AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ऑक्सिजन मास्क घालून विहिरीत उतरले… स्कूबा पद्धतीने शोध; तिला शोधण्यासाठी पुण्यात मोठं ऑपरेशन

पुण्यातील गाऊददरा येथे शेतात काम करताना एका महिलेचा विहिरीत पडून दुर्दैवी मृत्यू झाला. खोल आणि गढूळ पाण्यात शोधकार्य आव्हानात्मक असताना, आपत्ती व्यवस्थापन पथकांनी ऑक्सिजन मास्क व स्कूबा तंत्राचा वापर करत पाच तासांनी तिचा मृतदेह बाहेर काढला. उज्ज्वला वावळ असे तिचे नाव असून, या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

ऑक्सिजन मास्क घालून विहिरीत उतरले... स्कूबा पद्धतीने शोध; तिला शोधण्यासाठी पुण्यात मोठं ऑपरेशन
तिला शोधण्यासाठी पुण्यात मोठं ऑपरेशन Image Credit source: TV9 Marathi
| Updated on: Jan 12, 2026 | 2:13 PM
Share

पुण्याच्या हवेली तालुकर्यातील गाऊडदरा परिसरात शेतात काम करत असताना एक महिला अचानक विहिरीत पडली. जीव वाचवण्यासाठी आरडाओरडा करण्याचा तिने प्रयत्न केला. पाण्यात हातपाय मारले, पण ती वाचू शकली नाही. अखेर तिला वाचवण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन पथकाचे कर्मचारी आणि अग्निशमन दलाचे अधिकारी घटनास्थळी आले. त्यांनी ऑक्सिजन मास्क लावून विहिरीत उडी घेतली. स्कूबा पद्धतीने महिलेचा विहिरीत शोध घेतला आणि अखेर तिचा मृतदेह बाहेर काढला. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

उज्ज्वला शत्रुघ्न वावळ ही 40 वर्षीय महिला विहिरीत पडून दगावली आहे. ती पुण्याच्या हवेली तालुक्यातील गाऊडदराची रहिवाशी आहे. उज्ज्वला वावळ या नेहमीप्रमाणे शेतात काम करत होत्या. दुपारच्या सुमारास त्या विहिरीवर पाणी भरण्यासाठी गेल्या असता अचानक पाय घसरून त्यांचा तोल गेला आणि त्या थेट विहिरीत पडल्या. विहीर खोल आणि पाण्याची पातळी अधिक असल्याने त्या पाण्यात बुडाल्या. काही वेळानंतर त्या परत न आल्याचे लक्षात येताच कुटुंबीय आणि ग्रामस्थांनी शोध सुरू केला.

पाच तास शोध मोहिम

घटनेची माहिती मिळताच पुणे आपत्ती व्यवस्थापन, हवेली वेल्हा आपत्ती व्यवस्थापन, भोईराज आपत्ती व्यवस्थापन (शिरवळ), पीएमआरडीए अग्निशमन दल तसेच PDRF (पुणे आपत्ती प्रतिसाद पथक) तातडीने घटनास्थळी दाखल झाले. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता सर्व यंत्रणांनी समन्वय साधत संयुक्त शोधमोहीम हाती घेतली. विहिरीतील पाणी खोल आणि गढूळ असल्याने शोधकार्य आव्हानात्मक ठरले. अशा परिस्थितीत पाण्याखाली उतरण्यासाठी ऑक्सिजन मास्कचा वापर करून स्कुबा-प्रकारच्या आधुनिक तंत्रज्ञानाचा आधार घेण्यात आला. प्रशिक्षित पथकाने पाण्यात उतरून पद्धतशीर शोध सुरू केला. सलग चार ते पाच तासांच्या अथक परिश्रमानंतर पाण्याखाली मृतदेहाचा ठावठिकाणा लागला. ऑक्सिजनच्या साहाय्याने पाण्यात उतरून शोध घेणाऱ्या पथकामुळे मृतदेह तुलनेने लवकर बाहेर काढणे शक्य झाले.

या संपूर्ण मोहिमेत हवेली आपत्ती व्यवस्थापन प्रमुख तानाजी भोसले, संजय चोरगे पाटील, उत्तम पिसाळ, प्रतीक महामुनी, संतोष भगत, योगेश गोपी आणि विक्रम हिरामणे यांनी समन्वय साधत महत्त्वाची भूमिका बजावली. तसेच पीएमआरडीए अग्निशमन दलातील वाहन चालक प्रेमसागर राठोड, अग्निशमन विमोचक सुनिल चामे आणि अग्निशमन विमोचक निकेत चव्हाण यांनी प्रत्यक्ष शोध आणि बचाव कार्यात सक्रिय सहभाग नोंदवला.

पीडीआरएफ (पुणे आपत्ती प्रतिसाद पथक) मधील वाहन चालक अनिल शिंदे, जवान अजय सावंत व जवान विशाल माळी यांनी पाण्यात उतरून शोधकार्य व मृतदेह बाहेर काढण्याच्या प्रक्रियेत मोलाचे योगदान दिले. विविध यंत्रणांमधील समन्वय, आधुनिक उपकरणांचा वापर आणि प्रशिक्षित मनुष्यबळामुळे ही कठीण मोहीम यशस्वीरीत्या पूर्ण झाली.

तपास सुरू

या घटनेची माहिती पतीतर्फे खेडशिवापूरच्या राजगड पोलीस स्टेशनमध्ये देण्यात आली असून पुढील तपास राजगड पोलीस स्टेशन करत आहे. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. या घटनेमुळे वावळ कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून गाऊडदरा परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

'बाळासाहेबांच्या विचाराचं सरकार मी पाडलं, असं एकनाथ शिंदे म्हणाले...'
'बाळासाहेबांच्या विचाराचं सरकार मी पाडलं, असं एकनाथ शिंदे म्हणाले...'.
कोस्टल रोडचं श्रेय ते राज ठाकरेंना नो स्पेस...फडणवीस काय-काय म्हणाले?
कोस्टल रोडचं श्रेय ते राज ठाकरेंना नो स्पेस...फडणवीस काय-काय म्हणाले?.
फडणवीस यांचे मुंबई लुटीच्या आरोपांना प्रत्युत्तर, आरोप फेटाळले अन्...
फडणवीस यांचे मुंबई लुटीच्या आरोपांना प्रत्युत्तर, आरोप फेटाळले अन्....
ठाकरेंनी शिंदेंना वाळीत टाकलं होतं अन्...फडणवीसांनी सगळंच सांगून टाकलं
ठाकरेंनी शिंदेंना वाळीत टाकलं होतं अन्...फडणवीसांनी सगळंच सांगून टाकलं.
लवकरच मोठा मित्र पक्षप्रवेश करणार, रवींद्र चव्हाण यांचं मोठं वक्तव्य
लवकरच मोठा मित्र पक्षप्रवेश करणार, रवींद्र चव्हाण यांचं मोठं वक्तव्य.
राज ठाकरेंच्या लाकुडतोड्या टीकेला मंत्री गिरीश महाजनांचं प्रत्युतर...
राज ठाकरेंच्या लाकुडतोड्या टीकेला मंत्री गिरीश महाजनांचं प्रत्युतर....
भाजपच्या 15 पदाधिकाऱ्यांवर कारवाई, थेट पक्षातून काढलं! अमरावतीत खळबळ
भाजपच्या 15 पदाधिकाऱ्यांवर कारवाई, थेट पक्षातून काढलं! अमरावतीत खळबळ.
कोण तो रसमलाई...भXXXव्या तुझा काय...राज ठाकरेंकडून अण्णामलाईंवर निशाणा
कोण तो रसमलाई...भXXXव्या तुझा काय...राज ठाकरेंकडून अण्णामलाईंवर निशाणा.
'लाव रे तो व्हिडीओ' म्हणत राज ठाकरेंकडून थेट मुंबईकरांना इशारा
'लाव रे तो व्हिडीओ' म्हणत राज ठाकरेंकडून थेट मुंबईकरांना इशारा.
....तरच नवऱ्याला जेवण द्या, पंकजा मुंडे यांचे मतदारांना अनोखे आवाहन
....तरच नवऱ्याला जेवण द्या, पंकजा मुंडे यांचे मतदारांना अनोखे आवाहन.