नरेंद्र मोदी आणि उद्धव ठाकरे शिकाऱ्याप्रमाणे ढोल पिटत आहेत; प्रकाश आंबेडकरांची टीका

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून कोरोना लसीकरण मोहिमेच्या शुभारंभाचा उदोउदो करण्यात आला. | Prakash Ambedkar

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 12:42 PM, 17 Jan 2021
नरेंद्र मोदी आणि उद्धव ठाकरे शिकाऱ्याप्रमाणे ढोल पिटत आहेत; प्रकाश आंबेडकरांची टीका

अकोला: पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून कोरोना लसीकरण (Corona vaccination) मोहिमेच्या शुभारंभाचा उदोउदो करण्यात आला. जुन्या काळात शिकारी ढोल वाजवत जंगलभर फिरत तसाचा हा प्रकार असल्याची खोचक टिप्पणी वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी केली. ते रविवारी अकोल्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होते. (Prakash Ambedkar take a dig at PM Modi and CM Uddhav Thackeray)

यापूर्वीही प्रकाश आंबेडकर यांनी अर्थव्यवस्थेच्या मुद्द्यावरुन केंद्र व राज्य सरकारला लक्ष्य केले होते. सरकारकडे अर्थव्यवस्था सुधारण्याचा ठोस प्लॅन असता तर आपण कोरोनामुळे निर्माण झालेल्या संकटातून बाहेर पडलो असतो. मात्र, केंद्र आणि राज्य सरकारकडे अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी काहीच प्लॅन नाही. कोणते निर्णय घ्यायला पाहिजे, हे शासन ठरवतच नाही. लोकांनी सांगितल्यावर सरकार फक्त आदेश काढण्याचे काम करत आहे, अशी टीका प्रकाश आंबेडकर यांनी केली होती.

कोविन ॲपमधील तांत्रिक दोषामुळे कोरोना लसीकरण 2 दिवस बंद

कोरोना (कोविड 19) लसीकरण मोहिमेला आज (16 जानेवारी) देशभरात सुरुवात झाली. मात्र, आता या मोहिमेसाठी वापरण्यात येणाऱ्या कोविन नावाच्या ॲपमध्ये तांत्रिक समस्या आल्याने कोरोना लसीकरणाची मोहिम बंद झाली आहे. हा दोष दुरुस्त करण्यासाठी 17 आणि 18 जानेवारी असे 2 दिवस हे लसीकरण बंद राहणार आहे.

एकदा लसीचा डोस घेऊन कोरोना बरा होणार नाही : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा घेणारी माहिती जनतेला देतानाच अनेक सतर्कतेचे इशारे दिले आहेत. अद्याप आपल्या हातात कोरोनाची लस आलेली नाही आणि ती कधी मिळणार हेही अधांतरिच आहे. मात्र, एकदा कोरोना डोस घेऊन काम होणार नाही, असा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला. यावेळी त्यांनी नागरिकांना गाफिल न राहता हात धुणे, सोशल डिस्टन्सिंग ठेवणे आणि मास्क लावणे या त्रिसूत्रीचं पालन करण्याचं आवाहन केले.

संबंधित बातम्या:

लोकं सांगतात अन् सरकार फक्त आदेश काढतं; शासनाकडे कोणताच ठोस प्लॅन नाही: प्रकाश आंबेडकर

उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत मुंबईत लसीकरण मोहीम सुरु, पहिल्या लसीच्या मानकरी कोण?

आजारी पडलेले कोरोना योद्धे रुग्णालयातून परतलेच नाहीत; मोदींना अश्रू अनावर

(Prakash Ambedkar take a dig at PM Modi and CM Uddhav Thackeray)