बारामती विमानतळावर मोठा अपघात, रनवेवरून विमान थेट कोसळले, धक्कादायक व्हिडीओ पुढे..
Baramati Airport Accident : बारामती विमानतळावर पुन्हा एकदा मोठा विमान अपघात झाला. या अपघातानंतर खळबळ उडाली. प्रशिक्षण विमानाच अपघात झाल्याची माहिती मिळतंय. यादरम्यानचा एक व्हिडीओ पुढे येताना दिसतोय.

बारामती विमानतळावर मोठा अपघात झाला. पुन्हा एकदा अपघात झाला. काही महिन्यांपूर्वीच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाचा भीषण अपघात बारामती विमानतळाजवळ झाला होता. ज्यात विमानातील कोणीही वाचू शकले नाही. धक्कादायक फोटो यादरम्यानचही व्हायरल झाली होती. त्यात आता पुन्हा एकदा एका प्रशिक्षण विमानाचा मोठा अपघात बारामती विमानतळावर झाला. हे विमान लॅंड होत असताना रन वेवरून घरसल्याचे माहिती मिळतंय. या विमानात नक्की किती जण होते, याबाबत माहिती पुढे येऊ शकली नाही. विमान अपघाताची माहिती मिळताच बचावकार्य राबवण्यात आले. या विमानात नक्की किती जण होते, याबाबत माहिती पुढे येऊ शकली नाही. एका व्यक्तीने आपल्या मोबाईलमध्ये हा व्हिडीओ कैद केला. व्हिडीओमध्ये काही लोक जमल्याचे बघायला मिळतंय.
या विमानाच्या अपघातावर बोलताना प्रवीण दरेकर यांनी म्हटले की, याची गांर्भियाने दखल संबंध यंत्रणांनी घेतली पाहिजे. कारण वारंवार या गोष्टी होत आहेत. सरकार नक्कीच संबंधित कंपन्या असतील त्यांना कठोर अशा सूचना देतील, किंबहुना कठोर नियंत्रणाची आवश्यकता आहे. कारण लोकांच्या जीवाचा प्रश्न आहे. सरकार यावर पाऊले उचलेल.
सरकारला उचलावी लागतील. कारण या घटना वारंवार होत आहेत. यात काही तांत्रिक आहे का? यासर्व गोष्टींचा सरकार नक्कीच विचार करेल. संबंधितांना योग्य त्या सूचना देतील. सरकार नक्कीच कारवाई करेल. प्रवासी काय करणार ना.. प्रवासी थोडी विमान योग्य आहे हे तपासेल. संबंधित कंपन्यांनी याची काळजी घ्यावी. याबाबत सरकार नक्कीच कारवाई करेल, असे प्रवीण दरेकर यांनी म्हटले.
बारामतीच्या विमानतळावर वारंवार विमान अपघात होताना दिसत आहेत. अजित पवार यांच्या विमानाचा मोठा अपघात झाला. ज्यात त्यांच्या अंगरक्षकासोबतच विमानात असलेल्या सर्वांचा जीव जागीच गेला. अजित पवार यांच्या निधनानंतर सर्वांनाच मोठा धक्का बसला. अजित पवार यांच्या विमान अपघातानंतर सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची सूत्रे आपल्या हातात घेतली. या विमान अपघाताचा व्हिडीओ पुढे आला.