AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबईकरांना फटका, थेट वडापाव महागला, अधिकचे पैसे लागणार मोजावे, महागाईने..

इराण आणि अमेरिका युद्धाचा मोठा फटका भारतात बघायला मिळत आहे. त्यामध्येच आता मुंबईकरांना वडापावकरिता अधिकचे पैसे मोजावे लागणार आहेत. खाद्यतेलाच्या वाढलेल्या किमती आणि पावच्याही किमती वाढल्याने मोठा दणका बसला आहे.

मुंबईकरांना फटका, थेट वडापाव महागला, अधिकचे पैसे लागणार मोजावे, महागाईने..
Vadapav
| Updated on: May 23, 2026 | 9:49 AM
Share

इराण आणि अमेरिका युद्धाचा मोठा फटका भारतात बसत आहे. अनेक गोष्टी महागल्या आहेत. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत वाढ होत आहे. ऊर्जेचे संकट आहे. एलपीजी गॅस सिलेंडरचा तुटवडा असून व्यावसायिक सिलेंडरच्या किमतीमध्ये वाढ झाली. त्यामध्येच कच्च्या तेलाच्या किमतीमध्येही वाढ झाली. दहा दिवसात तिसऱ्यांदा पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत वाढ झाली. सर्वसामान्य नागरिकांना मोठा दणका बसत आहे. केंद्र सरकार एका मागून एक मोठे निर्णय घेताना दिसत आहे. पगार वाढ नाही पण महागाई वाढत असल्याने सर्वसामान्य लोक त्रस्त झाली. पेट्रोल आणि डिझेलसोबतच एलपीजी गॅसच्या किमतीमध्येही वाढ झाली. काही जिल्ह्यामध्ये पेट्रोल आणि डिझेलचे साठे संपले आहेत. मोठा तुटवडा निर्माण झाला. जर पुढील काही दिवस हे युद्ध सुरू राहिले तर भारतासह अन्य देशांमध्ये हाहाकार उडू शकतो. केंद्र शासनाकडून परिस्थिती नियंत्रणात ठेवण्याकरिता प्रयत्न केली जात आहेत.

एलपीजी गॅसचा तुटवडा, त्यात व्यावसायिक सिलेंडरच्या किमतीत वाढ ज्यामुळे हॉटेल व्यवसायिक पदार्थांच्या किमतीमध्ये वाढ करत आहेत. त्यामध्येच आता मुंबईकरांना वडापावकरिता अधिकचे पैसे माजावे लागणार आहेत. मुंबईकरांकरिता वडापाव अत्यंत जवळचा विषय आहे. धावपळीत तुम्ही चालत चालत देखील आरामात वडापाव खाऊ शकता.

थेट आता वडापावच्या किमतीत वाढ झाल्याने मुंबईकरांच्या खिशाला मोठी झळ बसणार आहे. मुंबईकरांना आता बटाटा वडापावसाठी 20 ते 35 रुपये मोजावे लागणार आहेत. व्यवसायिक गॅस सिलिंडर, खाद्यतेल आणि पावाचे दर वाढल्याने वडापावचे दरही पाच ते सात रूपयांनी वाढणार आहेत. पावच्याही किमतीत वाढ झाली आहे.

मुंबईतील विविध भागात बटाटा वडापावाचे दर वेगवेगळे आहेत. दादरला 20 ते 25 रुपयांमध्ये वडापाव मिळतो. आता त्यात वाढ होणार. इराण आणि अमेरिका युद्धाच्या झळा मुंबईच्या वडापावपर्यंत पोहोचल्या आहेत. जर हे युद्ध अजून काही काळ चालले तर परिस्थिती अधिक बिकड होऊ शकते. खाण्याच्या वस्तूंमध्ये मोठी वाढ होत आहे. सर्वसामान्य मुंबईकरांचा वडापावही आता महाग होतोय.

Follow Us
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा;
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा; म्हणाले, बॉन्डवर स्वाक्षरी...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट दिलं आव्हान!
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल;
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, 'भारतासाठी...
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम
अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं
मोठी बातमी! अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं काय घेडलं?
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी...
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी मागणी, शेतकऱ्यांना मिळणार दिलासा?
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी;
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी; बैठकीत घेतला मोठा निर्णय
15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट...
Dhruv Rathee | 15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट करत आरोप
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात...
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात... बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ