Pune crime : पैसे मोजण्याचा बहाणा करत सेवानिवृत्त शिक्षिकेला भरदिवसा लुटलं, ‘बँक ऑफ महाराष्ट्र’च्या सुरक्षेवर खातेधारकांचं प्रश्नचिन्ह

कॅश काऊंटरजवळचा हा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. कॅप घातलेली एक व्यक्ती रांगेत उभी असल्याचे दिसत आहे. संबंधित महिलेशी संवाद साधत त्याने महिलेच्या हातातील कॅश घेत मोजून देण्याचा बहाणा केला आणि हातचलाखी करत नोटा आपल्याजवळ घेतल्या.

Pune crime : पैसे मोजण्याचा बहाणा करत सेवानिवृत्त शिक्षिकेला भरदिवसा लुटलं, बँक ऑफ महाराष्ट्रच्या सुरक्षेवर खातेधारकांचं प्रश्नचिन्ह
बँक ऑफ महाराष्ट्रच्या राजगुरूनगर शाखेत हातचलाखी करत निवृत्त शिक्षिकेला लुटताना आरोपी
Image Credit source: tv9
| Edited By: | Updated on: Aug 30, 2022 | 10:08 AM

राजगुरूनगर, पुणे : भरदिवसा सेवानिवृत्त शिक्षिकेला बँकेत लुटण्याचा (Robbed) गंभीर प्रकार घडला आहे. बँक ऑफ महाराष्ट्रच्या राजगुरूनगर शाखेत ही घटना घडली आहे. राजगुरूनगर येथील बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये पैशाचा भरणा करण्यासाठी आलेल्या सेवानिवृत्त शिक्षक महिलेला हातचलाखी करत बँकेत लुटण्यात आल्याची ही धक्कादायक घटना घडली आहे. त्यामुळे बँक ऑफ महाराष्ट्रची (Bank of Maharashtra) सुरक्षा रामभरोसे झाली आहे का, असाच प्रश्न उपस्थित केला जात आहे. भरदिवसा महिलेची फसवणूक करत लुटण्यात आल्याचा प्रकार बँकेतील सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे. राजगुरूनगर (Rajgurunagar) शहरातील मध्यवर्ती भागात असणाऱ्या बँक ऑफ महाराष्ट्रच्या शाखेत सेवानिवृत्त पती पत्नी शिक्षक बँकेतील खात्यात पैशाचा भरणा करण्यासाठी गेले होते. त्यावेळी हा प्रकार घडला आहे.

हातचलाखी करत लुटली रोकड

बँकेच्या स्लिपवर स्वाक्षरी घेत असताना बँकेतच पैसे मोजण्याचा बहाणा करत एका अज्ञात इसमाने महिलेच्या हातातील पैसे एकत्र करून देतो, असे सांगत हातचलाखी करत 27 हजार रुपये लंपास केले आणि बँकेतून पसार झाला. त्यामुळे बँकेत भर दिवसा सेवानिवृत्त शिक्षक महिलेला बँकेतच लुटण्याचा गंभीर प्रकार घडला आहे. राजगुरूनगर पोलिसांत अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे बँक ऑफ महाराष्ट्रमधील सुरक्षा रामभरोसे आहे का, असाही प्रश्न या निमित्ताने उभा राहिला आहे.

रांगेतून मध्येच निघूनही जातो

कॅश काऊंटरजवळचा हा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. कॅप घातलेली एक व्यक्ती रांगेत उभी असल्याचे दिसत आहे. संबंधित महिलेशी संवाद साधत त्याने महिलेच्या हातातील कॅश घेत मोजून देण्याचा बहाणा केला आणि हातचलाखी करत नोटा आपल्याजवळ घेतल्या. विशेष म्हणजे काही वेळ रांगेत उभे राहत आपला नंबर येण्याआधीच ही व्यक्ती तेथून पसार होते, हे सीसीटीव्हीत दिसत आहे. आता या आरोपींचा राजगुरूनगर पोलीस शोध घेत आहेत.

‘सतर्क राहा’

बँकेचा कोणताही व्यवहार करताना त्रयस्त व्यक्तीपासून दूर राहावे, कोणतीही माहिती उघड करू नये, अशाप्रकारच्या सूचना पोलिसांकडून वारंवार देण्यात येतात. मात्र नागरिक चोरट्यांच्या आमिषांना बळी पडतात, हे वारंवार दिसून येत आहे. विशेष म्हणजे शिक्षित लोकही याला बळी पडत असल्याने आश्चर्यही व्यक्त होत आहे.