक्स बिझनेस फोरममध्ये मोदींचं मोठं वक्तव्य; स्टार्टअपपासून UPI...
PM Modi | ब्रिक्स बिझनेस फोरममध्ये PM मोदींचं मोठं वक्तव्य; स्टार्टअपपासून UPIपर्यंत भारताच्या प्रगतीचा पाढाच वाचला
विराट कोहली आणि एकनाथ शिंदेंची लंडनमध्ये भेट! व्हिडिओ होतोय व्हायरल
Virat Kohli Meets Eknath Shinde | विराट कोहली आणि एकनाथ शिंदेंची लंडनमध्ये भेट! क्रिकेट अन् राजकारणातील दोन दिग्गज एकाच फ्रेममध्ये; व्हिडिओ होतोय व्हायरल
एकनाथ शिंदे यांचा एकेरी उल्लेख सहन करणार नाही! योगेश कदम संतापले
Yogesh Kadam | एकनाथ शिंदे यांचा एकेरी उल्लेख सहन करणार नाही! योगेश कदम संतापले; मनोज जरांगेंना केलं आवाहन
जरांगेंच्या मुंबई चलोवर हायकोर्टात सुनावणी! आंदोलनाला परवानगी....
Manoj Jarange | जरांगेंच्या मुंबई चलोवर हायकोर्टात सुनावणी! आंदोलनाला परवानगी मिळणार की ब्रेक लागणार?
छत्रपती शिवरायांना मानणारे लोक हिंदू सणांमध्ये विघ्न आणणार नाहीत
CM Devendra Fadnavis | छत्रपती शिवरायांना मानणारे लोक हिंदू सणांमध्ये विघ्न आणणार नाहीत; मुख्यमंत्री फडणवीसांचा नेमका कोणाला टोला?