Anant Chaturdashi 2022 : पुण्यात बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीची तयारी पूर्ण; मिरवणूक मार्गावर ठिकठिकाणी रांगोळी अन् पायघड्या, भाविकांचा उत्साह शिगेला

आज अनंत चतुर्दशी आहे. लाडक्या बप्पाला निरोप देण्याची वेळ आलीये. पुण्यातील गणेशोत्सव राज्यासह देशभरात प्रसिद्ध असतो. अनंत चतुर्दशीच्या दिवशी शहरातून भव्य विसर्जन मिरवणुका निघतात.

Anant Chaturdashi 2022 : पुण्यात बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीची तयारी पूर्ण; मिरवणूक मार्गावर ठिकठिकाणी रांगोळी अन् पायघड्या, भाविकांचा उत्साह शिगेला
Follow us
| Updated on: Sep 09, 2022 | 9:35 AM

पुणे :  आज अनंत चतुर्दशी (Anant Chaturdashi) आहे. लाडक्या बप्पाला निरोप देण्याची वेळ आलीये. पुण्यातील (pune) गणेशोत्सव (Ganeshotsav) राज्यासह देशभरात प्रसिद्ध असतो. अनंत चतुर्दशीच्या दिवशी शहरातून भव्य विसर्जन मिरवणुका निघतात.  या मिरवणुका पहाण्यासाठी भाविक राज्याच्या काणाकोपऱ्यातून येत असतात. पुण्यात विसर्जन मिरवणुकीच्या तयारीला सुरुवात झाली आहे. मंडईतील टिळक पुतळ्यापासून सकाळी 10.30 वाजता विसर्जन मिरवणुकीला सुरुवात होणार आहे. मंडईमध्ये विसर्जन मिरवणुकीच्या मार्गावर ठिकठिकाणी आकर्षक रांगोळ्या काढण्यात आल्या आहेत तसेच बाप्पाच्या मिरवणुकीसाठी पायघड्या देखील टाकण्यात आल्या आहेत.

दगडूशेठचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची गर्दी

पुण्यातील दगडूशेठ हलवाई गणपती प्रसिद्ध आहे. गणेशोत्सव काळात राज्यभरातून या गणपतीचे दर्शन घेण्यासाठी भाविक येत असतात. थोड्याचवेळात दगडूशेठ हलवाई गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात होणार आहे. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती उत्सव मंडपातून मंदिरामध्ये विराजमान झाला आहे.

गुरुजी तालीम गणेशमंडळ मिरवणुकीसाठी सज्ज

गुरुजी तालीम गणेशमंडळाचा गणपती हा पुण्यातील तीसरा मानाचा गणपती आहे. थोड्याच वेळात गुरुजी तालीम गणेशमंडळाच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात होणार आहे. गणेशमंडळाकडून विसर्जन मिरवणुकीसाठी खास विठ्ठल रुक्मिणीचा देखावा उभारण्यात आला आहे. हा देखावा भाविकांचे लक्ष वेधून घेतोय. देखाव्यात गणपती विराजमान झालाय. फुलांची आकर्षक सजावट देखील करण्यात आली आहे.

हे सुद्धा वाचा

तुळसीबाग गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात

तुळशीबागचा गणपती हा पुण्यातील मानाचा चौथा गणपती आहे. मानाचा चौथा गणपती असलेल्या तुळसीबाग गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीला थोड्याचवेळात सुरुवात होणार आहे. मिरवणुकीची तयारी पूर्ण झाली आहे. आकर्ष अशी सजावट करण्यात आली आहे. रथाची आकर्ष सजावट आणि बप्पाची मूर्ती विसर्जन मिरवणुकीत सहभागी होणाऱ्या भाविकांचे लक्ष वेधून घेत आहेत.

Non Stop LIVE Update
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास.
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?.
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?.
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप.
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.