AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

PCMC Election | पिंपरीत महापालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजप नगरसेवक वसंत बोराटेंचा राजीनामा ; राजकीय भूमिका लवकरच स्पष्ट करणार

मोशीत ग्रीन झोन आहे. त्यामुळे विकास रखडला आहे. अनधिकृत बांधकामे होत आहेत. त्यामुळे ग्रीन झोनचे रहिवाशी झोनमध्ये रूपांतर करण्याची पाच वर्षात वारंवार मागणी केली. पण, त्याला कोणी दाद दिली नाही. विकास कामे  करण्यासाठी  स्वातंत्र्य नाही. नगरसेवकांनी काम करायचे आणि त्याचे श्रेय वरिष्ठांनी घ्यायचे अशी पद्धत आहे.

PCMC Election | पिंपरीत महापालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजप नगरसेवक वसंत बोराटेंचा राजीनामा ; राजकीय भूमिका लवकरच स्पष्ट करणार
BJP Corporator vasant borate
| Edited By: | Updated on: Feb 16, 2022 | 2:25 PM
Share

पिंपरी- मागील पाच वर्षात मोशी-जाधववाडीतील विविध आरक्षणे ताब्यात घेण्यासाठी शेवटपर्यंत प्रशासकीय ताकद मिळाली नाही. जाधववाडी आणि मोशीतील ग्रीन झोन हे रहिवासी झोन होणे आवश्यक होते ते झाले नाही. परिणामी, विकास कामांना गती मिळाली नाही. अपेक्षित कामे झाली नाहीत. त्यामुळे या भागातील नागरिकांसाठी भाजप(BJP) नगरसेवकपदाचा (Corporator)राजीनामा दिला असल्याची माहिती वसंत बोराटे (Vasant Borate)यांनी दिली आहे.   महापालिका आयुक्त राजेश पाटील यांच्याकडे भाजप नगरसेवकपदाचा राजीनामा दिल्यानंतर ते म्हणाले, लवकरच पुढील राजकीय भूमिका स्पष्ट करणार असल्याचेही ते म्हणाले आहेत. आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर राजीनामा दिल्याने चर्चेला उधाण आले आहे.

श्रेय वरिष्ठांनी घ्यायचे

मोशीत ग्रीन झोन आहे. त्यामुळे विकास रखडला आहे. अनधिकृत बांधकामे होत आहेत. त्यामुळे ग्रीन झोनचे रहिवाशी झोनमध्ये रूपांतर करण्याची पाच वर्षात वारंवार मागणी केली. पण, त्याला कोणी दाद दिली नाही. विकास कामे  करण्यासाठी  स्वातंत्र्य नाही. नगरसेवकांनी काम करायचे आणि त्याचे श्रेय वरिष्ठांनी घ्यायचे अशी पद्धत आहे.

प्रशासकीय ताकद मिळाली नाही विविध आरक्षणे ताब्यात घेण्यासाठी शेवटपर्यंत प्रशासकीय ताकद मिळाली नाही. त्यासाठी आवश्यक ते सहकार्य केले नाही. जाधववाडी आणि मोशीतील ग्रीन झोन हे रहिवासी झोन होणे आवश्यक होते. तेही झाले नाही. नदी सुधार प्रकल्पात नदीच्या बाजूचा परिसर विकसित होऊ शकला नाही परिणामी विकास कामांना गती मिळाली नाही. जनतेच्या दृष्टीने अपेक्षित कामे होऊ शकली नाहीत . मोशी, जाधववाडी भागातील लोक मोठ्या प्रमाणात महापालिकेला कर देतात. त्याप्रमाणात या भागातील नागरिकांना न्याय मिळाला नाही.

शेवटपर्यंत सन्मान दिला नाही

पक्षात काम करताना स्वाभिमान दुखावला जात होता. शेवटपर्यंत सन्मान दिला नाही. सन्मानाने वागविले नाही. अशीच मानसिकता आणि खदखद अनेक नगरसेवकांच्या मनात आहे. परंतु, ते स्पष्टपणे व्यक्त करू शकत नाहीत. मोशी-जाधववाडी भागाच्या विकासासाठी, जनतेसाठी मला हा निर्णय घ्यावा लागत आहे. माझी पुढील राजकीय भूमिका लवकरच स्पष्ट करणार असल्याचे बोराटे यांनी सांगितले.

Full Moon | गली में आज चांद निकला, ‘फुल मून’ दर्शन, आज दिसणार चंद्राचे सर्वात तेजस्वी रूप

बदनापूरचे आमदार नारायण कुचेंच्या भावाची तरुणाला जीवे मारण्याची धमकी? काय आहे प्रकरण?

RBI Assistant Recruitment 2022 : रिझर्व्ह बँकेत 950 पदांसाठी भरती, असिस्टंट पदासाठी बँकेत नोकरी मिळवण्याची संधी

नगरसेवक बनायचं असेल तर... इच्छुक उमेदवारांवर गडकरींचं खास शैलीत सल्ला
नगरसेवक बनायचं असेल तर... इच्छुक उमेदवारांवर गडकरींचं खास शैलीत सल्ला.
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत भाजपचाच महापौर... नरेंद्र पवाराचा दावा
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत भाजपचाच महापौर... नरेंद्र पवाराचा दावा.
कार ते एक गुंठा जमीन, पुण्यात उमेदवाराकडून मतदारांना भन्नाट ऑफर्स
कार ते एक गुंठा जमीन, पुण्यात उमेदवाराकडून मतदारांना भन्नाट ऑफर्स.
शेलारांना आठवले चावले, त्यांना पक्षात..संदीप देशपांडे यांची बोचरी टीका
शेलारांना आठवले चावले, त्यांना पक्षात..संदीप देशपांडे यांची बोचरी टीका.
...हे श्रीमंत भिकाऱ्यांचं लक्षण, संजय राऊत यांची भाजपवर जहरी टीका
...हे श्रीमंत भिकाऱ्यांचं लक्षण, संजय राऊत यांची भाजपवर जहरी टीका.
नाशकात भूंकप, युतीनंतर ठाकरे बंधूंना धक्का; मनसे-ठाकरे नेते भाजपवासी
नाशकात भूंकप, युतीनंतर ठाकरे बंधूंना धक्का; मनसे-ठाकरे नेते भाजपवासी.
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक.
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित.
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?.
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया.