10 वी, 12 वीच्या परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक जाहीर; पोरांनो कोरोना गेलाय आता अभ्यास करा

दहावीची लेखी परीक्षा 2 मार्च ते 25 मार्च 2023 या कालावधीत होणार आहे. तर 12 वीची लेखी परीक्षा 21 फेब्रुवारी ते 20 मार्च 2023 या कालावधीत होणार आहे.

10 वी, 12 वीच्या परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक जाहीर; पोरांनो कोरोना गेलाय आता अभ्यास करा
Follow us
| Updated on: Sep 19, 2022 | 8:01 PM

मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे(Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education) दहावी(SSC), बारावीच्या(HSC) मार्च 2023 च्या लेखी परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात आहे. शाळा, कनिष्ठ महाविद्यालय आणि विद्यार्थींना अभ्यासक्रमाचे नियोजन करता यावे यासाठी परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.

दहावीची लेखी परीक्षा 2 मार्च ते 25 मार्च 2023 या कालावधीत होणार आहे. तर 12 वीची लेखी परीक्षा 21 फेब्रुवारी ते 20 मार्च 2023 या कालावधीत होणार असल्याची माहिती राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी दिली.

हे संभाव्य वेळापत्रक असून निश्चित वेळापत्रकाबाबतची माहिती शाळांना दिली जाणार आहे. त्या सुधारित वेळापत्रकानुसार परीक्षा घेतल्या जाणार आहेत.

कोरोना काळात विद्यार्थ्याना सुट मिळाली

दरम्यान, कोरोना महामारीमुळे तब्बल दोन वर्षे दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आली होती. कोरोनाचा प्रसार मंदावल्यानंतर आणि रुग्णसंख्या कमी झाल्यानंतर सरकारने सर्व निर्बंध शिथील केले. त्यानंतर शाळा आणि कॉलेज सुरु करण्यात आली.

2022 या वर्षीत दहावी आणि बारावीची परीक्षा ऑफलाईन पद्धतीने घेण्यात आली होती. कोरोनामुळे विद्यार्थ्यांच्या लिखाणाचा सराव कमी झाल्यामुळे परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना जास्त वेळ देखील देण्यात आला होता.

यंदा मात्र, सर्व शाळा नियमीत सुरु झाल्या आहेत. यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षा कालावधीत कोणत्याही प्रकारची सवलत मिळणार नसल्याचे जवळपास स्पष्ट झाले आहे.

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.