AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘मला मूर्ख समजू नका’, अजित पवार पत्रकारांवर संतापले, राष्ट्रवादीच्या गोटात नेमकं काय चाललंय?

राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) उमेदवाराबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार (Ajit Pawar) यांना प्रश्न विचारला असता त्यांनी पत्रकारांवर संताप व्यक्त केला.

'मला मूर्ख समजू नका', अजित पवार पत्रकारांवर संतापले, राष्ट्रवादीच्या गोटात नेमकं काय चाललंय?
अजित पवार Image Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Feb 06, 2023 | 11:14 PM
Share

पुणे : पिंपरी चिंचवडच्या पोटनिवडणुकीसाठी (Pimpri Chinchwad) कुणाला उमेदवारी देणार याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) गोटात अजून ठरलं आहे की नाही? असा प्रश्न निर्माण होतोय. विशेष म्हणजे उमेदवाराबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार (Ajit Pawar) यांना प्रश्न विचारला असता त्यांनी पत्रकारांवर संताप व्यक्त केला. “मला मूर्ख समजू नका, मी उद्याच उमेदवाराचे नाव सांगेन”, असं वक्तव्य अजित पवार यांनी केलं. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचा पिंपरी चिंचवडच्या पोटनिवडणुकीसाठी अधिकृत उमेदवार कोण असेल? याबाबतचा सस्पेन्स वाढला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांची पुण्यात आज महत्त्वाची बैठक पार पडली. विशेष म्हणजे अनेक तास ही बैठक सुरु होती. या बैठकीत पिंपरी चिंचवडच्या पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी कुणाला द्यायची या विषयावर चर्चा झाली.

या बैठकीदरम्यान अजित पवार प्रसारमाध्यमांसमोर आले. यावेळी त्यांनी महत्त्वाची माहिती दिली. पण यावेळी त्यांना पत्रकारांनी उमेदवार आयात करणार का? असा प्रश्न विचारल्याने संतापले आणि मला मुर्ख समजू नका, असं ते रागात म्हणाले.

“उद्या सकाळी डांगे चौकात जमून राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा अर्ज भरला जाईल. अर्ज भरण्याच्यावेळी मी उपस्थित राहीन”, अशी प्रतिक्रिया अजित पवारांनी दिली.

अजित पवार नेमकं काय म्हणाले?

“आम्ही उद्या अर्ज भरणार आहोत. महाविकास आघाडीचा उमेदवार अर्ज भरेल. ऐनवेळीच उमेदवार घोषित करण्याचा प्रश्न नाही”, असं अजित पवार यावेळी म्हणाले.

“आता मी पुन्हा सगळ्यांना घेऊन बसलेलो होतो. मी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याबद्दल चर्चा केलेली आहे”, असं अजित पवारांनी सांगितलं.

“ही निवडणूक आमची महाविकास आघाडी सर्वांनी मिळून लढवायची आहे. त्यामुळे सर्वांशी चर्चा करुन आम्ही पुढे जातोय. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांसोबत जशी मी चर्चा केली, तशीच शिवसेनेच्या नेत्यांसोबत चर्चा सुरु आहे. घडाळ्याच्या चिन्हावरच उमेदवार असेल”, असंही ते यावेळी म्हणाले.

“पोटनिवडणूक बिनविरोध करण्याबाबत मुख्यमंत्र्यांनी मला एकदा विनंती केली. देवेंद्र फडणवीस यांनी एकदा विनंती केली. चंद्रशेखर बावनकुळे यांनी माझ्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. पण संपर्क होऊ शकला नाही. याबाबत मविआचे तीनही पक्षाचे वरिष्ठ निर्णय देतील त्यानुसार काम होईल”, असंदेखील अजित पवारांनी सांगितलं.

“कसबा आणि पिंपरी चिंचवड पोटनिवडणूक लढवण्याचा निर्णय महाविकास आघाडीने घेतला आहे. याआधीच्या निवडणुका बिनविरोध झालेल्या नाहीत. अंधेरीत उमेदवार दिला नाही. पण नोटाला मतं मिळाली”, असं अजित पवार म्हणाले.

राहुल कलाचे यांचं नाव निश्चित?

दरम्यान, सूत्रांकडून महत्त्वाची माहिती समोर आलीय. पिंपरी चिंचवडच्या जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून राहुल कलाचे यांचं नाव निश्चित झालंय. पण राष्ट्रवादी काँग्रेसकडून याबाबत अधिकृत घोषणा झालेली नाहीय.

चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर.
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.