पुणे मनपा निवडणुकीत सर्व जागा लढवणार, आम आदमी पार्टीची घोषणा

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: |

Updated on: Sep 03, 2021 | 4:31 PM

आम आदमी पक्षाने पुणे महानगरपालिकेबाबत मोठी घोषणा केलीय. आप पुणे मनपा निवडणुकीत सर्व जागा लढवणार आहे. त्यामुळे पुण्यातील निवडणुकीची चुरस आणखीच वाढणार आहे. भाजप, काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसेसह आता आपही निवडणूक रिंगणात दिसणार आहे.

पुणे मनपा निवडणुकीत सर्व जागा लढवणार, आम आदमी पार्टीची घोषणा

पुणे : आम आदमी पक्षाने पुणे महानगरपालिकेबाबत मोठी घोषणा केलीय. आप पुणे मनपा निवडणुकीत सर्व जागा लढवणार आहे. त्यामुळे पुण्यातील निवडणुकीची चुरस आणखीच वाढणार आहे. भाजप, काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसेसह आता आपही निवडणूक रिंगणात दिसणार आहे. आपच्या राज्य समितीने पुण्यात पत्रकार परिषद घेत पुण्यातील कॅन्टोन्मेंटसह मनपाच्या सर्व जागा लढवणार असल्याची घोषणा केली.

आपचे राज्य अध्यक्ष रंगा राचुरे म्हणाले, “गेले काही दिवस आप राज्यसमिती विविध शहरांना भेटी देत असून कार्यकर्त्यांशी संवाद साधत आहे. शहरी तोंडावळा असूनही आम्हाला ग्रामीण भागात ग्रामपंचायतीमध्ये चांगला प्रतिसाद मिळाला. आता पुण्यासारख्या शहरात चांगला प्रतिसाद जनतेकडून मिळेल.”

“‘भाजप राष्ट्रवादी भाऊ भाऊ, सर्व वाटून खाऊ’ या धोरणाचा पर्दाफाश”

“पुण्यात महसूल विभागापाठोपाठ महानगरपालिकेत लोकप्रतिनिधी च्या आशीर्वादाने टक्केवारी आणि भ्रष्टाचारबाबत नवा टप्पा गाठला आहे. या ‘भाजप राष्ट्रवादी भाऊ भाऊ , सर्व वाटून खाऊ’ या धोरणाचा पर्दाफाश झाला आहे. त्यामुळे आता आपची ही निवडणूक पुणेकर जनताच लढवेल,” असंही राचुरे यांनी नमूद केलं.

“पुणेकरांच्या समस्या आधारित जाहीरनामा तयार करणार”

पुण्याच्या बजेटमधील निधी मूलभूत सुविधा ऐवजी सुशोभीकरणावर खर्च  होतो आहे. दिल्लीत केवळ वचननामा दिला नाही, तर सर्व आश्वासनं पूर्तता केली. तोच विश्वास आम्ही पुणेकरांना देऊ इच्छितो. निधीचा अपव्यय टाळला तरी मोठे उद्दिष्टे साध्य होऊ शकतात. पुणेकरांच्या समस्या आधारित जाहीरनामा तयार केला जाईल, असं आपचे राज्य संघटक विजय कुंभार यांनी सांगितले.

“प्रस्थापित राजकीय पक्षांकडून जनतेची फसवणूक, आप हा पर्याय जनता स्वीकारेल”

आपचे राज्य सचिव धनंजय शिंदे म्हणाले, “आप हा स्वच्छ प्रतिमेचा पक्ष आहे. महाराष्ट्रातील आर्थिक परिस्थिती ढासळली आहे. अश्या स्थितीत आप सारखा राजकीय पर्यायच ही परिस्थिती सुधारू शकतो.” “दिल्लीतील विकास कामे आणि प्रस्थापित राजकीय पक्षांकडून होत असलेली जनतेची फसवणूक यामुळे आप हा पर्याय जनता स्वीकारेल,” असं मत आपचे सह संयोजक किशोर मंध्यान यांनी व्यक्त केलं.

या पत्रकार परिषदेत पुणे शहर अध्यक्ष मुकुंद किर्दत , संघटन मंत्री डॉ अभिजित मोरे, सह संयोजक संदीप सोनावणे, संदेश दिवेकर, विद्यानंद नायक आदी उपस्थित होते.

हेही वाचा :

पुणे महापालिका निवडणुकीसाठी शिवसेना राष्ट्रवादीचं ठरलं, संजय राऊतांकडून मोठी घोषणा

पुणे पालिकेत भाजप बहुमतापासून दूर राहणार?

पुणे महापौर निवडणुकीत ट्विस्ट, महासेनाआघाडी रिंगणात, भाजपचाही उमेदवार जाहीर!

व्हिडीओ पाहा :

AAP going to contest all seats in upcoming Pune corporation election

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI