AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

केतन अग्रवाल हत्याकांड प्रकरणातील महत्वाचा दुवा सापडला; पोलीस चौकशीत सिया गोयलचा भाऊ पोपटसारखा बोलला, क्रिकेट कनेक्शनही उघड

Ketan agarwal murder case : केतन हत्याकांड प्रकरणातील महत्वाचा दुवा पोलिसांच्या हाती सापडलाय. या प्रकरणात सियाच्या भावाने महत्वाची माहिती दिली आहे.

केतन अग्रवाल हत्याकांड प्रकरणातील महत्वाचा दुवा सापडला; पोलीस चौकशीत सिया गोयलचा भाऊ पोपटसारखा बोलला, क्रिकेट कनेक्शनही उघड
| Edited By: | Updated on: Jun 27, 2026 | 8:28 AM
Share

पुण्यातील केतन अग्रवाल प्रकरणात पोलिसांच्या हाती दररोज महत्वाचे पुरावे हाती लागत आहेत. पोलीस चौकशीत आरोपींकडून नवनवीन खुलासे होत आहेत. केतन अग्रवालची हत्या करणाऱ्या आरोपी सिया गोयल आणि चेतन चौधरी यांच्यातील महत्वाचा दुवा देखील पोलिसांच्या हाती लागला आहे. दोन्ही आरोपींची ओळख ही सियाचा भाऊ साहिलमुळे झाल्याचे उघड झालं आहे. तर चेतन आणि साहिलची मैत्री ही क्रिकेटच्या मैदानावर झाली. परंतु हीच मैत्री पुढे केतन अग्रवालच्या हत्येपर्यंत पोहोचल्याचे पोलीस चौकशीतून समोर आलं आहे.

चेतन चौधरी आणि सियाचा मोठा भाऊ साहिल गोयलची मैत्री क्रिकेटमुळे झाली. चेतन आणि साहिलने एकत्र क्रिकेट सामने खेळले आहेत. सिया नेहमी साहिलसोबत क्रिकेट सामने बघण्यासाठी जायची. पोलिसांच्या माहितीनुसार, सिया आणि चेतनची पहिली भेट ही २०२५ रोजी दिवाळीतील एका पार्टीत झाली. त्यानंतर दोघांची ओळख आणखी वाढली. दोघे मोबाईलवरून संपर्कात असायचे. त्याचे कॉल रेकॉर्ड देखील पोलिसांच्या हाती लागले आहेत. पोलिसांच्या माहितीनुसार, सिया गोयल आणि चेतन चौधरीत मागील सहा महिन्यात २००४ कॉल झाले. त्यांनी एकूण २३८ तास संभाषण केलं.

लोणावळा विभागाचे पोलीस उपअधीक्षक गजानन टोनपे यांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही आरोपींची भूमिका स्पष्ट झाली आहे. तसेच आरोपी सियाच्या भावाची देखील पोलीस चौकशी करण्यात आली. तसेच तिच्या इतर नातेवाईकांची देखील चौकशी करण्यात येत आहे. केतन अग्रवालच्या हत्येनंतर दोघांनी मोबाईलमधील व्हॉट्सअॅप, इन्स्टाग्राम चॅट आणि कॉल डिटेल डिलीट केले होते. त्या डेटाची फॉरेन्सिक तपासणी केली जात आहे.

तपास अधिकाऱ्यांना संशय आहे की, दोघांनी मोबाईलमधील चॅट हे लोहगडला जाण्याआधी डिलीट केले असावेत. दोघांनी चॅट डिलीट केले नसून मोबाइलच्या रिसायकल बिनमधून देखील डिलीट केला आहे. त्यामुळे फोरेन्सिक तपासणी गरजेचे असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, सिया आणि चेतन हे केतनच्या हत्येच्या एक दिवसआधी एका कॅफेत भेटले होते. दोघेही जवळपास १ तास कॅफेत बसले होते. त्यावेळी दोघांमध्ये काय बोलणं झालं, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.

Follow Us
बाप्पा विसर्जनाच्या प्रतीक्षेत ताटकळला; उपनगरचा राजा काल सकाळपासून...
Ganpati Visarjan 2026 : बाप्पा विसर्जनाच्या प्रतीक्षेत ताटकळला; उपनगरचा राजा काल सकाळपासून मढ जेटीवरच, प्रशासनाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह
राज्यात दुष्काळ जाहीर; दत्ता भरणे नेमकं काय म्हणाले?
Maharashtra Drought Issue : राज्यात दुष्काळ जाहीर; दत्ता भरणे नेमकं काय म्हणाले?
राऊत अचानक राज ठाकरेंच्या भेटीला दोघांमध्ये नेमकी काय चर्चा?
Sanjay Raut Meet Raj Thackeray : संजय राऊत अचानक राज ठाकरेंच्या भेटीला शिवतीर्थवर! दोघांमध्ये नेमकी काय चर्चा? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
मोठी अपडेट समोर! ट्रिगर-1 म्हणजे काय? महाराष्ट्रातील दुष्काळ निवारण...
मोठी अपडेट समोर! ट्रिगर-1 म्हणजे काय? महाराष्ट्रातील दुष्काळ निवारणाचा पहिला टप्पा
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील यांची नवी रणनीती; नेमकं काय ठरवलं?
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील यांची नवी रणनीती; नेमकं काय ठरवलं?
मुख्यमंत्री फडणवीसांमुळे शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार; नेत्याचं...
मुख्यमंत्री फडणवीसांमुळे शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार... बड्या नेत्याचं विधान चर्चेत
राज्यातील 265 तालुक्यात दुष्काळ जाहीर विरोधक काय म्हणतात?
Maharashtra Drought Issue : राज्यातील 265 तालुक्यात दुष्काळ जाहीर विरोधक काय म्हणतात?
मोठी बातमी! महाराष्ट्रातील 75 टक्के भागात दुष्काळ जाहीर; म्हणजेच 265..
मोठी बातमी! महाराष्ट्रातील 75 टक्के भागात दुष्काळ जाहीर; म्हणजेच 265 तालुक्यांमध्ये...
अखेरचं मुख दर्शन; लालबागच्या राजाला कार्यकर्त्यांचा भावनिक निरोप
Lalbagcha Raja 2026 : अखेरचं मुख दर्शन; लालबागच्या राजाला कार्यकर्त्यांचा भावनिक निरोप
डोळ्यांत सामावून घेण्यासारखा क्षण; लालबागच्या राजाचे दिमाखात विसर्जन
डोळ्यांत सामावून घेण्यासारखा क्षण; लालबागच्या राजाचे दिमाखात विसर्जन