AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पुणे जैन बोर्डिंग प्रकरण; शिंदेंचं धंगेकरांना मोठं आश्वासन, भेटीमध्ये नेमकं काय म्हणाले?

सध्या पुण्यातील जैन बोर्डिंग प्रकरण चांगलंच तापलं आहे, रवींद्र धंगेकर यांनी या प्रकरणात मुरलीधर मोहोळ यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत, त्यानंतर आता एकनाथ शिंदे हे पुणे दौऱ्यावर असताना रवींद्र धंगेकर यांनी शिंदे यांची भेट घेतली आहे.

पुणे जैन बोर्डिंग प्रकरण; शिंदेंचं धंगेकरांना मोठं आश्वासन, भेटीमध्ये नेमकं काय म्हणाले?
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 26, 2025 | 4:10 PM
Share

पुण्यातील जैन बोर्डिंगचं प्रकरण सध्या चांगलंच तापलं आहे, जैन बोर्डिंग प्रकरणावरून शिवसेना शिंदे गटाचे नेते रवींद्र धंगेकर यांनी भाजपचे खासदार आणि केंद्रीय राज्य मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यावर आरोप केले आहेत, त्यामुळे मुरलीधर मोहोळ यांच्या अडचणी वाढल्या आहेत. दरम्यान आज दुसरीकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पुणे दौऱ्यावर असताना रवींद्र धंगेकर यांनी त्यांची भेट घेतली. त्यावेळी महायुतीमध्ये दंगा करायचा नाही असा सल्ला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना दिला आहे, तसेच  आता जैन बोर्डिंगचा विषय संपला आहे, त्यांना जी माहिती मिळाली होती, त्यावरून ते बोलत होते, असंही यावेळी शिंदे यांनी म्हटलं आहे. दरम्यान शिंदे यांच्या भेटीनंतर आता रवींद्र धंगेकर यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.

नेमकं काय म्हणाले धंगेकर? 

दोन दिवसांमध्ये तोडगा काढून देतो, जैन बोर्डिंग मुक्त होणार असं त्यांनी मला सांगितलं आहे, त्यासाठी मी शिंदे साहेबांचे आभार मानतो.  कार्यकर्ता म्हणून माझी लढाई कधीही संपणार नाही, जर वाईट प्रवृत्ती विरुद्ध लढलो नाही तर पुढची पिढी मला माफ करणार नाही, कायम जनतेच्या बाजूने लढणार, सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे, रवी धंगेकर हा कार्यकर्ता गप्प बसणार नाही, उद्या कुठे कुणावर अन्याय होत असेल आणि मुरलीधर मोहोळ पुन्हा आले तर मी पुन्हा लढणार, लोकशाहीमध्ये मला एखादा प्रश्न जर वाटला तर मी नक्की मुरलीधर मोहोळ यांना विचारणार, असं धंगेकर यांनी म्हटलं आहे.

दरम्यान पुढे बोलताना ते म्हणाले आहे की, या विषयासंदर्भात शिंदे साहेबांना भाजपचे काही कार्यकर्ते भेटले असतील, मुरलीधर मोहोळ देखील भेटले असतील, मला याचं समाधान वाटतं की ते एकनाथ शिंदे यांच्याकडे गेले, आणि त्यांना सांगितलं की याला गप्पा बसवा म्हणून, धंगेकरांना का गप्प करायचं? तर आपल्याला माहिती आहे एखादं बाळ रडत असेल तर आई-वडिलांना कळतं की बाळाला काय हवं आहे? ते त्याला खायला देतात, त्यामुळे मी जैन मंदिर होत नाही तोपर्यंत रडायचं थांबणार नाही, जैन मंदिर माझ्यासाठी औषध आहे, आणि मी रडत राहणार त्यांच्यापाशी, कारण मला जैन मंदिर हवं आहे, असंही यावेळी धंगेकर यांनी म्हटलं आहे.

Follow Us
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...
गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी वेगळं...
Gautami Patil On Dahi Handi | गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी खास...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय गोविंदा दगावला