Avinash Bhosale : अविनाश भोसलेंचे हेलिकॉप्टर सीबीआयकडून जप्त, मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात मोठा दणका, नेमकं प्रकरण काय?

याच प्रकरणात त्यांच्या कुटुंबीयांची चौकशी सीबीआयकडून कसूर करण्यात आली होती. हे प्रकरण आता दिवसेंदिवस त्यांच्या अडचणी वाढवताना दिसत आहेत.

Avinash Bhosale : अविनाश भोसलेंचे हेलिकॉप्टर सीबीआयकडून जप्त, मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात मोठा दणका, नेमकं प्रकरण काय?
अविनाश भोसलेंचे हेलिकॉप्टर सीबीआयकडून जप्त, मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात मोठा दणका, नेमकं प्रकरण काय?Image Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jul 30, 2022 | 9:20 PM

पुणे : पुण्यातले सुप्रसिद्ध उद्योजक अविनाश भोसले (Avinash Bhosale) यांना सीबीआयने (CBI) आणखी एक मोठा दणका दिला आहे. काही दिवसांपूर्वीच सीबीआयकडून त्यांच्या प्रॉपर्टीवर टाच आणण्यात आली होती. त्यांच्या अनेक मालमत्ता (Property) सीबीआयकडून जप्त केल्या होत्या. मात्र आता सीबीआयने अविनाश भोसले यांना सर्वात मोठा दणका देत त्यांचे हेलिकॉप्टरही जप्त केलं आहे. मनी लॉन्ड्री प्रकरणातील सर्वात मोठी कारवाई करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या मागे सुरू होता. सीबीआयकडून अनेकदा त्यांची चौकशी झाली होती. तसेच त्यांना अटकीही झाली होती. याच प्रकरणात त्यांच्या कुटुंबीयांची चौकशी सीबीआयकडून कसूर करण्यात आली होती. हे प्रकरण आता दिवसेंदिवस त्यांच्या अडचणी वाढवताना दिसताहेत. यात आणखी काही महत्वाचे धागेदोरे तपास यंत्रणांच्या हाती लागण्याचीही शक्यता वर्तवण्यात येत आहे.

एएनआय वृत्तसंस्थेचं ट्विट

कोणत्या प्रकरणात कारवाई?

भोंसले डीएचएफएलशी संबंधित घोटाळ्यात सहभागी असल्याचे सांगण्यात येत आहे. या घोटाळ्यात 17 बँकांच्या कंसोर्टियमचे 34,615 कोटी रुपयांचे नुकसान झाले. सीबीआयने भोंसले यांच्या मालमत्तेतून जे हेलिकॉप्टर जप्त केले आहे ते ऑगस्टा वेस्टलँड कंपनीचे होते. अविनाश भोसले हे पुण्यातील बांधकाम व्यवसायातील मोठे नाव आहे. अविनाश भोसले सध्या कोठडीत आहेत. दिवाण हाऊसिंग फायनान्स लिमिटेड आणि येस बँकेशी संबंधित घोटाळ्याप्रकरणी सीबीआयने त्यांना अटक केली आहे. सोमवारी सीबीआयने त्याच्याविरुद्ध आरोपपत्र दाखल केले होते.

कोणता पैसा कुठे वळवल्याचा आरोप?

डीएचएफएल आणि येस बँक घोटाळ्यातील आरोपी बिल्डर अविनाश भोसले यांनी लंडनमधील मालमत्ता खरेदी करण्यासाठी त्यांच्या खात्यातून 300 कोटी रुपये भरल्याचे सीबीआयच्या आरोपपत्रात म्हटले आहे. ही मालमत्ता 2018 मध्ये खरेदी केली होती. सीबीआयने आपल्या आरोपपत्रात असेही म्हटले आहे की रेडियस ग्रुपच्या सहआरोपी संजय छाब्रियाने 317.40 कोटी रुपये वळवले होते. हाच पैसा भोसले आणि त्यांच्या कंपनीने येस बँकेतून व्यवसाय कर्जाच्या नावाखाली उभा केला होता, असेही सांगण्यात आले आहे. हे प्रकरण आता कुठपर्यंत जाणार? हे तर पुढील कारवाईच सांगेल.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.