Ambil Odha: आंबिल ओढा परिसरात तोडक कारवाई महापालिकेकडून, स्थानिकांना मार्चमध्येच नोटिसा? केदार असोसिएटसची भूमिका काय?

स्थानिक नागरिकांनी केदार असोसिएटसनं नोटिसा दिल्याचा आरोप केला होता. नागरिकांनी त्यांना मिळालेल्या नोटिसांवर तारीख देखील नसल्याचं म्हटलं होते. आंबिल ओढ्याचे विकासक केदार असोसिएटसचे प्रताप निकम यांनी त्यांची बाजू टीव्ही 9 मराठीकडे मांडली आहे. Ambil Odha issue

Ambil Odha: आंबिल ओढा परिसरात तोडक कारवाई महापालिकेकडून, स्थानिकांना मार्चमध्येच नोटिसा? केदार असोसिएटसची भूमिका काय?
पुणे आंबिल ओढा वाद
Follow us
| Updated on: Jun 24, 2021 | 1:00 PM

पुणे: पुण्यातील आंबिल ओढ्याचा वाद पेटला आहे. बिल्डरच्या फायद्यासाठी आंबिल ओढ्याचा नैसर्गिक प्रवास बदलण्याचा घाट घालण्याचा प्रयत्न सुरु असल्याचा आरोप आहे. यामुळे आंबिल ओढ्यालगत असलेल्या घरे पाडण्याच्या कारवाईला सुरुवात करण्यात आली. या कारवाईला नागरिकांचा कडाडून विरोध पाहायला मिळत आहे. स्थानिक नागरिकांनी केदार असोसिएटसनं नोटिसा दिल्याचा आरोप केला होता. नागरिकांनी त्यांना मिळालेल्या नोटिसांवर तारीख देखील नसल्याचं म्हटलं होते. आंबिल ओढ्याचे विकासक केदार असोसिएटसचे प्रताप निकम यांनी त्यांची बाजू टीव्ही 9 मराठीकडे मांडली आहे. (Ambil Odha issue Kedar Associates Pratap Nikam Said notice issue to people in March Month)

केदार असोसिएटचं म्हणणं काय?

कारवाईचं काम पुणे महापालिकेकडून प्रस्तावित नाल्याचं अतिक्रमण काढण्याचं काम सुरु आहे. 26 मार्च 2021 रोजी सर्वांना नोटीस दिली होती. त्या नोटीसचे फ्लेक्स त्या ठिकाणी लावले होते. पेपरमध्येही जाहिरात पब्लिश करण्यात आलं होतं. प्रस्तावित नाला आहे, जो महापालिका आयुक्तांच्या आदेशानुसार सुरु आहे. 300-400 झोपडपट्ट्यांमध्ये गेल्या तीन वर्षांपासून पाणी शिरतं.

स्थानिकांना बेघर करणार नाही

सदरची नोटीस टाऊन प्लॅनिंग नकाशा 1974, विकास आरखडा 1987 ,टाऊनप्लॅनिंगनुसार 2017 नाला सरळीकरण काम नियमानुसार आहे. लोकांना बेघर करत नसून, SRA मार्फत ट्रान्झिट कॅम्प मिळाला आहे. केदार असोसिएटला ट्रान्झिट कॅम्प मिळालाय त्या ट्रान्झिट कॅम्पमध्ये कुणाला कोणता फ्लॅट हे केदार असोसिएटच्या लेटरहेडवरुन लोकांना कळवलं आहे. लोकांना बेघर करण्याचा प्रश्न नाही, राजेंद्रनगर एरिया आहे, तिथे यांची सदनिका दिली आहे ट्रान्झिट कॅम्पमध्ये दिली आहे. विना मोबदला सदनिका दिल्या जाणार आहेत. त्यांना तिथून काढल्यानंतर कायमस्वरुपी शिफ्ट केलं असं नाही, योजनेचं काम झाल्यावर तिथे शिफ्ट केलं जाईल.

महापालिकेकडून कारवाई

ट्रान्झिट कॅ्म्प आहे, टोटल नालाबाधित 134 लोक आहेत, त्यापैकी 70 लोकांचं आधीच पुनर्वसन झालं जेव्हा महापालिकेची नोटीस आली.. हे मागच्या चार महिन्यात झालं… जे शिल्लक राहिले आहेत, ज्यांच्यामुळे नाल्याचं काम अडतंय, त्यांच्याशी बैठका घेतल्या, चर्चा केली, पाठपुरावा केली, त्यांनी सहकार्य केलं नाही त्यामुळे महापालिकेने कारवाई केली

संबंधित बातम्या:

Pune Ambil Odha : पुण्याच्या आंबिल ओढा परिसरात तोडक कारवाई, नागरिकांच्या संत्पत प्रतिक्रिया LIVE

आमची घरं तोडण्याचं काम सुरु, आमच्या माणसांना पोलीस मारतायत, आम्ही कुठे जायचं?’, चिमुकल्याचा सवाल

(Ambil Odha issue Kedar Associates Pratap Nikam Said notice issue to people in March Month)

Non Stop LIVE Update
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?.