AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कोयना धरण परिसरात भूकंपाचा धक्का, धरणावरील अधिकाऱ्यांनी म्हटले…

Koyna Dam Earthquake : कोयना धरण परिसरात शनिवारी रात्री भूकंपाचे धक्का बसला. भूकंपाची जमिनीतील खोली सात किलोमीटर असल्याची नोंद झाली. भूकंपाच्या या धक्क्यामुळे कोयना धरणाला कोणताही धोका पोहचला नाही, असे धरणावरील अधिकाऱ्यांनी सांगितले.

कोयना धरण परिसरात भूकंपाचा धक्का, धरणावरील अधिकाऱ्यांनी म्हटले...
koyna dam earthquakeImage Credit source: tv9 Marathi
| Updated on: Oct 29, 2023 | 12:01 PM
Share

दिनकर थोरात, कराड, सातारा | 29 ऑक्टोंबर 2023 : कोयना धरणko परिसरात अधूनमधून भूकंपाचे धक्के बसत असतात. आता पुन्हा शनिवारी कोयना धरण परिसरात भूकंप जाणवला. सातारा कोयना नगर परिसरात रात्री 9.06 मिनिटांनी भूकंपाची नोंद करण्यात आली. 2.9 रिश्टेल स्केलचा हा भूकंपाचा धक्का असल्याची नोंद करण्यात आली. या भूकंपाच्या धक्क्यामुळे कुठेही नुकसान झाले नाही. भूकंपाचा केंद्रबिंदू कोयना विभागात गोषटवाडी गावच्या पश्चिमेला 7 किलोमीटर अंतरावर होता. भूकंपाची जमिनीतील खोली सात किलोमीटर असल्याची नोंद कोयना भूकंप मापन केंद्रावर झाली आहे. या भूकंपाचा कोणताही परिणाम कोयना धरणावर झाला नसल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

कोयना धरण सुरक्षित

भूकंपाचा धक्क्यानंतर कोयना धरण सुरक्षित असल्याची माहिती कोयना धरणावर असलेल्या सिंचन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली. भूकंपाच्या या धक्क्यामुळे परिसरात कुठेही कोणतीही हानी झाली नाही. तसेच कोठेही पडझड झाली नाही. भूकंपाचा हा धक्का सौम्य होता. तो कोयनानगर परिसरातच जाणवल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. कोयना धरण परिसरात वारंवार भूकंपाचे धक्के जाणवत असतात. या भूकंपांच्या धक्क्यांची रिश्टर स्केलवर तीव्रता कमी आहे. यामुळे कोयना धरणाला कोणतीही हानी पोहचली नाही.

यंदाच्या वर्षात हा सातवा धक्का

सातारामधील पाटण तालुक्यात कोयना धरण आहे. या परिसरास कोयनानगर म्हटले जाते. या ठिकाणी सातत्याने भूकंपाने धक्के जाणवत असतात. गेल्या वर्षभरातील हा सातवा भूंकपाचा धक्का आहे. 2023 मध्ये 8 जानेवारी पहिला भूकंप या ठिकाणी जाणवला होता. त्यानंतर 1 फेब्रुवारी 2023 मध्ये दुसरा भूकंप आला. 6 मे 2023 रोजी तिसरा तर16 ऑगस्ट 2023 रोजी चौथा धक्का बसला होता. 7 सप्टेंबर 2023 रोजी पाचवा तर 29 ऑक्टोबर रोजी सहावा भूंकपाचा धक्का बसला. 28 ऑक्टोबर 2023 रोजी सातवा धक्का बसला.

कोयना धरण परिसरात 2021 मध्ये तब्बल 128 भूकंप जाणवले होते. त्या वर्षी सौम्य आणि अती सौम्य प्रकारच्या भूकंपाची ही मालिका सुरू होती. कोयना धरण परिसरात भूकंपाचे धक्के वारंवार का जाणवतात, यावर संशोधन होण्याची गरज स्थानिक नागरिकांनी केली आहे.

मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई.
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल.
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली.
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात.
पार्थ पवार घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांवर ठपका, त्यांनी का रोखलं नाही?
पार्थ पवार घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांवर ठपका, त्यांनी का रोखलं नाही?.
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका.
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?.
रस्त्यावरच्या मुलांची DNA टेस्ट करा, राज ठाकरेंचं थेट फडणवीसांना पत्र
रस्त्यावरच्या मुलांची DNA टेस्ट करा, राज ठाकरेंचं थेट फडणवीसांना पत्र.
आवास योजनेतल्या इमारतींना अधिकाऱ्यांची नाव, संभाजीनगर महापालिकेचा फतवा
आवास योजनेतल्या इमारतींना अधिकाऱ्यांची नाव, संभाजीनगर महापालिकेचा फतवा.
तरुणांचं हिंसक आंदोलन, अधिवेशनावर जाणारा लोटांगण मोर्चा पोलिसानी रोखला
तरुणांचं हिंसक आंदोलन, अधिवेशनावर जाणारा लोटांगण मोर्चा पोलिसानी रोखला.