Bandu Andekar: पोलिसांनी बंडू आंदेकरच्या आर्थिक नाड्या चांगल्याच आवळल्या, नेमकं काय केलं?
Ayush Komkar Murder Case : आयुष कोमकर हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी बंडू आंदेकरच्या आर्थिक नाड्या आवळण्यात पोलिसांना चांगले यश आले आहे. त्यांनी बंडू आंदेकरला मोठा आर्थिक फटका दिला आहे.

पुण्यातील नाना पेठेत गणेश विसर्जनाच्या आदल्या दिवशी आयुष कोमकरची गोळ्या झाडून हत्या झालीय या प्रकरणी काल, 15 ऑगस्ट रोजी सुनावणी झाली. सुनावणीमध्ये प्रकरणातील आरोपी बंडू आंदेकरच्या कुटुंबियांनी पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत. पोलिसांनी अनेक धमक्या दिल्या असल्याचे आंदेकर कुटुंबीयांनी आरोप केला. माझ्या मुलाला कृष्णा आंदेकरला पोलीस ठाण्यात हजर राहण्यास सांगितले होते. जर तो आला नाही तर त्याचा एन्काऊंटर करु अशी धमकी पोलिसांनी दिल्याचे आंदेकर कुटुंबीयांनी म्हटले. त्यानंतर आता पोलिसांनी बंडू आंदेकरच्या आर्थिक नाड्या चांगल्याच आवळल्या असल्याचे समोर आले आहे.
नेमकं काय झालं?
आंदेकर टोळीच्या म्होरक्या असलेल्या बंडू आंदेकरच्या घरावर काही दिवसांपूर्वी गुन्हे शाखेने रेड टाकली. पोलिसांनी तब्बल ६७ लाखांचे सोन्याचे दागिने, चांदी, २ लाख ५० हजार रुपयांची रोकड, एक अलिशान मोटार कार, विविध करारनामे आणि कर भरल्याच्या पावत्या, असा मोठा मुद्देमाल जप्त केले. त्यानंतर आता पुण्यातील गणेश पेठेतील बेकायदेशीत मासोळी बाजारावर महापालिकेने कारवाई केली आहे. हा मासोळी बाजार बंडू आंदेकरच्या प्रमुख आर्थिक स्त्रोतांपैकी एक होता. बेकायदा मासळी बाजारातून आंदेकरला मोठा आर्थिक फायदा व्हायचा. पण आता महापालिकेने या बाजारावर कारवाई करत बंडू आंदेकरच्या आर्थिक नाड्या चांगल्याच आवळल्या आहेत.
वाचा: तू गेल्यावर पूजा येते, पूर्ण दिवस माझ्यासोबत… पत्नीला गोळ्या झाडल्यानंतर पतीचा ऑडीओ व्हायरल
बंडू आंदेकरच्या घरात काय काय सापडलं होतं?
आयुष कोमकर प्रकरणानंतर पोलीस मोठी कारवाई करत आहेत. त्यांनी बंडू आंदेकरच्या घरावर छापा टाकला आहे. पोलिसांनी घेतलेल्या झडतीत कोट्यवधी रुपयांचा ऐवज हाती लागला आहे. पोलिसांनी तब्बल ६७ लाखांचे सोन्याचे दागिने, चांदी, २ लाख ५० हजार रुपयांची रोकड, एक अलिशान मोटार कार, विविध करारनामे आणि कर भरल्याच्या पावत्या, असा मोठा मुद्देमाल जप्त केला. याशिवाय आंदेकरने केलेल्या जमीन व्यवहाराच्या काही इसार पावत्याही पोलिसांना मिळाल्या. त्यानंतर बंडू आंदेकरच्या आर्थिक स्त्रोत असलेल्या मासोळी बाजारावर कारवाई केली आहे.
आयुष कोमकर प्रकरणबाबात
आंदेकर टोळीने राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकरांच्या हत्येचा बदला घेण्यासाठी डाव आखला होता. त्यांनी वनराज यांची हत्या करणारा आरोपी गणेश कोमकरचा मुलगा आयुष कोमकरची गोळ्या झाडून हत्या केली. अवघ्या 19 वर्षांच्या आयुषचा गुन्हेगारी विश्वाशी काहीही संबंध नसताना 12 गोळ्या झाडून त्याला मारण्यात आले. त्यानंतर पोलीस या प्रकरणातील आरोपी अमन पठण, सुजल मिरगु, वृंदावणी वाडेकर आणि तिची दोन्ही मुलांवर कारवाई सुरु आहे. दरम्यान, मकोका न्यायालयाने सर्व आरोपींना तीन दिवसांची 18 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
