AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

प्रशांत किशोर सुनेत्रा पवारांच्या भेटीला, अरोरांनंतर नवे सल्लागार?

राष्ट्रवादीमध्ये मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. त्यामध्येच प्रशांत किशोर यांची अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नवे सल्लागार म्हणून नियुक्ती झाल्याची चर्चा आहे. मुंबईतल्या देवगिरी बंगल्यावर प्रशांत किशोर यांनी पार्थ पवार आणि सुनेत्रा पवारांची भेट घेतली.

प्रशांत किशोर सुनेत्रा पवारांच्या भेटीला, अरोरांनंतर नवे सल्लागार?
Sunetra Pawar and Prashant Kishor
| Updated on: Aug 06, 2026 | 2:59 PM
Share

सागर शिंदे :  प्रशांत किशोर यांची अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नवे सल्लागार म्हणून नियुक्ती झाल्याची चर्चा आहे. मुंबईतल्या देवगिरी बंगल्यावर प्रशांत किशोर यांनी पार्थ पवार आणि सुनेत्रा पवारांची भेट घेतली. आगामी निवडणुका, राष्ट्रवादीची पुढील काळातील रणनीती आणि जनमत सर्वेक्षण यावर देवगिरीवरच्या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती आहे. राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाचा कार्यक्रमही प्रशांत किशोर यांच्या मार्गदर्शनाखालीच पार पडला होता अशी माहिती आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सध्या पक्षसंघटनेतल्या नियुक्त्यांवरुन वाद सुरु आहे. पक्षाचे माजी राष्ट्रीय सचिव असलेल्या सच्चिदानंद सिंह यांनी सुनेत्रा पवारांनाच आव्हान देत निवडणूक आयोगाला पत्र लिहिलं होतं. फेब्रुवारी 2026 मध्ये झालेली अध्यक्षपदाची निवड पक्षघटनेनुसार झाली नसल्याचा आरोप सच्चिदानंद सिंह यांनी केला होता. दुसरीकडे प्रफुल पटेल आणि सुनेत्रा पवारांमधला संवाद कमी झाल्याच्या चर्चा आहेत.

सुनेत्रा पवार यांनी निवडणूक आयोगाला पाठवलेल्या पत्रात प्रफुल पटेल यांचा कार्यकारी अध्यक्ष आणि सुनील तटकरे यांचा प्रदेशाध्यक्षपद असा उल्लेख नव्हता. तेव्हापासून पटेल आणि तटकरे नाराज असल्याच्या चर्चा आहेत. अशा परिस्थितीत जनसामान्यांमध्ये पक्षाची प्रतिमा नकारात्मक जाऊ नये, यासाठी सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार प्रयत्नशील आहेत. त्यासाठीच प्रशांत किशोर यांना राष्ट्रवादीनं राजकीय सल्लागारपदी नेमल्याची चर्चा सुरु झालीय.

मे महिन्यातही प्रशांत किशोर यांनी पार्थ पवार आणि सुनेत्रा पवारांची मुंबईत भेट घेतली होती. त्यावेळी पार्थ पवारांनीच प्रशांत किशोर यांच्यासोबतचे फोटो सोशल मीडियात शेअर केले होते. पण प्रशांत किशोर यांची राजकीय सल्लागारपदी नेमणूक केल्याचं पार्थ पवार यांनी नाकारलं होतं. 2024 च्या विधानसभा निवडणुकीत डिझायन बॉक्स कंपनीच्या नरेश अरोरा यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे रणनीतीकार म्हणून काम सांभाळलं होतं.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गुलाबी थीमचा वापर नरेश अरोरांनीच केला होता. विधानसभा निवडणुकीनंतर राष्ट्रवादीचे काही वरिष्ठ नेते आणि नरेश अरोरा यांच्यात विसंवाद निर्माण झाला होता. अजित पवारांनाच अरोरा यांच्या डिझायन बॉक्स कंपनीचं काँट्रॅक्ट रद्द करायचं होतं असा दावा रोहित पवारांनी केला होता. जानेवारी 2026 मध्ये अजित पवारांचं निधन झालं. त्यानंतर मार्च 2026 मध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं नरेश अरोरा यांच्या डिझायन बॉक्स कंपनीचं काँट्रॅक्ट रद्द केलं होतं

प्रशांत किशोर हे राजकीय रणनीतीकार म्हणून ओळखले जातात. देशात 12 जणांना आपण मुख्यमंत्रीपदी बसवल्याचा दावा प्रशांत किशोर यांनी नुकताच केलाय. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत प्रशांत किशोर यांनी पंतप्रधान मोदींचे राजकीय रणनीतीकार म्हणून जबाबदारी सांभाळली होती. त्यानंतर थलपती विजय, ममता बॅनर्जी, नितीश कुमार, जगनमोहन रेड्डी, अरविंद केजरीवाल, एम.के.स्टॅलिन, अमरिंदर सिंह यांच्यासाठीही प्रशांत किशोर यांनी काम केलंय.

प्रशांत किशोर नुकतेच बिहारच्या विधानसभेत आमदार म्हणून निवडून आले आहेत. बांकीपूर विधानसभा पोटनिवडणुकीत त्यांनी भाजपच्या नीरज कुमार सिन्हा यांचा 19 हजार 324 मतांनी पराभव केला. विशेष म्हणजे बांकीपूरची जागा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांच्या राजीनाम्यामुळं रिक्त झाली होती.

Follow Us
पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद
Mumbai Petrol Pump | पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद करण्याचा पेट्रोल पंप चालकांचा इशारा
दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर...
Akola : दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर कुणी... प्रशासनाच्या संवेदनशीलतेवरच प्रश्नचिन्ह
दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री!
Dharashiv Rain : दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री! शेतकऱ्यांना दिलासा, मात्र...
धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी...
Anand Dighe | धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी शिवसैनिकांसह नागरिकांची मोठी गर्दी
माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर
Devendra Fadnavis | माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर फडणवीसांचा पलटवार
शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर...भरणेंची...
Dattatray Bharne : शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर... दत्तात्रय भरणेंची मोठी ग्वाही
हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर...
Nitesh rane | हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंचं ट्विट चर्चेत
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता...
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता अंडरग्राऊंड... म्हणत सोशल मीडियावर पोस्ट
7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने
Sangali : 7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू
राहुल गांधींनी आता... मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा हल्लाबोल
Devendra Fadnavis : राहुल गांधींनी आता कॉमेडियन बनलं पाहिजे, मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा जोरदार हल्लाबोल