Pune : डिशमध्ये चिकनसोबत कोंबडीचं पीसही फ्री फ्री फ्री.. ! हॉटेलमध्ये किळसवाणा प्रकार उघड
पुण्यातील हिंजवडीतील अरेबियन मंडी हॉटेलमध्ये अस्वच्छतेचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका ग्राहकाने ऑर्डर केलेल्या चिकन डिशमध्ये कोंबडीचे पिस सापडले. या घटनेमुळे हॉटेलची अस्वच्छता आणि आरोग्यविषयक धोका उघड झाला आहे. ग्राहकाने अन्न व औषध प्रशासनाकडे तक्रार दाखल केली आहे. हॉटेलची अस्वच्छता, वॉशरूमची अवस्था आणि पार्किंगची कमतरता यांचाही उल्लेख तक्रारीत आहे. या घटनेमुळे पुण्यातील अन्न सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

पुण्यात सध्या अनेक गुन्हे घड असून एकेकाळी विद्येचं माहेरघरनावाने ओळखलं जाणारं हे हर आजकाल बऱ्याच चुकीच्या गोष्टींसाठीच चर्चेत आहे. त्यातच आता पुण्यातील एक हॉटेलमध्ये किळसवाणा आणि तितकाच धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तेथील एका हॉटेलमध्ये भयानक अस्वच्छता तर होतीच रण ग्राहकांन दिलेल्या जेवणातही स्वच्छतेच्या मानकांचे पालन न केल्याने त्यांचं आरोग्य धोक्यात आल्याची घटना उघड झाली आहे. हिंजवडीतील मारुंजी रोडवरील अरेबियन मंडी हॉटेलवर अस्वच्छतेचा मुद्दा ऐरणीवर आला असून ग्राहकाने मागवलेल्या चिकनच्या डिशमध्ये त्यासोबत कोंबडीचं पिसंही आढळल्याचे समोर आले. अखेर ग्राहकाच्या तक्रारीनंतर आता अन्न व औषध प्रशासनाची नजर या हॉटेलवर पडली असून ते रडारवर आलं आहे.
चिकनसोबत कोंबडीचं पीसही फ्री..
पुण्यातील हिंजवडी येथील मारुंजी रोडवरील अरेबियन मंडी हॉटेलवर अस्वच्छतेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. भारतीय जनता युवा मोर्चाच्या कायदा आघाडीचे पिंपरी-चिंचवड शहर सरचिटणीस प्रदीप नाईक यांनी अन्न व औषध प्रशासन विभागाकडे लेखी तक्रार दाखल केली आहे. हॉटेलमध्ये आढळलेल्या अस्वच्छतेबरोबरच प्लेटमध्ये सापडलेल्या कोंबडीच्या पिसावरून त्यांनी संताप व्यक्त केला आहे.
त्यांच्या तक्रारीत नमूद केल्यानुसार, 16 जुलै रोजी रात्री 8.30 च्या सुमारास प्रदीप नाईक हे अरेबियन मंडी हॉटेलमध्ये जेवणासाठी गेले होते. मात्र हॉटेलच्या बाहेरपासूनच त्यांना भोंगळ कारभाराचा अनुभव यायला सुरूवात झाली. पार्किंगची व्यवस्था नाही, जेवणाची अस्वच्छ जागा, हात धुण्याची सोय उबगवाणी, आणि टेबल-खुर्च्यांवर तेलाचे डाग अशी चित्रं तिथे पाहायला मिळाली. नाईक यांनी तक्रारीत नमूद केल्याप्रमाणे, वॉशरूमपासून ते खाद्यपदार्थांपर्यंत सर्व काही दर्जाहीन व अस्वच्छ होतं.
चिकन कबाब खात असताना थाळीत चक्क कोंबडीचं पिस
एवढंच नव्हे तर या अनुभवावर कळस चढवला तो त्यांच्या चिकनच्या प्लेटमधील अनोख्या घटकाने. नाईक हे निजाम चिकन कबाब खात असताना, त्यांच्या थाळीत चक्क कोंबडीचं पिस सापडलं. हा प्रकार पाहून संतापलेल्या नाईक यांनी तात्काळ मॅनेजरला बोलावून घडलेल्या प्रकाराचा जाब विचारला. मॅनेजरने हॉटेल मालकाचे नाव सांगितले, पण वाद टाळण्यासाठी “काही बोलू नका, बिल सुद्धा देऊ नका” असा सल्ला दिला. मात्र, नाईक यांनी बिलाचे पैसे स्वतः दिले असून त्यांनी 482 रुपये भरल्याचे स्पष्ट केले. त्यानंतर त्यांनी या भयानक प्रकाराबाबत अन्न व औषध प्रशासन लेखी तक्रार केली आहे. यामुळ ग्राहकांचे आरोग्य मात्र धोक्यात ल्याचे सांगत सामान्य लोकांकडून संताप व्यक्त होत आहे.
