AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘मी पंतप्रधान मोदी यांच्याविरोधात सभा घेतल्या मान्य करतो, पण…’, अजित पवार बघा काय म्हणाले

उपमुख्यमंत्री अजित पवार महाविकास आघाडीत असताना त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सडकून टीका केली होती. त्यांनी अनेकदा मोदींवर टीका केली होती. पण ते आता सत्तेत सहभागी झाले आहेत. ते सत्तेत सहभागी झाल्यानंतर आज पहिल्यांदाच बारामतीकरांसमोर आले. यावेळी त्यांनी मोदींवर टीका केली ती आपली चूक होती, हे मान्य केलं.

'मी पंतप्रधान मोदी यांच्याविरोधात सभा घेतल्या मान्य करतो, पण...', अजित पवार बघा काय म्हणाले
| Updated on: Aug 26, 2023 | 9:30 PM
Share

बारामती | 26 ऑगस्ट 2023 : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर ते आज पहिल्यांदाच बारामतीत दाखल झाले. यावेळी त्यांचं बारामतीकरांकडून जंगी स्वागत करण्यात आलं. बारामतीच्या नागरिकांनी मोठ्या जल्लोषात अजित पवार यांचं स्वागत केलं. ढोल-ताशांच्या गजरात, जेसीबीने फुलांचा वर्षाव करुन अजित पवार यांचं बारामतीत स्वागत करण्यात आलं. बारामतीकरांकडून अजित पवार यांना नागरी पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आलं. यावेळी अजित पवार यांनी बारामतीकरांना आपण सत्तेत सहभागी का झालो? या विषयी सविस्तर स्पष्टीकरण दिलं. विशेष म्हणजे यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा उल्लेख करुन महत्त्वाचं वक्तव्य केलं.

“पंतप्रधानांनी ठरवलं आहे की देशाची अर्थव्यवस्था टॉप 5 मध्ये आली पाहिजे. आतापर्यंत देशाच्या सगळ्या पंतप्रधानांनी उत्कृष्ट काम केलं आहे. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताने आपली स्वातंत्र्य विकास मुद्रा उमटवल्या आहेत. मागे काही सभांमध्ये मीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात सभा घेतली हे मी मान्य करतो. पण मला माहिती नव्हतं की नंतरच्या कामात कसं काम होणार आहे”, असं अजित पवार आपल्या भाषणात म्हणाले.

अजित पवार यांची मिश्किल टीप्पणी

“करोडो रुपयांची विकास कामे सुरू आहेत. हे फक्त तुमच्या जिम्मेदारीमुळे करू शकतो. तुम्ही भरभक्कम पाठिंबा द्या. तुमच्या भीतीमुळे पहाटे पाच वाजताच मी बावचालून उठतो. बायको म्हणते दमानं दमानं. अहो, काय चाललंय? जरा वयाचा विचार करा. तुम्हाला दिवसा त्रास होऊ नये म्हणून तुम्ही झोपेत आणि पांघरुणात असतानाच मी भेट देतो”, अशी मिश्किल टीप्पणी यावेळी अजित पवारांनी केली.

“आज बारामती डोळ्यासमोर ठेवा. आज बारामती फलटण रोडचं काम मंजूर झालाय. 700 कोटींचा प्रकल्प आहे. चार पदरी रस्ता आहे”, असंही अजित पवार यावेळी म्हणाले.

‘मुख्यमंत्र्यांचा व्याप कमी करण्यासाठी मी बैठका घेतल्या’

“कधी कधी मला वाईट वाटतं तुम्ही बातम्या देता की मुख्यमंत्री अध्यक्ष असणाऱ्या खात्याची अजित पवारांनी बैठक घेतली. मला वाईट वाटतं. मुख्यमंत्र्यांचा व्याप कमी करण्यासाठी मी बैठका घेतल्या तर काय बिघडलं? यात काय बिघडलं? महाराष्ट्राचं भलं होत आहे ना? बैठकीला एकनाथरावांचा पाठिंबा असतो. पण बाकीचेच असं झालं, तसं झालं म्हणतात”, असं अजित पवार म्हणाले.

“बारामतीकरांच प्रेम मला दहा हत्तीचं बळ देऊन जातं. अनेक ऐतिहासिक घटनांचं हे मैदान साक्षीदार आहे. त्यातले अनेक ऐतिहासिक घटना माझ्याच बाबतीतल्या आहेत. आजची गर्दी तर आधी कधीच बघितली नाही. मला आज माझे एवढे क्लासमेट भेटले की मी फक्त पाहत राहिलो. अनेक लोक शुभेच्छा देण्यासाठी बाहेर आली होती”, असं अजित पवार म्हणाले.

‘बायकोनं देखील एवढे मुके नाही घेतले’

“अशा प्रकारची मिरवणूक मी माझ्या आयुष्यात आजपर्यंत बघितली नाही. हे प्रेम आहे कुणालाच बळजबरी केली नव्हती. एवढी ढकला ढकली आणि रेटारेटी मला आयुष्यत कुणी केली नाही. मला वाटलं आज माझे हात खांद्यापासून तुटतील. अनेक जण हात ओढत होते. अनेक जण किस करत होते, मुके घेत होते, आईला म्हणलं, बायकोनं देखील एवढे मुके नाही घेतले”, असं मिश्किल वक्तव्य अजित पवारांनी केलं.

सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.