संतोष जाधवच्या साथीदारांकडून 13 बंदुकी आणि मोबाइल्स जप्त; सिद्धू मुसेवाला हत्येशी संबंध तपासणार, अभिनव देशमुखांची माहिती

| Updated on: Jun 18, 2022 | 11:54 AM

तीन वर्षापासून संतोष जाधवचा बिष्नोई गँगशी संबंध आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून हे संबंध त्याने प्रस्तावित केले. तर बिश्नोई गँगचा विस्तार हा पाच-सहा राज्यात आहे. या गँगचे काहीजण बाहेरच्या देशात आहेत. या गँगचे महाराष्ट्रातील पाळेमुळे खणून काढण्याचे काम आम्ही करत आहोत, अशी माहिती अभिनव देशमुख यांनी दिली.

संतोष जाधवच्या साथीदारांकडून 13 बंदुकी आणि मोबाइल्स जप्त; सिद्धू मुसेवाला हत्येशी संबंध तपासणार, अभिनव देशमुखांची माहिती
पत्रकार परिषदेत माहिती देताना अभिनव देशमुख
Image Credit source: tv9
Follow us on

पुणे : नारायणगाव पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींचे सिद्धू मुसेवाला (Sidhu Moose Wala) हत्येशी कनेक्शन आहे का, याचा तपास सुरू आहे, अशी माहिती पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख (Abhinav Deshmukh) यांनी दिली आहे. पुण्यातील पत्रकार परिषदेत ते बोलत होते. संतोष जाधवच्या दोन सहकाऱ्यांना आज नारायणगाव पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून मोठा पिस्तूलाचा साठा जप्त करण्यात आला. 13 बंदुकी आणि मोबाइल जप्त करण्यात आलेत तसेच एक गाडीही जप्त करण्यात आली आहे. जीवनसिंग नहार आणि त्याच्या साथीदाराला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. संतोष जाधव आणि बिष्नोई गँगची (Bishnoi gang) काही मुले ही मध्य प्रदेशला पाठवली होती आणि तिथून ही आणण्यात आली आहेत. महाराष्ट्रात याची काय लिंक आहे, याचा तपास सुरू आहे, असे अभिनव देशमुख म्हणाले.

‘मागितली होती खंडणी’

संतोष जाधव याचे लॉरेन्स बिष्नोई गँगशी संबंध आहेत. हे त्याने कबूल केले आहे. पंजाबमध्ये तो त्याच्या गावी जाऊनही आला आहे, पण शूटर्स कोण होते याचा तपास सुरू आहे, असेही त्यांनी सांगितले. राण्या बाणखेले हत्या प्रकरणातील मुख्य आणि सिद्धू मुसेवाला प्रकरणातील संशय आरोपी संतोष जाधववर नारायणगाव पोलिसांत नव्याने गुन्हा दाखल झाला. खंडणी मागितल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल झाला आहे. पाणी विक्रेत्याला खंडणीची मागणी करण्यात आली होती. संतोष जाधव आणि त्याच्या टोळीतील सहकारी यात होते. जीवनसिंग नहार आणि दूसरा सहकारी यांनी खंडणी मागितली होती. त्यांना मंचर, घोडेगाव या ठिकाणांहून अटक करण्यात आली आहे.

‘संतोष जाधव हा बिष्नोई गँगच्या संपर्कात’

तीन वर्षापासून संतोष जाधवचा बिष्नोई गँगशी संबंध आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून हे संबंध त्याने प्रस्तावित केले. तर बिश्नोई गँगचा विस्तार हा पाच-सहा राज्यात आहे. या गँगचे काहीजण बाहेरच्या देशात आहेत. या गँगचे महाराष्ट्रातील पाळेमुळे खणून काढण्याचे काम आम्ही करत आहोत, अशी माहिती अभिनव देशमुख यांनी दिली. संतोष जाधव हा बिष्नोई गँगच्या संबंधित मुख्य माणसाच्या संपर्कात आहे, असेही देशमुख म्हणाले. पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला हत्याप्रकरणी धागेदोरे शोधण्याचे काम सध्या विविध राज्यांतील पोलीस करत आहेत. याप्रकरणी महाराष्ट्रातील दोघांचा समावेश असल्याचा संशय आहे.

हे सुद्धा वाचा

‘घटनास्थळी होते का, याचा तपास सुरू’

अभिनव देशमुख म्हणाले, की ही शस्त्र जूनमध्ये आली आहेत. संतोष जाधवच्या सांगण्यावरून मुलांनी ही मध्य प्रदेशातून आणली. पंजाब, राजस्थान, हरयाणा राज्यांच्या टीम येऊन गेल्यात. सर्व एजन्सीजना माहिती शेअर करत आहोत. मुसेवाला संदर्भात आतापर्यंत 15 तारखेला त्यांनी डिटेल्स दिली आहेत. दरम्यान, महाराष्ट्रातून संतोष जाधव, सौरव महाकाळ यांच्यासह त्यांच्या काही साथीदारांना आतापर्यंत अटक करण्यात आली आहे. तर आज अटक केलेल्या आरोपींचे सिद्धू मुसेवाला हत्याप्रकरणाशी काही संबंध आहेत का, घटनास्थळी ते उपस्थित होते का, याचा तपास सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.