AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बस प्रवासातील ओळखीने महिलेला उद्धवस्त केले, अन् १६ लाख सुद्धा गमावले

आरोपी पुण्याला लागून असलेल्या पिंपरीतील नेहरूनगर येथील रहिवासी आहे. त्यांचे वय 33 वर्षे आहे. पीडित तरुणी पुण्याबाहेरील पारगाव येथील रहिवासी आहे.

बस प्रवासातील ओळखीने महिलेला उद्धवस्त केले, अन् १६ लाख सुद्धा गमावले
तलवार घेऊन दहशत माजवणाऱ्या गुंडाला अटकImage Credit source: Google
| Updated on: Mar 05, 2023 | 12:45 PM
Share

पुणे : पुणे शहारात अत्याचाराचे एक अनोखे प्रकरण समोर आले आहे. बस प्रवासात ओळख झालेल्या व्यक्तीने 27 वर्षीय महिलेवर अत्याचार केला. त्यानंतर त्याचे व्हिडिओ रेकॉर्डिंग केले. अन् व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन 16 लाख रुपये वसूल केले. 33 वर्षीय फईम नईम सय्यद याने हा प्रकार झाला. फईमची ओळख 27 वर्षीय महिलेशी बसमध्ये झाली होती. ओळखीचा फायदा घेत त्याने एकत्र जेवण करण्याच्या बहाण्याने महिलेला लॉजमध्ये बोलावले. त्यानंतर पेयात नशेची गोळी मिसळून पाजले. मग अत्याचार केला. अत्याचार करताना ऑडिओ-व्हिडिओ रेकॉर्डिंग केले. फोटोही काढले. हे सर्व व्हायरल करण्याची धमकी देऊन 16 लाख रुपये वसूल केले. सर्व काही असहाय झाल्यानंतर महिलेने पोलीस ठाणे गाठले. पुणे पोलिसांनी आरोपी फईम नईम सय्यद याला अटक केली आहे.

कशी झाली ओळख

आरोपी पुण्याला लागून असलेल्या पिंपरीतील नेहरूनगर येथील रहिवासी आहे. त्यांचे वय 33 वर्षे आहे. पीडित तरुणी पुण्याबाहेरील पारगाव येथील रहिवासी आहे. ती पुस्तके खरेदी करण्यासाठी बसने पुण्यात येत होती. या प्रवासात तिची आरोपीशी ओळख झाली. दोघांनी एकमेकांना मोबाईल नंबर दिले. त्यानंतर दोघांमध्ये चर्चा सुरू झाली. गेल्या वर्षी दोन नोव्हेंबरला ती पुन्हा पुण्यात आली. काही पुस्तके खरेदी केली.

ऑडिओ-व्हिडिओ रेकॉर्डिंगही केले

यावेळी आरोपी फईमने तिच्याशी संपर्क साधला. फईमने सोबत जेवणाची ऑफर दिली आणि नंतर जंगली महाराज रस्त्यावर असलेल्या एका रेस्टॉरंटमध्ये नेले. येथे कोल्ड्रिंकमध्ये नशेची गोळी मिसळली. यानंतर त्या महिलेला एका लॉजवर घेऊन गेला. तेथे महिलेवर बलात्कार केला. हे करत असताना त्यांनी छायाचित्रे काढली आणि ऑडिओ-व्हिडिओ रेकॉर्डिंगही केले.

 धमकी देऊन पैसे उकळले

यानंतर महिला तिच्या घरी पोहोचली तेव्हा फईमने तिला फोन करून सर्व प्रकार सांगितला. त्याने ते सर्व रेकॉर्डिंग पाठवले आणि ते व्हायरल करण्याची धमकी द्यायला सुरुवात केली. आपल्या इज्जतीसाठी महिलेने बँकेतून कर्ज काढून त्याला 16 लाख 86 हजार रुपये दिले. यानंतरही फईमची मागणी थांबली नाही. त्याची धमक्यांची मालिका सुरूच होती. शेवटी महिलेने त्याच्याविरोधात पुण्यातील शिवाजी नगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पुणे पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपीला अटक करून पुढील कारवाई सुरू केली.

वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.