तू गेल्यावर पूजा येते, पूर्ण दिवस माझ्यासोबत… पत्नीला गोळ्या झाडल्यानंतर पतीचा ऑडीओ व्हायरल
Nandini Arvind Latest Audio Viral: ग्वालियर शहरातील नंदिनी हत्याकांडात सतत नवीन-नवीन खुलासे होत आहेत. आता या प्रकरणाला आणखी एक धक्कादायक वळण आले आहे. सोशल मीडियावर नंदिनी आणि तिच्या पती अरविंद सिंह परिहार यांच्यात फोनवर झालेल्या कथित संभाषणाचा एक ऑडिओ व्हायरल होत आहे. ज्याने संपूर्ण प्रकरणात नवीन वळण आले आहे.

मध्य प्रदेशच्या ग्वालियरमध्ये झालेल्या नंदिनी हत्याकांडाने सर्वांनाच हादरवून टाकले आहे. पती अरविंद परिहारने नंदिनीवर भर रस्त्यात गोळ्या झाडून हत्या केली. कारण नंदिनीचे कोणासोबत तरी अफेअर सुरु आहे असा संशय अरविंदला येत होता. पत्नीला गोळ्या झाडल्यानंतर फेसबुक लाइव्हमध्येही अरविंद याच गोष्टीचे सांगत राहिला की नंदिनी मला फसवत होती. यात त्याने दोन लोकांची नावेही घेतली. या दोन व्यक्तींवर अरविंदला शंका होती. आता या प्रकरणात आणखी एक नवा ऑडिओ समोर आला आहे. या ऑडीओमध्ये अरविंद स्पष्टपणे म्हणतो की होय मी पूजासाठी तुला फसवले आहे.
समोर आलेल्या ऑडीओबाबत दावा केला जात आहे की हा हत्याकांडापूर्वीच्या वादादरम्यान झालेल्या भांडणाचा आहे. पण TV9 या ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाही. नंदिनी आणि आरोपी पती अरविंद परिहार यांच्यातील संभाषणाचा ऑडिओ ऐकून कोणालाही सहज अंदाज येऊ शकतो की पती-पत्नींमधील परस्परी वाद आणि तणाव कोणत्या पातळीला जाऊन पोहोचला होता.
काय आहे ऑडिओ?
अरविंद ऑडिओमध्ये बोलत आहे की, मी कायमच केस जिंकणार. तू वेश्या असल्याचे मी सिद्ध करणार. यावर नंदिनीने म्हटले, वेश्या तर तू नंतर म्हणाला आहेस, आधी तर तू मला पत्नी म्हणत होतास. नंदिनीला लगेच थांबवत अरविंद म्हणाला, तू माझी पत्नी नाहीस. यानंतर त्याने खूप शिवीगाळ केली. मग नंदिनीने विचारले की, तर मग तू पूजासोबत काय करत होतास? यावर उत्तर दे अरविंद म्हणाला, पूजा तुझ्यासारखी नाही. पूजा आजही माझी आहे. मी नेहमीच तिला सपोर्ट करत होतो. चोरून.
नंदिनीने जेव्हा विचारले की, तू मला इतका मोठा धोका देत होतास? अरविंद म्हणाला, होय. नंदिनी म्हणाली, तर माझ्यासोबत तुम्ही काय करत होता? माझ्यावर प्रेम नव्हते का? अरविंदने शिवी देत म्हटले, तू लग्नानंतरच त्या मुलाशी सेट झाली होतीस. नंदिनीने म्हटले, जेव्हा पुरुषांकडे स्त्रियांना हरवण्याचा कोणताही उपाय शिल्लक राहत नाही तेव्हा ते तिच्या चरित्रावरच बोट ठेवतात. तुझ्यासारख्या पुरुषाची मला लाज वाटते. आज मला पश्चात्ताप होत आहे की मी तुझ्यावर प्रेम केले. यावर अरविंद म्हणाला, मी नेहमी पूजाकडे जायचो. तू गेल्यानंतर पूजा फ्लॅटवरही यायची आणि संपूर्ण दिवस माझ्याजवळ राहायची.
पोलिसांनी ऑडिओबाबत अद्याप माहिती दिली नाही
अद्याप पोलिसांकडून या ऑडिओबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. सध्या पोलिस या संपूर्ण प्रकरणाची सखोल तपासणी करत आहेत. तांत्रिक पुरावे आणि सायबर तज्ज्ञांच्या मदतीने या व्हायरल ऑडिओची तपासणी केली जात आहे. सोबतच पोलिस हत्याकांडाच्या प्रत्येक पैलूंची तपासणी करत आहेत, जेणेकरून सत्य समोर येईल. नंदिनी मर्डर केस ग्वालियरपुरता मर्यादित नसून, संपूर्ण मध्य प्रदेशात चर्चेचा विषय बनला आहे. अशा परिस्थितीत आता सर्वांची नजर पोलिस तपासवर आहे.
