पुण्यातील प्रसिद्ध व्यावसायिक गौतम पाषाणकर बेपत्ता, बुधवारपासून शोध सुरू

64 वर्षीय गौतम पाषाणकर हे बुधवारी सायंकाळी मॉडेल कॉलनी इथून बेपत्ता झाले असल्याची माहिती देण्यात आली आहे.

पुण्यातील प्रसिद्ध व्यावसायिक गौतम पाषाणकर बेपत्ता, बुधवारपासून शोध सुरू

पुणे : पुण्यातून मोठी धक्कादायक बातमी समोर येत आहे. पुण्यातील आटोमोबाईल्सचे व्यवस्थापकीय संचालक तसेच बांधकाम व्यावसायिक गौतम पाषाणकर हे बेपत्ता आहेत. 64 वर्षीय गौतम पाषाणकर हे बुधवारी सायंकाळी मॉडेल कॉलनी इथून बेपत्ता झाले असल्याची माहिती देण्यात आली आहे. यानंतर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात मिसिंगची तक्रार दाखल केली असून पोलीस तपास सुरू आहे. (Pune Famous businessman Gautam Pashankar missing from Wednesday)

गौतम पाषाणकर हे पाषाणकर आटोमोबाईल्सचे व्यवस्थापकीय संचालक तसेच बांधकाम व्यावसायिक आहेत. ते कोणत्या नातेवाइकांकडे गेले आहेत का? त्यांनी कोणाशी संपर्क केला होता, याचा शोध घेण्यास पोलिसांनी सुरुवात केली आहे. पाषाणकर हे कृषी महाविद्यालयाजवळच्या मोदी बागेमध्ये राहतात.

धक्कादायक! टेरेसवर कॉफी पित असताना अंगावर वीज पडली, मुंबईत 21 वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू

मिळालेल्या माहितीनुसार, पाषाणकर हे बुधवारी संध्याकाळी लोणी काळभोर इथल्या त्यांच्या गॅस एजन्सीच्या ठिकाणी गेले होते. त्यानंतर त्यांनी त्यांचं कार्यालय गाठलं. यानंतर काही वेळाने पाषाणकर यांनी कार चालकाला पानशेतला एका कामानिमित्त पाठवलं होतं आणि ते गणेशखिंड रस्त्यावरील एलआयसी कार्यालयापर्यंत गेले. पण त्यानंतर ते बेपत्ता झाले अशी माहिती देण्यात आली आहेत.

पाषाणकर यांच्या कार चालकाने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, त्याने पाषाणकर यांना फोन केला असता त्यांनी उत्तर दिलं नाही. त्यामुळे चालकाने याची माहिती त्यांचा मुलगा कपिल पाषाणकर याला दिली. यानंतर कुटुंबाने शोध सुरू केला असता कुठेही पत्ता न लागल्याने अखेर पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली.

बँक खात्यामध्ये नाहीत पैसे, तरीही करू शकता UPI पेमेंट, वाचा कसे?

पोलीस सध्या जागोजागी पाषाणकर यांचा शोध घेत असून त्यांच्या नातेवाईकांची आणि कार चालकाची चौकशी करत असल्याची माहिती देण्यात आली आहे तर ते कोणालाही दिल्यास त्यांच्या कुटुंबाला या मोबाईल क्रमांकावर 9822474747 तर शिवाजीनगर पोलिस ठाणे 020-25536263 या क्रमांकावर कळवावं असं सांगण्यात आलं आहे.

(Pune Famous businessman Gautam Pashankar missing from Wednesday)

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *