Pune crime : पोलंडमध्ये नोकरीचं आमिष दाखवून पुण्यातल्या 10 जणांची फसवणूक; आरोपी महिलेचा शोध सुरू

तक्रारदाराने सांगितले, की मी आता एका फायनान्स कंपनीत काम करत आहे. हे ऑफिस कॅम्पमध्ये आहे. पुण्याला परत येण्यापूर्वी मी रोमानियामध्ये अकुशल कामगार म्हणून एका उत्पादन कंपनीत काम करत होतो.

Pune crime : पोलंडमध्ये नोकरीचं आमिष दाखवून पुण्यातल्या 10 जणांची फसवणूक; आरोपी महिलेचा शोध सुरू
प्रातिनिधिक छायाचित्र
Image Credit source: tv9
प्रदीप गरड

|

Aug 10, 2022 | 10:57 AM

पुणे : पोलंडमध्ये नोकरी मिळवून देण्याचे आश्वासन देऊन ऑनलाइन फसवणूक (Online cheating) करण्यात आली आहे. पुण्यातील नाना पेठेतील रहिवाशाने यासंबंधी तक्रार केली आहे. त्यांच्यासह इतर नऊ जणांचीदेखील संबंधित आरोपीने फसवणूक केली आहे. जवळपास 10.55 लाख रुपयांना गंडा घालण्यात आला आहे. नाना पेठेतील रहिवासी श्रीकांत राजू शेलार (31) यांनी सोमवारी दाखल केलेल्या तक्रारीची समर्थ पोलीस (Samarth police) चौकशी करत आहेत. ही फसवणूक गेल्या वर्षी मे ते या वर्षी मार्चदरम्यान झाली होती. समर्थ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ निरीक्षक रमेश साठे म्हणाले, की श्रीकांत शेलार यापूर्वी रोमानियामध्ये अकुशल कामगार म्हणून कामाला होते आणि कोविडनंतर (Covid) ते भारतात परतले होते. गेल्या वर्षी मे मध्ये त्यांनी पुन्हा परदेशात नोकरी शोधण्यास सुरुवात केली.

शुल्क वसूल करण्यास सुरुवात

नोकरी शोधत असताना इंटरनेटवर एक संपर्क क्रमांक त्यांना सापडला. संबंधित व्यक्तीने परदेशात रोजगार मिळवण्यासाठी मदत करण्याचे आश्वासन दिले होते. ते म्हणाले, तक्रारदार आणि इतर नोकरी शोधणाऱ्यांनी त्या नंबरवर कॉल केला. एका महिलेने त्यांच्या कॉलला उत्तर दिले आणि त्यांना पोलंडमध्ये नोकरी देण्याचे वचन दिले. तिने त्यांच्या वर्क परमिट, व्हिसा आणि इतर कागदपत्रांवर प्रक्रिया करण्याची ऑफर दिली आणि पेपरवर्कसाठी शुल्क वसूल करण्यास सुरुवात केली. मात्र पैसे मिळाल्यानंतर तिने त्यांना बनावट कागदपत्रे पाठवली. यानंतर शेलार आणि इतरांनी पोलिसांकडे धाव घेतली.

परदेशात नोकरी शोधण्याचा निर्णय

शेलार यांनी सांगितले, की मी आता एका फायनान्स कंपनीत काम करत आहे. हे ऑफिस कॅम्पमध्ये आहे. पुण्याला परत येण्यापूर्वी मी रोमानियामध्ये अकुशल कामगार म्हणून एका उत्पादन कंपनीत काम करत होतो. मे महिन्यात कोविडची तीव्रता कमी झाल्यानंतर मी परदेशात नोकरी शोधण्याचा निर्णय घेतला. माझ्या मित्रांनीही मला त्यांच्यासाठी नोकरी शोधण्याची विनंती केली.

इंटरनेटवरून शोधला नंबर

पुढे तो म्हणाला, की मला इंटरनेटवर एका महिलेचा फोन नंबर सापडला. महिलेने आम्हाला सांगितले, की ती यूपीची आहे आणि ती वॉर्सा येथे नोकरी सल्लागार म्हणून काम करते. तिने सांगितले, की ती अनेक कंपन्यांच्या अधिकाऱ्यांना ओळखते. त्यानंतर तिने मला आणि माझ्या नऊ मित्रांना पोलंडमध्ये नोकरीसाठी मदत करण्याचे आश्वासन दिले. आम्हाला पोलंड आणि इतर युरोपीय देशांमध्ये अकुशल नोकऱ्या हव्या होत्या. तिने सल्लागार फी म्हणून 3,200-4,000 युरोची मागणी केली.

हे सुद्धा वाचा

‘पैसे ऑनलाइन ट्रान्सफर केले’

शेलार म्हणाले, की आमच्यापैकी प्रत्येकाने सुरुवातीला 1,000 युरो दिले, त्यानंतर पुन्हा आम्ही छोटे-मोठे पेमेंट करत राहिलो. आम्ही पैसे ऑनलाइन ट्रान्सफर केले होते. काही रक्कम आम्ही पोलंडमधील बँकेच्या खात्यात हस्तांतरित केली. इतर व्यवहार लखनौमधील एका बँक खात्यात करण्यात आले होते. तिने आम्हाला वर्क परमिट, जॉब ऑफर लेटर आणि व्हिसा पाठवणार असल्याचे सांगितले. मात्र बनावट कागदपत्रे पाठवली. आम्ही त्या महिलेची विचारपूस करताच तिने आमच्या फोनचे उत्तर देणे बंद केले, असे तक्रारदाराने सांगितले. दरम्यान आता पोलीस याचा तपास करीत आहेत.

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें