AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bacchu Kadu: झेंडा बदलला, पण अजेंडा कायम राहील, सूत्रांनी हलवली सूत्रे; पक्ष प्रवेशानंतर बच्चू कडू यांची पहिली प्रतिक्रिया

Bacchu Kadu: प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी कार्यकर्त्यांसह आज शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. ते शिवसेना शिंदे गटाकडून विधान परिषदेचे उमेदवार आहेत. आता त्यांनी पक्ष प्रवेश केल्यानंतर पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

Bacchu Kadu: झेंडा बदलला, पण अजेंडा कायम राहील, सूत्रांनी हलवली सूत्रे; पक्ष प्रवेशानंतर बच्चू कडू यांची पहिली प्रतिक्रिया
bacchu KaduImage Credit source: Tv9 Network
| Updated on: Apr 30, 2026 | 1:13 PM
Share

प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष आणि माजी मंत्री बच्चू कडू यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. बच्चू कडू यांनी काही कार्यकर्त्यांसह आज शिवसेना शिंदे गटाचे धनुष्यबाण हाती घेतले आहे. बच्चू कडू हे एकेकाळी शिवसेनेत होते. मात्र, त्यांनी प्रहार सामाजिक संघटनेतून एक वेगळी वाट निवडत राजकीय-सामाजिक कार्य सुरू ठेवले होते. आज, पुन्हा एकदा बच्चू कडूंची घरवापसी झाली असल्याचे म्हटले जात आहे. शिवसेना शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर बच्चू कडू यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. ते नेमकं काय म्हणाले जाणून घ्या…

काय म्हणाले बच्चू कडू?

पक्ष प्रवेश केल्यानंतर बच्चू कडू यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, सर्वांना जय महाराष्ट्र, छत्रपती शिवाजी महाराज , महात्मा ज्योतिबाल फुले, बाबासाहेब आंबेडकर, अहिल्याबाई होळकर यांना नतमस्तक होतो. खरतर आज तुकडोजी महाराजांची जयंती आहे. त्या जयंतीच्या सर्वांना शुभेच्छा देतो. राष्ट्रसंतांनी आपली ग्रामगीता लिहिताना ती शेतकऱ्यांना अर्पित केली होती. त्यांच्या पहिल्या पानावर शेतकऱ्याचा हल हे सर्वचित्र रेखाटीत केले होते. तर तो योगायोग फार चांगला आहे ज्या वंचित घटकांसाठी ग्राम गीता लिहिली त्यांच्या जयंतीच्या दिवशी आम्ही धनुष्यबाण, शिंदे साहेबांच्या नेतृत्वात शेतकरी आणि दिव्यांगासाठी मजबुतीने उचलल्याशिवाय राहणार नाही. जिथे आहे तिथे प्रामाणिकपणे, तेवढ्याच ताकदीने राजकारणात इथून इकडे प्रवास शिंदे साहेबांच्या नेतृत्वात शिवसेनेत राहणार आहेत. सुरुवात शिवसेनेची झाली आणि आता जो शेवटचा जो 15-20 वर्षांचे जे राजकारण असेल ते सुद्धा शिंदे साहेबांच्या नेतृत्वात शिवसेनेतच राहिल अशी गवाई देतो.

पुढे ते म्हणाले, निव्वळ आमदारकीच्या पदासाठी नाही तर मुद्द्याची लढाई अधिक मजबूत झाली पाहिजे. शिंदे साहेंबाचा स्वभाव सेवाभावी आहे. रात्री 2 वाजता सुद्धा वर्षा बंगल्याची दारं उघडी होती. देशातील ऐतिहासिक निर्णय दिव्यांग मंत्रालय देण्याचे काम केले. कर्जमाफीमध्ये घेतलेला मोठा पुढाकार निश्चितच शेतकऱ्यांना दिलासा देणारा आणि म्हणून निव्वळ पद नाही तर विचार जुळणे महत्त्वाचे आहे. विचारा सोबत कर्तृत्व महत्त्वाचं असतं त्या दोन्ही गोष्टी आम्ही शिंदे साहेबांमध्ये पाहतो. ही लढाई फक्त पदापुरतीच मर्यादित राहणार नाही तर आम्ही जे मुद्दे दिले दिव्यांगाच बळकटीकरण असेल मंत्रालयाचं पेरणीच्या कापणी पर्यंत सगळे काम असेल शेतकऱ्यांचे मजुरांची असेल हमीभावाची लढाई असेल आमच्या विधवा भगिनीची लढाई असेल कामगारांची लढाई असेल.

मानले सर्वांचे आभार

शेवटी बच्चू कडू म्हणाले, युवकांसाठी एक वेगळा धोरण या सगळ्या बाबतीत ही चर्चा झाली. या सर्व मुद्द्यांवर चर्चा करून आपण हा निर्णय घेतलेला आहे. प्रहार एक सामाजिक संघटना म्हणून पाऊल टाकण पण राजकारण मात्र शिवसेनेचे मजबूत केल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जिथे जिथे उभा करता येईल शिवसैनिक उभा करू. तो शेतकऱ्यांसाठी खऱ्या अर्थानं मजुरांसाठी वंचितांसाठी छत्रपती शिवरायांना जो विचार ठेवला होता आखरी हे राज्य रयतेचा आहे. ते रयतेचा राज्य पुन्हा निर्माण व्हावं आणि त्या सर्वोच्च गादीवर पुन्हा आम्हाला शिंदे साहेब दिसावं यासाठीच आमचे प्रयत्न राहणार आहे. मी आपले आभार मानतो शिंदे साहेबांचे आणि अनाथांचे नाथ पण आहे तोच एक विचार घेऊन आम्हाला समोर जायचं आहे. राजकारण पुरता आम्ही पक्षप्रवेश केलेला नाही तर आम्ही जे काही मुद्दे दिले त्याची अंमलबजावणी देखील झाली पाहिजे.

Follow Us
दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंनी मांडली भूमिका, स्वतः ट्वीट...
दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंनी मांडली भूमिका, स्वतः ट्वीटद्वारे केला खुलासा!
माझा मुंबईत जाऊनच जीव निघालाा तर... जरांगे पाटलांची प्रतिक्रिया...
माझा मुंबईत जाऊनच जीव निघालाा तर...  आंदोलनाविषयी मनोज जरांगे पाटलांची मोठी प्रतिक्रिया!
त्यांच्यांतील लोकंच म्हणातात, जरांगे आंदोलनस्थळी... छगन भुजबळ नेमकं...
त्यांच्यांतील लोकंच म्हणातात, जरांगे आंदोलनस्थळी... छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?
बीड पाटोदा रस्त्यावर मराठा आंदोलकांचा रास्ता रोको; चलो मुंबईचा नारा...
बीड पाटोदा रस्त्यावर मराठा आंदोलकांचा रास्ता रोको; चलो मुंबईचा नारा...
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, डॉक्टरांनी दिली महत्त्वाची...
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, डॉक्टरांनी दिली महत्त्वाची माहिती
बिमारी का बहाना है, तुम्हे मुंबई... गुणरत्न सदावर्तेंनची जरांगेंवर...
बिमारी का बहाना है, तुम्हे मुंबई... गुणरत्न सदावर्तेंनची मनोज जरांगेंवर अजब कविता
...तरच राष्ट्रवादीचं विलिनीकरण शक्य; त्या एका अटीबाबत रोहित पवारांची..
...तरच राष्ट्रवादीचं विलिनीकरण शक्य; त्या एका अटीबाबत रोहित पवारांची मोठी प्रतिक्रिया
PM मोदींच्या सेवायात्रेत महाराष्ट्र महत्त्वाचा भाग! कृष्णराज महाडीक...
PM मोदींच्या सेवायात्रेत महाराष्ट्र महत्त्वाचा भाग! कृष्णराज महाडीक यांनी सांगितला भाजपचा खास प्लॅन
तीन टेस्ट, पक्षाची संघटना ते निवडणूक आयोगाची भूमिका, शिंदे गटाचा युक्त
तीन टेस्ट, पक्षाची संघटना ते निवडणूक आयोगाची भूमिका, शिंदे गटाचा युक्तिवाद काय? वाचा महत्त्वाचे मुद्दे
आता मूळ पक्ष कोणता हा मुद्दा... आजच्या सुनावणीतील महत्त्वाचे अपडेट्स
Shivsena Hearing : आता मूळ पक्ष कोणता हा मुद्दा... आजच्या सुनावणीतील महत्त्वाचे अपडेट्स