बुलढाणा अपघाताच्या पार्श्वभूमीवर पुणे आरटीओचा मोठा निर्णय, ट्रॅव्हल्सवर करडी नजर अन्…

Buldhana Bus Accident : बुलढाणा येथे ३० जून रोजी मध्यरात्री भीषण अपघात झाला. या अपघातात 25 जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. या अपघाताच्या पार्श्वभूमीवर पुणे उपप्रादेशिक परिवहन विभागाने मोठा निर्णय घेतला आहे.

बुलढाणा अपघाताच्या पार्श्वभूमीवर पुणे आरटीओचा मोठा निर्णय, ट्रॅव्हल्सवर करडी नजर अन्...
Pune RTO
Follow us
| Updated on: Jul 04, 2023 | 1:35 PM

अभिजत पोते, पुणे : बुलढाणा येथील सिंदखेड राजाजवळ असलेल्या पिंपळखुटा येथे ३० जूनच्या मध्यरात्री भीषण अपघात झाला. विदर्भ ट्रॅव्हलच्या बसला अपघात झाला. या अपघातात बस पेटल्यामुळे २५ जणांचा होरपळून मृ्त्यू झाला. हा अपघात कसा झाला? यासंदर्भात चौकशी सुरु आहे. वर्षभरात या महामार्गावर अपघातांचे सत्र सुरू आहे. त्यात 300 पेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाला आहे. बुलढाणा येथील अपघात चालकाला डुलकी लागल्याने झाल्याचे सांगण्यात येत आहे तर टायर फुटल्यामुळे हा अपघात झाल्याचे सांगितले जात आहे. या अपघातातून धडा पुणे उपप्रादेशिक परिवहन विभागाने घेतला आहे.

काय आहे निर्णय

पुणे आरटीओकडून खाजगी ट्रॅव्हल्सची तपासणी होणार आहे. समृद्धी महामार्गावर झालेल्या या अपघातानंतर पुणे आरटीओ सतर्क झाले आहे. पुणे शहर आणि जिल्ह्यातून सुटणाऱ्या ट्रॅव्हल्सवर आरटीओची करडी नजर असणार आहे. सर्व खाजगी ट्रॅव्हल्सचा आपत्कालीन दरवाजा, वेग नियंत्रक उपकरणाची आरटीओकडून नियमित तपासणी होणार आहे. या तपासणीसाठी पुणे आरटीओने वायुवेग पथकाची स्थापना केली आहे. पुणे येथून विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात जाणाऱ्या सर्व खाजगी ट्रॅव्हल्सची तपासणी होणार आहे. तपासणीनंतर त्रुटी आढळल्यास त्या ट्रॅव्हल्सवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे.

पुणे जिल्ह्यातील सात जणांचा मृत्यू

बुलढाणा जिल्ह्यात झालेल्या अपघातात पुणे जिल्ह्यातील सात जणांचा मृत्यू झाला. त्यात पिंपळे सौदागर येथील जरवरी सोसाटीतील राहणाऱ्या वनकर कुटुंबातील तीन जण होते. या सोसायटीतील शोभा वनकर (वय ६०), वृषाली वनकर (वय ३८) आणि ओवी वनकर (वय २ वर्षे) यांचा मृत्यू झाला. त्यानंतर पुणे जिल्ह्यातील शिरुर येथील गंगावणे कुटुंबियांतील तिघांचा मृत्यू झाला आहे. त्यात कैलास गंगावणे (वय 48 ), त्यांची पत्नी कांचन गंगावणे (वय 38) आणि मुलगी सई गंगावणे (वय 20) यांचा समावेश होता. पुणे शहरातील रहिवाशी राजश्री प्रकाश गांडोळे यांचाही मृत्यू झाला आहे.

हे सुद्धा वाचा

हे ही वाचा

बुलढाणा बस अपघातातील सात जण पुणे शहरातील, दोन कुटुंबातील सहा जणांचा समावेश

Non Stop LIVE Update
बाळासाहेबांच्या खोलीत नेमकी काय चर्चा झाली? उद्धव ठाकरेंचा मोठा खुलासा
बाळासाहेबांच्या खोलीत नेमकी काय चर्चा झाली? उद्धव ठाकरेंचा मोठा खुलासा.
'आताही बॅगा घेऊन आलोय', राऊतांच्या आरोपावर एकनाथ शिंदेंचं उत्तर
'आताही बॅगा घेऊन आलोय', राऊतांच्या आरोपावर एकनाथ शिंदेंचं उत्तर.
मोठी बातमी : नाशिकमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बॅगांची तपासणी
मोठी बातमी : नाशिकमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बॅगांची तपासणी.
Monsoon Update:नागरिकांची उकाड्यापासून सुटका, यंदा मान्सून लवकर धडकणार
Monsoon Update:नागरिकांची उकाड्यापासून सुटका, यंदा मान्सून लवकर धडकणार.
पैसा फेको तमाशा देखो हाच शिंदे गटाचा जाहीरनामा : संजय राऊत
पैसा फेको तमाशा देखो हाच शिंदे गटाचा जाहीरनामा : संजय राऊत.
मोदींच्या कांदा प्रश्नावर शरद पवार यांचं चोख प्रत्युत्तर, म्हणाले...
मोदींच्या कांदा प्रश्नावर शरद पवार यांचं चोख प्रत्युत्तर, म्हणाले....
मोदींनी भर सभेत शिंदेंना उठवलं आणि म्हणाले, तुम्ही जा, मी इथे सांभाळतो
मोदींनी भर सभेत शिंदेंना उठवलं आणि म्हणाले, तुम्ही जा, मी इथे सांभाळतो.
राज्यभरात मोदींच्या एकूण 19 जाहीर सभा अन् मुंबईत पहिलाच मेगा रोड शो
राज्यभरात मोदींच्या एकूण 19 जाहीर सभा अन् मुंबईत पहिलाच मेगा रोड शो.
आता धर्माच्या आधारावर बजेटचे वाटप; वोटबँकवरून मोदींची काँग्रेसवर टीका
आता धर्माच्या आधारावर बजेटचे वाटप; वोटबँकवरून मोदींची काँग्रेसवर टीका.
तेव्हा मला बाळासाहेब ठाकरेंची सर्वात जास्त आठवण येईल, मोदी काय म्हणाले
तेव्हा मला बाळासाहेब ठाकरेंची सर्वात जास्त आठवण येईल, मोदी काय म्हणाले.