Jejuri | कोरोना संसर्ग टाळण्यासाठी जेजुरीच्या श्री मार्तंड देवसंस्थानने घेतला मोठा निर्णय ; वाचा संपूर्ण माहिती
ओमिक्रॉनच्या वाढत्या विषाणूमुळे महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या जेजुरी येथील खंडेरायाच्या मंदिरात दर्शन घेण्यासाठीचे नियम पुन्हा एकदा कडक करण्यात आले आहेत.

पुणे – जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येबरोबबरच ओमिक्रॉनची रुग्ण संख्या वाढत आहे. महापालिका प्रशासन याबाबत सर्तक झाले आहे. जिल्हा प्रशासनानं कोरोनाची नियमावलीही कडक केली आहे.ओमिक्रॉनच्या वाढत्या विषाणूमुळे महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या जेजुरी येथील खंडेरायाच्या मंदिरात दर्शन घेण्यासाठीचे नियम पुन्हा एकदा कडक करण्यात आले आहेत.
या नियमांचे करावे लागेल पालन
- कुलदैवत खंडेरायाच्या गडावर दर्शन घेण्यासाठी आता कोविड लस घेतलेल्यांनाच प्रवेश मिळणार आहे.
- लसीकरणाचे किमान १ किंवा २ डोस पूर्ण केलेल्या भाविकांना खंडेरायाच्या मंदिरात प्रवेश देण्यात येणार आहे.
- ज्या भाविकांना खंडेरायाचे दर्शन घ्यायचे आहे त्यांना लसीकरणाचे तपशील प्रवेशद्वारावर उपस्थित कर्मचारी वर्गाला सादर करणे अथवा दाखविणे बंधनकारक आहे.
- वय वर्ष १० पेक्षा कमी तसेच वय वर्ष ६५ पेक्षा अधिक वयाच्या भाविकांना मंदिरात प्रवेश बंद करण्यात आला आहे.
- मंदिरात मास्क शिवाय प्रवेश नसेल.
- तसेच सोशल डिस्टन्सींग राखणे सहकोविड नियमावंलीचे पालन बंधनकारक करण्यात आले असल्याची माहिती श्री मार्तंड देवसंस्थांच्या विश्वस्त मंडळाने दिली आहे.
हजारो भाविक भेट देतात महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या जेजुरी येथे महाराष्ट्राच्या विविध भागातून दररोज हजारो नागरिक दर्शनासाठी येतात. त्यामुळे कोरोनाच्या नियमावलीचे पालन करणे. आवश्यक आहे. यापुढे मंदिरात होता असलेली गर्दी टाळण्याकडंही लक्ष दिले जाणार आहे.
TET Exam : टीईटी प्रमाणपत्रांची पडताळणी करण्याचा निर्णय, शिक्षण विभागाला गैरप्रकाराचा संशय
Viral : …आणि जोडपं पडलं चिखलाच्या खड्ड्यात! नेमकं घडलं तरी काय? नेटिझन्स म्हणतायत…
पोलिसांची पगार खाती Axis Bank मध्ये वळवली, फडणवीस-SBI ला कोर्टाची नव्याने नोटीस
