AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pune Congress : लोकसभा निवडणुकीआधी पुणे काँग्रेसमध्ये वाद, नाना पटोलेंसमोर घडलं नाराजी नाटय

Pune Congress : लोकसभा निवडणुकीआधी पुणे काँग्रेसमधील अंतर्गत वाद समोर आलाय. पुण्यातील एका मोठ्या नेत्याने प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासमोर नाराजी व्यक्त केली.

Pune Congress : लोकसभा निवडणुकीआधी पुणे काँग्रेसमध्ये वाद, नाना पटोलेंसमोर घडलं नाराजी नाटय
Nana PatoleImage Credit source: PTI
| Edited By: | Updated on: Jun 07, 2023 | 12:16 PM
Share

पुणे : कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने मोठा विजय मिळवला. त्यांना स्पष्ट बहुमत मिळालं. कर्नाटकातील विजयाचा कित्ता अन्य राज्यात गिरवण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे. कर्नाटकच्या विजयामुळे महाराष्ट्रातील काँग्रेसला बळ मिळाल्याच चित्र आहे. पण वास्तवात परिस्थिती मात्र वेगळी आहे. मुंबईतील एका बैठकीत पुणे काँग्रेसमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला.

पुण्यातील भाजपाचे खासदार गिरीश बापट यांचं काही दिवसांपूर्वी निधन झालं. त्यामुळे पुण्यात लोकसभेची पोटनिवडणूक लागण्याची शक्यता आहे. या पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर समोर आलेलं चित्र उत्साहवर्धक नाहीय.

पुणे काँग्रेसमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर

पुणे लोकसभा मतदारसंघाच्या जागेवरुन आधीच काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये रस्सीखेच सुरु आहे. पुणे लोकसभा हा काँग्रेसचा पारंपारिक मतदारसंघ आहे. पण आता इथे राष्ट्रवादी काँग्रेसची ताकत जास्त आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसनेही पुण्यावर अप्रत्यक्षपणे दावा सांगितलाय. काँग्रेस आणि राष्ट्रवादी दोन्ही पक्षांमध्ये पुण्याच्या जागेवरुन जुंपलेली असताना आता पुणे काँग्रेसमधील अंतर्गत वाद समोर आलाय.

नाना पटोलेंसमोरच सर्व घडलं

मुंबईत झालेल्या काँग्रेस पक्षाच्या बैठकीत पुण्यातील पदाधिकाऱ्यांमधला असलेला वाद उफाळून आलेला दिसला. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या समोरच पुण्यातील काँग्रेस नेत्यांची नाराजी उघड केली. विरोधात काम केलेल्या लोकांना नेते जवळ करतात, असं पुणे काँग्रेसमधील नेत्यांच मत होतं. कोणी नाराजी व्यक्त केली?

माजी मंत्री रमेश बागवे यांनी आरोप केला. रमेश बागवेंनी नाना पटोले यांच्यासमोर नाराजी व्यक्त केली. स्थानिक पदाधिकाऱ्यांविषयीची नाराजी मांडली. लोकसभा निवडणुकीच्या आढावा बैठकीदरम्यान पुण्यातील काँग्रेसमधला वाद उफाळून आला.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?