बीडच्या 22 वर्षीय तरुणीची पुण्यात आत्महत्या, तर्कवितर्कांना उधाण

बीडच्या एका 22 वर्षीय तरुणीने पुण्याच्या वानवडीत आत्महत्या केलीये. इमारतीच्या पहिल्या मजल्यावरून उडी घेत तिने आपलं आयुष्य संपवलं.

बीडच्या 22 वर्षीय तरुणीची पुण्यात आत्महत्या, तर्कवितर्कांना उधाण
Wanwadi Police Station Pune

पुणे : बीडच्या एका 22 वर्षीय तरुणीने पुण्याच्या वानवडीत आत्महत्या केलीये. इमारतीच्या पहिल्या मजल्यावरून उडी घेत तिने आपलं आयुष्य संपवलं. रविवारी (7 फेब्रुवारी) रात्री ही घटना घडली. पुजा चव्हाण असं या तरुणीचं नाव आहे. पुजा मुळची बीडमधील परळीची रहिवासी होती. ती मागील महिन्यातच पुण्यात आली होती (Beed Girl named Pooja Chavan suicide in Pune).

पुजा चव्हाण तिचा चुलत भाऊ आणि एका मित्रासोबत पुण्यात राहत होती. तिचं बीएचं शिक्षण पूर्ण झालं होतं. पुण्यात ती स्पोकन इंग्लिशच्या कोर्ससाठी आली होती. यानंतर पुण्यात येऊन दोनच आठवडे होत नाहीत तोच तिने हे टोकाचं पाऊल उचललं. तिने राहत असलेल्या इमारतीच्या पहिल्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या केली. तिच्या डोक्याला आणि मनक्याला गंभीर दुखापत झाल्याचंही सांगितलं जात आहे.

पुजाने आत्महत्या का केली? याचं कारण अद्याप समजलेलं नाही. वानवडी पोलीस या प्रकरणाचा तपास घेत आहेत. तरुणीकडे कोणतीही सुसाईड नोटही सापडलेली नाही. त्यामुळे अनेक शंका उपस्थित होत आहेत. नागरिकांमधून ही आत्महत्या आहे की हत्या याबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत.

हेही वाचा :

आधी बाळाचं मस्तक धडा वेगळं केलं नंतर ती वाशीच्या खाडीवर पोहोचली, पुढं जे घडलं त्यानं हादरवलं

अभिनेता चंद्रशेखर श्रीवास्तवची आत्महत्या, चाहत्यांना मोठा धक्का

मुंबईतील अभियंत्यावर बलात्काराचा आरोप, 47 वर्षीय महिला पोलिसाची पुण्यात आत्महत्या

व्हिडीओ पाहा :

Beed Girl named Pooja Chavan suicide in Pune

Published On - 10:27 pm, Mon, 8 February 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI