AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘मी तुम्हाला कळकळीची विनंती करतो की….’; प्रकाश आंबेडकरांचे पंतप्रधान मोदींना पत्र

प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बांगलादेशातील बौद्ध आणि चकमा समुदायांवर होणाऱ्या अत्याचाराबाबत पत्र लिहिले आहे. त्यांनी बांगलादेशातील अल्पसंख्याक समुदायांच्या सुरक्षेसाठी तात्काळ पावले उचलण्याची विनंती केली आहे.

'मी तुम्हाला कळकळीची विनंती करतो की....'; प्रकाश आंबेडकरांचे पंतप्रधान मोदींना पत्र
प्रकाश आंबेडकरांचे पंतप्रधान मोदींना पत्र
Follow us
| Updated on: Jan 12, 2025 | 8:40 PM

वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले आहे. यामध्ये बांगलादेशातील बौद्ध आणि चकमा यांच्या कठीण परिस्थितीची तीव्रता लक्षात घेता, बांगलादेशातील सर्व अल्पसंख्याक समुदायांच्या, विशेषतः बौद्ध आणि चकमांच्या सुरक्षिततेसाठी त्वरित आवश्यक पावले उचलावीत, अशी विनंती प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. “प्रिय पंतप्रधान मोदी, बांगलादेशातील धार्मिक अल्पसंख्याक आणि आदिवासी लोकांविरुद्ध, विशेषतः बौद्ध आणि चकमा यांच्याविरुद्ध सुरू असलेल्या हिंसाचाराबद्दल मी तुम्हाला लिहित आहे. बांगलादेशातील हिंदूवरील हिंसाचाराच्या समर्थनार्थ आणि निषेधार्थ भारत सरकारने घेतलेली भूमिका कौतुकास्पद आणि स्वागतार्ह आहे. पण, बौद्ध आणि चकमा या अल्पसंख्याक समुदायाविषयी भूमिका घेण्यात आली नाही”, अशी भूमिका प्रकाश आंबेडकर यांनी मांडली.

“बांगलादेशात बौद्ध आणि चकमांना तोंड द्यावे लागत असलेल्या हिंसाचार आणि भेदभावाबद्दल मला खूप चिंता आहे. ज्यांच्या मदतीसाठी आणि हस्तक्षेपासाठीच्या विनंतीकडे भारत सरकार आणि संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या निवडून आलेल्या प्रतिनिधींनी सोयीस्करपणे दुर्लक्ष केले आहे”, असं प्रकाश आंबेडकर पत्रात म्हणाले आहेत.

‘बांगलादेशात चकमा गटांवर हल्ले’

“बांगलादेशच्या माजी पंतप्रधान श्रीमती शेख हसीना यांना त्यांच्या पदावरून अनैतिकरित्या काढून टाकल्यापासून, मी बौद्धांवरील हल्ले, त्यांच्या धार्मिक स्थळांची तोडफोड, बांगलादेशातील त्यांच्या मालमत्तेची तोडफोड आणि चितगाव डोंगराळ भागात स्थानिक चकमा गटांवर हल्ले आणि त्यांची दुकाने, घरे जाळणे यासारख्या त्रासदायक घटना पाहिल्या आहेत”, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.

हे सुद्धा वाचा

‘मी तुम्हाला कळकळीची विनंती करतो की….’

“बांगलादेशातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे अल्पसंख्याक असलेल्या बौद्धांवर सुरू असलेले हल्ले हे २०१२च्या रामू हिंसाचाराचे प्रतिध्वनी आहेत. बांगलादेशातील बौद्ध आणि चकमा यांच्या कठीण परिस्थितीची तीव्रता लक्षात घेता, मी तुम्हाला कळकळीची विनंती करतो की, बांगलादेशातील सर्व अल्पसंख्याक समुदायांच्या, विशेषतः बौद्ध आणि चकमांच्या सुरक्षिततेसाठी त्वरित आवश्यक पावले उचलावीत”, अशी विनंती प्रकाश आंबेडकर यांनी केली.

पुण्यात दादांचं भाषण सुरू अन् 'प्रहार'च्या कार्यकर्त्यानी घातला गदारोळ
पुण्यात दादांचं भाषण सुरू अन् 'प्रहार'च्या कार्यकर्त्यानी घातला गदारोळ.
पुढील 24 तास धोक्याचे... या जिल्ह्यांना पाऊस झोडपणार, IMDचा अलर्ट काय?
पुढील 24 तास धोक्याचे... या जिल्ह्यांना पाऊस झोडपणार, IMDचा अलर्ट काय?.
16 तारखेपासून अन्नत्यागच नाहीतर तर आता... बच्चू कडूंची मोठी घोषणा काय?
16 तारखेपासून अन्नत्यागच नाहीतर तर आता... बच्चू कडूंची मोठी घोषणा काय?.
मी काय येडगावहून आलोय? नाशिक महापालिकेच्या अधिकाऱ्यांवर भुजबळ भडकले
मी काय येडगावहून आलोय? नाशिक महापालिकेच्या अधिकाऱ्यांवर भुजबळ भडकले.
विमान दुर्घटनेनंतर राऊतांकडून शंका; सायबर हल्ल्याच्या माध्यमातून...
विमान दुर्घटनेनंतर राऊतांकडून शंका; सायबर हल्ल्याच्या माध्यमातून....
दोन दिवसांपूर्वी कोर्ट मॅरेज, लंडनला जात असताना... घटनेनं बाप हादरला
दोन दिवसांपूर्वी कोर्ट मॅरेज, लंडनला जात असताना... घटनेनं बाप हादरला.
कोणाला 10 मिनिट लेट, कोणी स्वतःला..मृत्यूला चकवा देणारे 'ते' तिघं कोण?
कोणाला 10 मिनिट लेट, कोणी स्वतःला..मृत्यूला चकवा देणारे 'ते' तिघं कोण?.
40 सेकंदात कुठं चूक झाली? लंडनला जाणाऱ्या विमान अपघाताची कारणं काय?
40 सेकंदात कुठं चूक झाली? लंडनला जाणाऱ्या विमान अपघाताची कारणं काय?.
लकी नंबरच्या तारखेलाच मृत्यू, विजय रूपाणींच्या 1206 अंकाचा योगायोग काय
लकी नंबरच्या तारखेलाच मृत्यू, विजय रूपाणींच्या 1206 अंकाचा योगायोग काय.
पवारांची राष्ट्रवादी हा एक मोठा पक्ष सोडून कुणाशीही युती करण्यास तयार?
पवारांची राष्ट्रवादी हा एक मोठा पक्ष सोडून कुणाशीही युती करण्यास तयार?.