Pune Aircraft Crashed | बारामतीत ट्रेनिंग सेंटरच्या विमानाचा पुन्हा अपघात, प्रशिक्षण सुरु असताना…

Pune Aircraft Crashed | पुणे जिल्ह्यातील बारामतीत एका ट्रेनिंग सेंटरच्या विमानाचा पुन्हा अपघात झाला. रविवारी सकाळी झालेल्या या अपघातात विमानाचे मोठे नुकसान झाले. हा अपघात झाला तेव्हा त्या एअरक्रॉप्टमध्ये दोघे जण होते.

Pune Aircraft Crashed | बारामतीत ट्रेनिंग सेंटरच्या विमानाचा पुन्हा अपघात, प्रशिक्षण सुरु असताना...
Aircraft Crashed
Follow us
| Updated on: Oct 22, 2023 | 12:18 PM

पुणे | 22 ऑक्टोंबर 2023 : पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यात प्रशिक्षण देणाऱ्या विमानाचा अपघात झाला आहे. रविवारी सकाळी बारामती तालुक्यातील गाडीखेल गावात हे विमान कोसळले. विमानाचा अपघात झाला तेव्हा त्यात प्रशिक्षणार्थी आणि पायलट ट्रेनर दोघे होते. एका शेतात हे विमान कोसळले. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवीतहानी झाली नाही. प्रशिक्षणार्थी आणि पायलट ट्रेनर दोघांना किरकोळ दुखापत झाली आहे. अपघात झाल्यानंतर ग्रामस्थांनी मदतीसाठी धाव घेत जखमींना रुग्णालयात दाखल केले. या अपघाताची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहे.

कसा झाला अपघात

पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यात सकाळी 6:40 वाजता रेडबर्ड प्लाईट ट्रेनिंग सेंटरच्या विमानाचा अपघात झाला. या एअरक्रॉफ्टच्या माध्यमातून प्रशिक्षण दिले जात असताना गाडीखेल गावाजवळ हा अपघात झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघात झाला त्यावेळी या एअरक्रॉफ्टमध्ये फक्त पायलट आणि प्रशिक्षणार्थी होते. अपघातात दोघे जखमी झाले आहेत. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. विमान लॅण्डीग करत असताना हा अपघात झाला.

aircraft

चार दिवसांत दुसरा अपघात

अपघात झालेले विमान रेडबर्ड फ्लाइट ट्रेनिंग सेंटरचे आहे. यापूर्वी गुरुवारी या कंपनीच्या विमानाचा अपघात झाला होता. पुणे जिल्ह्यातील कटफल गावाजवळ हा अपघात झाला होता. गुरुवारी संध्याकाळी झालेल्या या अपघातात पायलट आणि को-पायलट जखमी झाले होते. अपघातात जखमी झालेल्या दोघांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. नागरी विमान वाहतूक महासंचालनालयच्या टीमने शुक्रवारी घटनास्थळी भेट देऊन अपघाताची चौकशी केली. परंतु अद्याप अपघाताचे कारण समोर आले नाही.

हे सुद्धा वाचा

aircraft

अपघाताच्या चौकशीचे आदेश

रविवारी सकाळी बारामती तालुक्यात झालेल्या विमान अपघाताच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. दरम्यान चार दिवसांत दोन वेळा अपघात झाल्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. विमानात काही तांत्रिक बिघाड झाले की अन्य दुसरे कारण हे चौकशीनंतर स्पष्ट होणार आहे. अपघातानंतर जखमींना ग्रामस्थांनीही मदत केली.

देवेंद्र फडणवीस रात्री येऊन ठाकरेंना भेटले ? काय म्हणाले राऊत ?
देवेंद्र फडणवीस रात्री येऊन ठाकरेंना भेटले ? काय म्हणाले राऊत ?.
कॉंग्रेस देशातील सर्वात बेईमान आणि भ्रष्ट पार्टी - नरेंद्र मोदी
कॉंग्रेस देशातील सर्वात बेईमान आणि भ्रष्ट पार्टी - नरेंद्र मोदी.
उद्धव यांचा इगो दुखावल्याने मेट्रोचं काम थांबलं, फडणवीस यांचा आरोप
उद्धव यांचा इगो दुखावल्याने मेट्रोचं काम थांबलं, फडणवीस यांचा आरोप.
चार दिवस सासूचे,पण सुनेचं चार दिवस यायचे की नाही, काय म्हणाले अजितदादा
चार दिवस सासूचे,पण सुनेचं चार दिवस यायचे की नाही, काय म्हणाले अजितदादा.
पवार यांनी बेजबाबदार विधानं करणे थांबवावे, लक्ष्मण हाके यांची मागणी
पवार यांनी बेजबाबदार विधानं करणे थांबवावे, लक्ष्मण हाके यांची मागणी.
'कोणी माई का लाल लाडकी बहीण योजना...,' काय म्हणाले एकनाथ शिंदे
'कोणी माई का लाल लाडकी बहीण योजना...,' काय म्हणाले एकनाथ शिंदे.
कॉंग्रेस तरुणांना ड्रग्जच्या नशेत ढकलत आहे, मोदींनी केला मोठा आरोप
कॉंग्रेस तरुणांना ड्रग्जच्या नशेत ढकलत आहे, मोदींनी केला मोठा आरोप.
अग्निवीर म्हणजे पेन्शन संपविण्याची योजना, राहुल गांधी यांची टीका
अग्निवीर म्हणजे पेन्शन संपविण्याची योजना, राहुल गांधी यांची टीका.
येत्या दीड महिन्यात गद्दार बेकार होणार आहेत, पण...काय म्हणाले ठाकरे
येत्या दीड महिन्यात गद्दार बेकार होणार आहेत, पण...काय म्हणाले ठाकरे.
महाराष्ट्रात 3 ठिकाणी NIA आणि ATS ची संयुक्त कारवाई
महाराष्ट्रात 3 ठिकाणी NIA आणि ATS ची संयुक्त कारवाई.