Angarki Sankashti Chaturthi | अंगारकी चतुर्थीला दगडूशेठ गणपती मंदिर, सिद्धिविनायक मंदिर दर्शनासाठी बंद

पुणे 'दगडूशेठ' गणपती मंदिर दर्शनासाठी बंद करण्यात आलं आहे. त्याशिवाय, सिद्धिविनायक मंदिरही ऑफलाईन दर्शनासाठी पूर्णपणे बंद ठेवण्यात आलं आहे (Angarki Sankashti Chaturthi 2021).

  • अश्विनी सातव-डोके, टीव्ही 9 मराठी, पुणे
  • Published On - 9:06 AM, 2 Mar 2021
Angarki Sankashti Chaturthi | अंगारकी चतुर्थीला दगडूशेठ गणपती मंदिर, सिद्धिविनायक मंदिर दर्शनासाठी बंद
Dagdusheth-Halwai-Ganpati

पुणे : आज 2 मार्चला फाल्गुन महिन्यातील संकष्टी चतुर्थी आहे. चतुर्थी मंगळवारी येते तेव्हा ती अंगारकी चतुर्थी (Angarki Sankashti Chaturthi 2021) म्हणून ओळखली जाते. म्हणून त्याला अंगारकी संकष्टी चतुर्थी म्हटलं जातं. या दिवशी गणेशाची पूजा केल्यास सर्व मनोकामना पूर्ण होतात. त्यामुळे यादिवशी गणेशाचे दर्शन घेण्यासाठी भाविक मंदिरात गर्दी करत असतात. मात्र, सध्या कोरोनाचा धोका वाढत असल्याने पुणे ‘दगडूशेठ’ गणपती मंदिर दर्शनासाठी बंद करण्यात आलं आहे. त्याशिवाय, सिद्धिविनायक मंदिरही ऑफलाईन दर्शनासाठी पूर्णपणे बंद ठेवण्यात आलं आहे (Angarki Sankashti Chaturthi 2021).

अंगारकी चतुर्थीला ‘दगडूशेठ’ गणपती मंदिर दर्शनासाठी बंद

अंगारकी चतुर्थीला पुण्यातील दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर (Dagdusheth Halwai Ganpati Mandir) दर्शनासाठी बंद करण्यात आलं आहे. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टने हा निर्णय घेतला आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे खबरदारी म्हणून ट्रस्टने हा निर्णय घेतला आहे.

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे खबरदारी म्हणून अंगारकी चतुर्थीला मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टने घेतला आहे. केवळ ब्रह्मवृंदांच्या उपस्थितीत मंदिरात धार्मिक विधी होणार आहे, अशी माहिती ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे यांनी दिली.

अंगारकी चतुर्थीला शहर आणि उपनगरांतून दरवर्षी येणाऱ्या सुमारे 3 ते 4 लाख भाविक मंदिरामध्ये दर्शनासाठी येतात. त्यामुळे गर्दी होऊ नये, यासाठी खबरदारी म्हणून मंगळवारी मंदिर बंद ठेवण्यात येणार आहे. चतुर्थीच्या दिवशी भाविकांना मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही.

सिद्धिविनायक मंदिर ऑफलाईन दर्शनासाठी पूर्णपणे बंद

राज्यात करोनाच्या संसर्गाचा प्रभाव वाढता लक्षात घेऊन सिद्धिविनायक मंदिराने (Siddhi Vinayak Ganapati Mandir) महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे. अंगारकी चतुर्थीच्या दिवशी सिद्धिविनायक ऑफलाईन दर्शन पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे. ऑनलाईन पद्धतीच्या नियोजित वेळेत क्यूआर कोड असणाऱ्या भाविकांना प्रवेश देण्यात येणार आहे. आठ वाजेनंतर मंदिर प्रशासनाकडून गर्दी कमी करण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने मंदिराच्या बाहेर स्क्रीन लावून दर्शनासाठी सुविधा करण्यात आलेली आहे. दरवर्षी अंगारकी चतुर्थीला जशी गर्दी असते, तशी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भाविकांची गर्दी पाहायला मिळत नाहीये. बरेच लोक सकाळपासून बाहेरुनच सिद्धिविनायक गणपतीच दर्शन घेऊन जात असल्याचे पाहायला मिळत आहे (Angarki Sankashti Chaturthi 2021).

अंगारकती संकष्टी

आज फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षाची चतुर्थी तारीख आहे. इतकंच नाहीतर फाल्गुन महिन्यातील या संकष्टी चतुर्थीला द्विजप्रिय संकष्टी चतुर्थी (Dwijapriya Sankashti Chaturthi 2021) देखील म्हणतात. या दिवशी गणपतीच्या द्विजप्रिय स्वरुपाची पूजा केली जाते. असं मानलं जातं की, विघ्नहर्ता द्विजप्रिया गणेशाला चार डोके आणि चार हात आहेत. त्यांची उपासना आणि उपवास केल्याने सर्व प्रकारचे त्रास दूर होतात. यासह, चांगले आरोग्य आणि आनंद, समृद्धी प्राप्त होते.

Angarki Sankashti Chaturthi 2021

संबंधित बातम्या :

Angarki Sankashti Chaturthi 2021 | ‘अंगारकी संकष्टी चतुर्थी’ म्हणजे काय? वाचा यामागची कथा आणि जाणून घ्या शुभ मुहूर्त!

Gopeshwar Mahadev | या मंदिरात महिलेच्या रुपात महादेव विराजमान, श्रुंगारानंतर पूजा-अर्चना

Sankashti Chaturthi 2021 | नवीन वर्षातील पहिली चतुर्थी, जाणून घ्या पूजेचा विधी आणि चंद्रोदयाची वेळ