AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शरद पवारांच्या भेटीनंतर रोहिणी खडसेंची पहिली प्रतिक्रिया, थेट पुण्यातील ‘या’ महिला नेत्याला मोठा इशारा

Pune : रोहिणी खडसे यांनी नुकताच शरद पवार यांची भेट घेतली आहे. पती प्रांजल खेवलकरला रेव्ह पार्टी करताना पोलिसांनी रंगेहात पकडल्यानंतर मोठी खळबळ उडाली. यादरम्यान एकनाथ खडसे यांनी थेट पुणे पोलिसांवरच गभीर आरोप केले. आता शदर पवारांच्या भेटीनंतर त्यांनी मोठे भाष्य केले.

शरद पवारांच्या भेटीनंतर रोहिणी खडसेंची पहिली प्रतिक्रिया, थेट पुण्यातील 'या' महिला नेत्याला मोठा इशारा
Rahini khadse and sharad pawar
| Updated on: Aug 02, 2025 | 10:19 AM
Share

एकनाथ खडसे यांच्या जावयाला रेव्ह पार्टी करताना रंगेहात पकडल्यानंतर राजकीय वर्तुळात भूकंल आला. पुण्यातील खराडी भागात ही रेव्ह पार्टी सुरू होती आणि पोलिसांनी छापेमारी करत प्रांजल खेवलकरसोबतच इतर सात जणांना अटक केली. या पार्टीतून कोकेन, गांजा आणि मोठ्या प्रमाणात दारू जप्त करण्यात आली. खेवलकर हा सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. जामिनासाठी अर्ज करण्याची दाट शक्यता आहे. त्यापूर्वीच रोहिणी खडसे यांनी पुण्यात शरद पवार यांची भेट घेतलीये.

शरद पवारांच्या भेटीनंतर रोहिणी खडसे यांनी माध्यमांसोबत संवाद साधलाय. रोहिणी खडले यांनी म्हटले की, या सर्व प्रकरणात मी योग्यवेळी उत्तर देणार आहे. त्या पुढे म्हणाल्या की, मी माझ्या पतीला भेटण्यासाठी सीपी कार्यालयात गेले होते आणि एक वकील म्हणून भेटायला गेले होते. मला कोर्टात दुसऱ्या दिवशी हजर व्हायचे होते आणि मला त्यांच्याकडून काही माहिती हवी असल्याने मी गेले होते. त्यावेळीच कार्यालयात सीपी साहेब असल्याने मी त्यांची देखील भेट घेतली.

रूपाली चाकणकरांच्या टिकेवर बोलताना रोहिणी खडसे यांनी म्हटले की, करू द्या मग काय झालं…मी योग्य वेळी प्रत्येकाला उत्तर देणार आहे. पोलिसांनी सांगितले की, पाळत ठेवणे हा आमचा हेतू नव्हता. त्यांनी त्यांच्या वतीने आम्हाला भेट घेऊन हे सांगितलं. तुम्ही मला त्या केस संदर्भात न्यायालयात जी चर्चा झाली ते मला विचारू नका. विरोधी पक्षातील नेत्यांना टार्गेट केले जातं, असं म्हणायला जागा असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

पती प्रांजल खेवलकरला अटक झाल्यानंतर तब्बल 24 तास रोहिणी खडसे यांनी कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया ही दिली नव्हती. त्यानंतर त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत सत्य लवकरट बाहेर येईल, असे म्हणत पतीच्या फोटोसह पोस्ट शेअर केली. आता प्रांजल खेवलकरला जामीन कधी मिळतो, हे देखील पाहण्यासारखे ठरणार आहे. कोर्टातील सुनावणीवेळी देखील रोहिणी खडसे कोर्टात उपस्थित होत्या.

महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.