10 कोटींचं बोगस कर्जवाटप, सेवा विकास बँकेच्या तत्कालीन चेअरमनसह 27 जणांवर गुन्हा दाखल, नेमकं प्रकरण काय?

10 कोटींच्या बोगस कर्ज वाटपाप्रकरणी सेवा विकास बँकेच्या तत्कालीन चेअरमनसह 27 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पूर्वनियोजित कटकारस्थान रचून कर्जदाराची कर्ज परतफेड क्षमता न पाहता, अपुरे तारण असताना मालमत्तेचे मूल्यांकन कमी असताना देखील कर्ज दिल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे.

10 कोटींचं बोगस कर्जवाटप, सेवा विकास बँकेच्या तत्कालीन चेअरमनसह 27 जणांवर गुन्हा दाखल, नेमकं प्रकरण काय?
10 कोटींच्या बोगस कर्ज वाटपाप्रकरणी सेवा विकास बँकेच्या तत्कालीन चेअरमनसह 27 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Follow us
| Updated on: Aug 12, 2021 | 9:54 AM

पिंपरी चिंचवड : 10 कोटींच्या बोगस कर्ज वाटपाप्रकरणी सेवा विकास बँकेच्या तत्कालीन चेअरमनसह 27 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींशी संगनमत, पूर्वनियोजित कटकारस्थान रचून कर्जदाराची कर्ज परतफेड क्षमता न पाहता, अपुरे तारण असताना मालमत्तेचे मूल्यांकन कमी असताना देखील कर्ज दिल्याचा आरोप तत्कालीन चेअरमनसह 27 जणांवर ठेवण्यात आला आहे.

नेमकं प्रकरण काय?

दि सेवा विकास बँकेचे तत्कालीन चेअरमन अमर मुळंचनदानी व संचालक मंडळ आणि अधिकाऱ्यांनी मिळून 10 कोटी 37 लाख 30 हजार रुपये रकमेची बोगस कर्जे वाटप केली. याबाबत बँकेचे तत्कालीन चेअरमन, संचालक मंडळ, अधिकारी आणि कर्जदार अशा 27 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे

हा प्रकार सन 2016 ते 31 मार्च 2019 या कालावधीत दि सेवा विकास को ऑप बँक मुख्य शाखा पिंपरी येथे घडला होता. आरोपींशी संगनमत, पूर्वनियोजित कटकारस्थान रचून कर्जदाराची कर्ज परतफेड क्षमता न पाहता, अपुरे तारण असताना मालमत्तेचे मूल्यांकन कमी असताना, तारण मालमत्ता विक्रीयोग्य व निर्वेध नसताना कर्ज रक्कम वितरित केल्याचा आरोप बँकेचे तत्कालीन चेअरमन तसंच संचालक मंडळावर ठेवण्यात आला आहे.

कोणत्या कलमांतर्गत गुन्हा दाखल?

याबाबत भारतीय दंड विधान कलम 406, 408, 409, 420, 467, 468, 471, 109, 120 (ब), 34 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास आर्थिक गुन्हे शाखा करीत आहे.

(10 crore bogus loan disbursement case, case filed against 27 people including chairman of Seva Vikas Bank)

हे ही वाचा :

गजानन काळे यांच्याविरोधात गंभीर आरोप करत पत्नीकडूनच गुन्हा दाखल, मनसेत खळबळ

अनेक स्त्रियांशी संबंध, जातीवाचक शिवीगाळ आणि मारहाण, मनसे नेते गजानन काळेंवर पत्नीचे गंभीर आरोप

EXCLUSIVE : अनेक महिलांशी संबंध, मनसेच्या गजानन काळेंवर पत्नीचे गंभीर आरोप

Non Stop LIVE Update
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा.
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?.
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले.
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत.
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.