President Murmu Maharashtra Visit: राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू बुधवारी गडचिरोलीत; गोंडवाना विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभाला लावणार हजेरी

President Murmu Maharashtra Visit: गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी विद्यार्थ्यांच्या विकासासाठी गोंडवाना विद्यापीठाची निर्मिती करण्यात आली. या विद्यापीठाचा 10 वा दीक्षांत समारंभ उद्या सकाळी साडेदहा वाजता संपन्न होणार आहे.

President Murmu Maharashtra Visit: राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू बुधवारी गडचिरोलीत; गोंडवाना विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभाला लावणार हजेरी
Follow us
| Updated on: Jul 04, 2023 | 9:23 PM

मोहम्मद इरफान, प्रतिनिधी, गडचिरोली : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे मंगळवारी चार जुलैला सायंकाळी नागपुरात आगमन झाले.पाच जुलै रोजी सकाळी गडचिरोलीतील गोंडवाना विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ तसेच कोराडीतील सांस्कृतिक केंद्राच्या उद्घाटन सोहळ्याला राष्ट्रपती उपस्थित राहणार आहेत. राष्ट्रपतीपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर त्यांचा हा पहिलाच नागपूर दौरा आहे. गडचिरोली जिल्ह्यात एक दिवसाच्या दौऱ्यावर राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू येत आहेत. गोंडवाना विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभ त्यांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे. गडचिरोली जिल्ह्यात पहिल्यांदाच राष्ट्रपती आगमन होत आहे. जय्यत तयारी गडचिरोली प्रशासनानं केली आहे. गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी विद्यार्थ्यांच्या विकासासाठी गोंडवाना विद्यापीठाची निर्मिती करण्यात आली. या विद्यापीठाचा 10 वा दीक्षांत समारंभ उद्या सकाळी साडेदहा वाजता संपन्न होणार आहे.

या मान्यवरांची राहणार उपस्थिती

गोंडवाना विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभासाठी देशाच्या महामहीम राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री चंद्रकांत पाटील तसेच नवनियुक्त मंत्री झालेले धर्मरावबाबा आत्राम उपस्थित राहणार आहेत.

39 आदिवासी विद्यार्थ्यांना स्वर्ण पदकं मिळणार

गडचिरोली जिल्ह्यात उत्तीर्ण झालेल्या 39 आदिवासी विद्यार्थ्यांना स्वर्ण पदके आणि 137 विद्यार्थ्यांना आचार्य पदवी बुधवारी राष्ट्रपती मुर्मू यांच्या हस्ते प्रदान केली जाईल. विद्यार्थ्यांचे विविध कार्यक्रम या दीक्षांत समारंभानिमित्त आयोजित करण्यात आले आहेत. या दीक्षांत समारंभात गोंडवाना विद्यापीठाच्या नवीन इमारतीचे भूमिपूजनही संपन्न होणार आहे.

दीड हजार पोलीस जवान तैनात

गडचिरोली जिल्हा अति संवेदनशील आणि नक्षलग्रस्त भाग आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात राष्ट्रपतींच्या सुरक्षेसाठी मोठी यंत्रणा तैनात करण्यात आली. जवळपास 1500 पोलीस जवान, 639 हवालदार आणि 151 अधिकाऱ्यांसह सर्व आयुक्त, अधिकारी उपस्थित राहणार आहेत.

president 2 n

गडचिरोली जिल्ह्यात 144 कलम लागू

गडचिरोली जिल्ह्यात 144 कलम लागू करण्यात आले आहे. एमआयडीसी आणि कोटगल परिसरातील काही रस्त्यावर प्रवासासाठी बंदी घालण्यात आली आहे. राष्ट्रपतींच्या बंदोबस्तासाठी एक तगडा बंदोबस्त नक्षलग्रस्त जिल्हा असलेल्या गडचिरोली जिल्हा मुख्यालयात तैनात करण्यात आला.

दहा हजार स्केअर फुटमध्ये वातानुकूलित टेन्ट

गोंडवाना विद्यापीठाच्या स्थळी जवळपास दहा हजार स्केअर फुटमध्ये वातानुकूलित टेन्ट सदर कार्यक्रमासाठी लावण्यात आला आहे. या कार्यक्रमाचे आयोजन गोंडवाना विद्यापीठाचे श्रीराम कावळे, गडचिरोली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी संजय मीना आणि पोलीस अधीक्षक निलोल्पत वेगवेगळ्या नियोजनात व्यस्त आहेत.

६ जुलै रोजी सकाळी राष्ट्रपती आदिवासी समाज बांधवांशी राजभवन येथे संवाद साधतील. त्यानंतर मुंबईकडे प्रस्थान करतील.

Non Stop LIVE Update
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा.
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?.
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा.
सोलापुरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर दरोडा, नेमकं काय घडलं?
सोलापुरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर दरोडा, नेमकं काय घडलं?.
आता ही तुतारी तुमची चांगलीच..., संजय राऊतांचा महायुतीवर हल्लबोल
आता ही तुतारी तुमची चांगलीच..., संजय राऊतांचा महायुतीवर हल्लबोल.
एक-दोन दिवस थांबा मग संदीपान भूमरेंवर...,ठाकरे गटाच्या नेत्यांचा इशारा
एक-दोन दिवस थांबा मग संदीपान भूमरेंवर...,ठाकरे गटाच्या नेत्यांचा इशारा.
ईडीच्या 'त्या' वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी घेतला सदाभाऊ खोतांचा समाचार
ईडीच्या 'त्या' वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी घेतला सदाभाऊ खोतांचा समाचार.
शेंडगेंच्या गाडीवरील हल्ल्यावर भुजबळ म्हणाले, पण मी कुणाच्या बापाला...
शेंडगेंच्या गाडीवरील हल्ल्यावर भुजबळ म्हणाले, पण मी कुणाच्या बापाला....
मराठा समाज गप्प बसणार नाही, ओबीसी नेत्याला धमकी अन् गाडीवर शाईफेक
मराठा समाज गप्प बसणार नाही, ओबीसी नेत्याला धमकी अन् गाडीवर शाईफेक.