AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pimpri-Chinchwad Municipal Corporation| पुण्यानंतर आता पिंपरची प्रभाग रचनाही 1 फेब्रुवारीला जाहीर होणार ; लवकरच निवडणूका जाहीर

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा आराखडा सादर केल्यानंतर त्यावर 1 ते 14 फेब्रुवारी दरम्यान हरकती सूचना मागविल्या जाणार आहेत. या सुचना साधारण 16 फेब्रुवारीपर्यंत आयोगाला सादर कराव्यात लागणार आहेत. या हरकती व सूचनांवर 26 फेब्रुवारी रोजी या हरकतीवर सुनावणी घेण्यात येईल.

Pimpri-Chinchwad Municipal Corporation|  पुण्यानंतर आता पिंपरची प्रभाग रचनाही 1 फेब्रुवारीला जाहीर होणार ; लवकरच निवडणूका जाहीर
पिंपरी चिंचवड महानगरपालिकाImage Credit source: Tv9
| Edited By: प्राजक्ता ढेकळे | Updated on: Jan 30, 2022 | 11:58 AM
Share

प्राजक्ता ढेकळे, पिंपरी-  पुणे , नागपूरनंतर आता पिंपरी-चिंचवड महापालिका(Pimpri-Chinchwad Municipal Corporation) निवडणुकीसाठीचा प्रारुप प्रभाग रचनेचा आराखडा (Ward formation plan) 1 फेब्रुवारी 2022 रोजी जाहीर होण्याची शक्यता आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा आराखडा सादर केल्यानंतर त्यावर 1 ते 14 फेब्रुवारी दरम्यान हरकती सूचना मागविल्या जाणार आहेत या सुचना साधारण 16 फेब्रुवारीपर्यंत आयोगाला सादर कराव्यात लागणार आहेत. या हरकती व सूचनांवर 26 फेब्रुवारी रोजी या हरकतीवर सुनावणी घेण्यात येईल. सुनावणीनंतर प्राधिकृत अधिकाऱ्यांनी केलेल्या शिफारसी 2 मार्च 2022 रोजी निवडणूक आयोगाला (Election Commission) पाठवावे लागणार आहे.

अशी आहे महापालिकेच्या प्रभाग रचना

पिंपरी-चिंचवड महापालिकेची निवडणूक तीनसदस्यीय पद्धतीने होणार आहे. यामध्ये महापालिका प्रशासनाने प्रारुप प्रभाग रचनेचा कागदोपत्री प्रस्ताव 13 जानेवारी 2022 रोजी आयोगाला सादर केला होता. सदस्यसंख्या व आरक्षणाची परिगणना, हद्दींची व्याप्ती व वर्णनाबाबत, निवडणूक प्रभागांमध्ये समाविष्ट प्रगणक गट व लोकसंख्या, प्रगणक गटनिहाय माहिती, अनुसूचित जातीचा प्रभागनिहाय उतरता क्रम, अनुसूचित जमातीचा प्रभागनिहाय उतरता क्रम, सदस्य संख्या व आरक्षणाचे एकत्रित विवरणपत्र, प्रगणक गटाचे विभाजन करताना द्यावयाचे प्रमाणपत्र, समितीने प्रारुप प्रभाग रचनेबाबत द्यावयाचे प्रमाणपत्र अशी सविस्तर कागदोपत्री माहितीचा प्रस्ताव पाठविला होता.आयोगाचे सचिव किरण कुरुंदकर यांनी हा कार्यक्रम महापालिकेला पाठविला आहे.

3 सदस्यांचे 45 तर 4 सदस्यांचा 1 प्रभाग असणार!

शहराची लोकसंख्या 17 लाख 27 हजार 692 आहे. त्यात अनुसूचित जाती (एससी)ची 2 लाख 73 हजार 810 आणि अनुसूचित जमाती (एसटी)ची 36 हजार 535 लोकसंख्या आहे. नगरसेवकांची संख्या 139 आहे. 139 नगरसेवकांपैकी 69 पुरुष तर 70 महिला नगरसेविका अशी वर्गवारी असणार आहे. 114 जागा खुल्या प्रवर्गासाठी असतील. त्यातील 57 जागा महिलांसाठी असतील. अनुसूचित जाती (एससी) साठी 22 जागा राखीव असतील. त्यात 11 महिला आणि 11 पुरुषांसाठी जागा असणार आहेत. 2 महिला आणि 1 पुरुषाकरिता अशा 3 जागा अनुसूचित जमाती (एसटी)साठी राखीव असणार आहेत. निवडणुकीत एकूण 46 प्रभाग असणार आहेत. त्यात 3 सदस्यांचे 45 आणि 4 सदस्यांचा 1 प्रभाग असणार आहे.

Cutest Band : एकापेक्षा एक… चिमुल्यांचा असा Cute बँड पाहिला नसेल, सोशल मीडियावर मिळवतायत वाहवा!

14 सिम कार्ड स्लॉटशिवाय येणार Apple iPhone 14! जाणून घ्या कशी असेल ई-सिम सुविधा

Nagpur Crime | वेकोलीचा व्यवस्थापक सीबीआयच्या जाळ्यात; कंत्राटदाराकडून कशासाठी मागितली लाच?

Follow Us
भाजपमध्ये आतल्याआतच मोठं घडतंय? बड्या नेत्याचं पद जाईल म्हणून...
भाजपमध्ये आतल्याआतच मोठं घडतंय? बड्या नेत्याचं पद जाईल म्हणून... उद्धव ठाकरेंनी सांगितली इनसाईड स्टोरी
इतिहास आहे, इकडचे खासदार काही वर्षांनी.. संजय जाधवांच्या मतदारसंघातील
इतिहास आहे, इकडचे खासदार काही वर्षांनी.. संजय जाधवांच्या मतदारसंघातील दौऱ्यापूर्वीच उद्धव ठाकरेंचे विधान
अजित पवारांच्या आठवणीत सुप्रिया सुळे झाल्या भावूक! शेअर केला तो खास फो
Supriya Sule | अजित पवारांच्या आठवणीत सुप्रिया सुळे झाल्या भावूक! शेअर केला तो खास फोटो
धक्कादायक! आठवड्याभरातच मुंबई लोकलमध्ये तिसरा चाकू हल्ला; माहिममध्ये..
धक्कादायक! आठवड्याभरातच मुंबई लोकलमध्ये तिसरा चाकू हल्ला; माहिममध्ये...
एक-एक टक्का देतो, आधी 40... शिंदेंच्या आमदाराचा व्हिडीओ व्हायरल; खळबळ
एक-एक टक्का देतो, आधी 40...  शिंदेंच्या आमदाराचा व्हिडीओ व्हायरल; एकच खळबळ
श्रीकांत शिंदेंसह ओमराजेंनाही मंत्रीपदाची लॉटरी? स्वतःच केला मोठा खुला
Omraje Nimbalkar | श्रीकांत शिंदेंसह ओमराजेंनाही मंत्रीपदाची लॉटरी? स्वतःच केला मोठा खुलासा, म्हणाले....
ओमराजे निंबाळकर विमानतळावर पोहोचण्यापूर्वीच भयंकर घडलं; थेट पोलीस
Omraje Nimbalakar | ओमराजे निंबाळकर विमानतळावर पोहोचण्यापूर्वीच भयंकर घडलं; थेट पोलीस... मोठा गोंधळ
देवेंद्रजी हुशार, कपटी मित्र...एकनाथ शिंदेंची ठाकरेंवर बोचरी टीका, नेम
देवेंद्रजी हुशार, कपटी मित्र...एकनाथ शिंदेंची ठाकरेंवर बोचरी टीका, नेमकं काय म्हणाले?
मोठी अपडेट! NEETनंतर आता टीईटी पेपरफुटीत भयंकर खुलासा; धाड टाकताच
मोठी अपडेट! NEETनंतर आता टीईटी पेपरफुटीत भयंकर खुलासा; धाड टाकताच पोलिसांना...
तर नोकरी सोडून राजकारणात या, विश्वास नांगरे पाटलांच्या त्या भाषणानंतर
तर नोकरी सोडून राजकारणात या, IPS विश्वास नांगरे पाटलांच्या त्या भाषणानंतर राज ठाकरेंचा थेट हल्लबोल!