बीएचआर पतसंस्था गैव्यवहारप्रकरणी 12 जणांना अटक, गिरीश महाजनांच्या निकटवर्तीयांचाही समावेश

राज्यभर गाजलेल्या भाईचंद हिराचंद रायसोनी अर्थात बीएचआर पतसंस्थेच्या गैरव्यवहार प्रकरणात पुण्याच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून आज (17 जून) राज्यभरात ठिकठिकाणी एकाच वेळी छापे टाकण्यात आले. या कारवाईत सकाळपासून आतापर्यंत 12 संशयितांना अटक करण्यात आली आहे.

बीएचआर पतसंस्था गैव्यवहारप्रकरणी 12 जणांना अटक, गिरीश महाजनांच्या निकटवर्तीयांचाही समावेश
BHR PATSANSTHA
अनिल केऱ्हाळे

| Edited By: prajwal dhage

Jun 17, 2021 | 10:48 PM

जळगाव : राज्यभर गाजलेल्या भाईचंद हिराचंद रायसोनी अर्थात बीएचआर पतसंस्थेच्या गैरव्यवहार प्रकरणात पुण्याच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून आज (17 जून) राज्यभरात ठिकठिकाणी एकाच वेळी छापे टाकण्यात आले. या कारवाईत सकाळपासून आतापर्यंत 12 संशयितांना अटक करण्यात आली आहे. यात भाजप नेते गिरीश महाजन याचे निकटवर्तीय आहेत. (Pune Economic Offences Wing arrested 12 accused related with BHR Patsanstha scam Jalgaon)

अटक केलेल्या संशयितांमध्ये उद्योजक, व्यापाऱ्यांचा समावेश आहे. यातील काही जण हे राजकीय व्यक्तींच्या जवळचे आहेत. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. जळगाव, औरंगाबाद, धुळे, अकोला, मुंबई, पुणे याठिकाणी हे छापे पडले आहेत. पुण्याच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या 15 टीमकडून एकाच वेळी ही कारवाई करण्यात आली आहे. यासंदर्भात पुणे आर्थिक गुन्हे शाखेच्या उपायुक्त भाग्यश्री नवटके यांनी सविस्तर माहिती दिली आहे.

अटकसत्राचा दुसरा अंक

बीएचआर पतसंस्थेच्या गाजत असलेल्या घोटाळ्यात पुणे आर्थिक गुन्हे शाखेने अटक सत्राचा दुसरा दणका दिला आहे. आज पहाटेपासूनच या कारवाईला सुरुवात करण्यात आली. यापूर्वीही नोव्हेंबर 2020 मध्ये या प्रकरणात कारवाई झाली होती. तेव्हा 6 जणांना अटक करण्यात आले होते. या प्रकरणाची चौकशी सुरू असताना आता पुन्हा काही संशयितांची नावे समोर आली आहेत. त्यानंतर हे अटक सत्र राबविण्यात आले. यात भाजप नेते आमदार गिरीश महाजन यांचे निकटवर्तीय आहेत.

अटक केलेल्या संशयितांची नावे :

भागवत भंगाळे (जळगाव), छगन झाल्टे (जामनेर), जितेंद्र रमेश पाटील (औरंगाबाद येथून अटक), आसिफ मुन्ना तेली (भुसावळ), जयश्री शैलेश मणियार (जळगाव), संजय तोतला (जळगाव), राजेश लोढा (जामनेर), प्रितेश चंपालाल जैन (धुळे), अंबादास आबाजी मानकापे (औरंगाबाद), जयश्री अंतिम तोतला (मुंबई), प्रेम नारायण कोगटा (यांना पुण्यातील हॉटेलातून अटक) आणि प्रमोद किसनराव कापसे (अकोला) अशा एकूण 12 जणांना अटक करण्यात आली आहे.

या अटसत्राविषयी बोलताना स्वतः महाजन यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “सगळेच माझे निकटवर्तीय आहेत. आमदार चंदू पटेल यांचे नावही त्यात आहे. या सर्वांनी कर्ज फेड केली असल्याचा दावा केला होता आहे. या प्रकरणी कायद्याप्रमाणे कारवाई होईल,” असे महाजन म्हणाले.

इतर बातम्या :

मराठा आंदोलकांच्या प्रलंबित प्रश्नांवर तातडीने मार्ग काढा, समन्वयासाठी समितीही नेमा; मुख्यमंत्र्यांच्या सूचना

संभाजीराजे छत्रपतीच्या 7 मागण्या, प्रत्येक मागणीवर सरकारनं कुठला शब्द दिला? वाचा सविस्तर

राष्ट्रवादीचा 100 विधानसभा मतदारसंघांवर डोळा?, काय आहे ‘सुपर 100’ मोहीम?; वाचा सविस्तर

(Pune Economic Offences Wing arrested 12 accused related with BHR Patsanstha scam Jalgaon)

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें